Video Munde Meet Ambedkar : पंकजा मुंडेंनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; काय झाली चर्चा?

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव रॅली राज्यात सुरू आहेत. यातच ही भेट झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
Pankaja Munde | Prakash Ambedkar
Pankaja Munde | Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Latur News : वंचित बहुजन आघाडीचे नेते, प्रकाश आंबेडकर आणि भाजपच्या नवनिर्वाचित आमदार पंकजा मुंडे यांची भेट झाली आहे. लातूरहून बीडकडे येताना प्रकाश आंबेडकर यांची पंकजा मुंडे यांनी भेट घेतली आहे. प्रकाश आंबेडकर यांची 'आरक्षण बचाव' रॅली सुरू आहे. यातच ही भेट झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

मराठा ओबीसी आरक्षणावरून राज्याचं राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालं आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील आग्रही आहेत. दुसरीकडे, लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षण बचावासाठी उपोषण केलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राज्यात 'आरक्षण बचाव' यात्रा काढली आहे.

Pankaja Munde | Prakash Ambedkar
Video Pankaja Munde : जरांगे-पाटलांचं 'ते' विधान अन् पंकजा मुंडे म्हणाल्या, फक्त बोलून उपयोग नाही, ते...

मंगळवारी भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) या लातूर येथे होत असलेल्या भाजपच्या बैठकीसाठी परळीवरून जात होत्या. तर, प्रकाश आंबेडकर हे लातूरहून बीडकडे जात होते. यावेळी लातूरच्या महापूर गावाजवळ प्रकाश आंबेडकर आणि पंकजा मुंडे यांची भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांचं स्वागत केलं.

Pankaja Munde | Prakash Ambedkar
Pankaja Munde : जरांगेंमुळे भाजपचं नुकसान होत आहे? पंकजा मुंडेंनी मोजक्या शब्दांत दिलं उत्तर; म्हणाल्या, सध्या...

दरम्यान, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहमदनगर, धाराशीव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा, जालना अशी ही 'आरक्षण बचाव' यात्रा काढण्यात येत आहे. 7 ऑगस्टला छत्रपती संभाजीनगर येथे यात्रेचा समारोप होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com