Bharat Gogawale : "आम्ही त्यांना पवारांच्या ताटाखालचे मांजर म्हणायचं का?"

Bharat Gogawale : बाळासाहेब ठाकरे यांची खुर्ची स्टेजवर ठेवून त्यांचे विचार पोहोचवणार आहोत.
Bharat Gogavle Latest News
Bharat Gogavle Latest NewsSarkarnama

मुंबई : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यांच्यात दसरा मेळाव्याआधीच टिका टिप्पणी होत आहे. विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटाचा मेळावा म्हणजे मोदी - शहांच्या ताटाखालचे मांजर असल्याची टीका केली होती. आता यावर शिंदे गटाचे प्रतोद आणि उपनेते भरत गोगावले यांनी प्रत्युत्तर दिले.

गोगावले म्हणाले, जे आम्हाला मोदी - अमित शहा यांच्या ताटाखालचे मांजर म्हणत आहेत, त्यांना आम्ही शरद पवार यांच्या ताटाखालील मांजर म्हणायचे का? अशी टीका शिंदे गटाचे प्रतोद आणि उपनेते भरत गोगावले यांनी केली, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांची खुर्ची स्टेजवर ठेवून बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पोहोचवणार असल्याचेही, गोगावले म्हणाले.

Bharat Gogavle Latest News
'महाराष्ट्राला मोडून, ‘वंदे मातरम्’ची गर्जना कशी करता येईल?' शिवसेनेचा हल्लाबोल

दरम्यान दसरा मेळाव्यावरून दोन्ही गटाकडून वाद प्रतिवाद सुरू आहेत. सामना अग्रलेखातून शिंदे गट, भाजपवर सडकून टीका करण्यात आली आहे. भाजपा महाराष्ट्राच्या इतिहासातून नष्ट होईल आज शिवतीर्थावर विचारांचे सीमोल्लंघन होईल. कोणी कितीही अपशकुन करू द्या, महाराष्ट्रात शिवसेनेचाच भगवा फडकत राहील. आज मुंबईवर शिवसेनेचे राज्य आहे. तुमच्या छाताडावर बसून पुन्हा मुंबई जिंकूच.

पुढील निवडणुकीत कमळाबाईंची अशी जिरणार आहे की, भाजपा महाराष्ट्राच्या इतिहासातून नष्ट झालेला दिसेल. पुढच्या पिढीला कळणार देखील नाही की, भाजपा नावाचा एक पक्ष महाराष्ट्रात होता व तो महाराष्ट्राच्या मुळावर आला होता, असे शिवसेनेने म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com