Bjp Leader Pankaja Munde  News, Aurangabad
Bjp Leader Pankaja Munde News, AurangabadSarkarnama

Pankaja Munde : राजकारणात संयम महत्वाचा, तो माझ्याकडे आहे..

Beed News : बोलण्यात आणि कर्मात फरक आहे असा व्यक्ती खरा नेता होऊ शकत नाही. मी कोणाचा वाईट विचार करत नाही.

Beed News : दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पंकजा मुंडे यांनी यावेळी राज्यभरातील मुंडे समर्थकांशी आॅनलाईन पद्धतीने संवाद साधला. Bjp गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देतांनाच त्यांना राज्यातील सद्य परिस्थितीवर देखील परखड मते मांडली. राजकारणात संयम महत्वाचा असतो, तो आपल्याकडे आहे, असे सूचक विधान देखील पंकजा यांनी यावेळी केले.

Bjp Leader Pankaja Munde  News, Aurangabad
Shivsena News: राज्यपालांनी गृहमंत्र्यांकडे स्पष्टीकरण देत त्यांचे बोलवते धनी कोण ? हे सिद्ध केले..

महापुरुषांच्या अवमान करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात आपण मौन बाळगले असून कुण्या व्यक्तीच्या समर्थनात किंवा विरोधात ते नव्हते असेही त्यांनी स्पष्ट केले. (Pankaja Munde) पंकजा मुंडे म्हणाल्या, आज आपण मौन का बाळगले असा प्रश्न अनेकांना पडला असेल. पण जेव्हा कोणीच बोलण्याची हिमंत दाखवत नाही तिथे जो बोलतो तो खरा नेता असतो.(Marathwada) आणि जेव्हा सगळेच बोलत असतात तिथे संयम राखून जो शांत बसतो तो खरा नेता असतो. हे संस्कार गोपीनाथ मुंडे यांच्याकडून आपल्याला मिळाले आहेत.

महापुरुषांविषयी बोलण्याचा प्रत्येकाला अधिकार असला तरी त्यातून प्रेरणा घेण्यासाठी बोललं पाहिजे. चांगल्या भावनेने एखादा माणूस बोलत असेल, त्यातून एखादा चुकीचा शब्द निघाला असेल तर त्याचे भांडवल करत गाजावाजा करणे हा देखील महापुरुषांचा अवमानच ठरतो, असे म्हणत पंकजा यांनी चंद्रकांत पाटलांची पाठराखण केली.

छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या काळात आपण नव्हतो, त्यामुळे त्यांच्या कार्याचे, बलिदानाचे मोजमाप करण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही, असेही पंकजा म्हणाल्या. महापुरूषांचा सन्मान करता येत नसेल तर किमान थट्टा तरी करू नका, असे देखील त्यांनी सुनावले.

बोलण्यात आणि कर्मात फरक आहे असा व्यक्ती खरा नेता होऊ शकत नाही. मी कोणाचा वाईट विचार करत नाही, शिव्या देणाऱ्यांशीही गोड बोलून त्याचे काम करून देण्याचे सामर्थ्य माझ्यात आहे. हे वडिलांचे संस्कार आहेत, राजकारणात खोट बोलून स्थान मिळवता येत नाही, मी झुकणार नाही, याचा पुनरुच्चार देखील पंकजा यांनी यावेळी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com