Shivsena News: राज्यपालांनी गृहमंत्र्यांकडे स्पष्टीकरण देत त्यांचे बोलवते धनी कोण ? हे सिद्ध केले..

Ambadas Danve : प्रसाद लाड, मंगलप्रभात लोढा, रावसाहेब दानवे यांनी देखील शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे विधान केले होते.
Ambadas Danve-Koshyari News, Aurangabad
Ambadas Danve-Koshyari News, AurangabadSarkarnama

Ambadas Danve News : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वारंवार वादग्रस्त विधाने करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पत्र पाठवून स्पष्टीकरण दिले आहे. यावरून शिवसेनेने (Shivsena) राज्यपालांवर निशाणा साधला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यपालांच्या पत्राचा संदर्भ देत तुमचे बोलवते धनी कोण होते हे तुम्ही सिद्ध केले? अशी टीका केली आहे.

Ambadas Danve-Koshyari News, Aurangabad
Pralhad Modi : लहान भावालाही मोदींचा अभिमान, म्हणाले ते आज स्वकर्तृत्वावर पंतप्रधान..

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यासह भाजपच्या नेत्यांकडून महापुरुषांचा वारंवार अवमान करण्यात येत आहे. यावरून राजकीय वातावरण तापलेले असतांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री (Amit Saha) अमित शहा यांच्याकडे स्पष्टीकरण करणारे पत्र पाठवल्याचे समोर आले आहे. यावर अंबादास दानवे यांनी ट्विट करत राज्यपालांना खोचक टोला लगावला आहे.

दानवे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, राज्यपाल महोदयांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहून भूमिका विषद केली म्हणे. आपल्या वाचाळपणाचे स्पष्टीकरण दिल्ली दरबारी देऊन आपले बोलवते धनी कोण, हे त्यांनी पुन्हा सिद्ध केले. जनतेची माफी मागण्याऐवजी दिल्लीला स्पष्टीकरण देणे हा देखील महाराष्ट्राला कमी लेखण्याचा प्रकार आहे.

राज्यपालांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. त्यातच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील महात्मा ज्योतीबा फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले.

त्याआधी भाजपचे आमदार प्रसाद लाड, मंगलप्रभात लोढा, रावसाहेब दानवे यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे विधान केले होते. या पार्श्वभूमीवर व राज्यपालांच्या विरोधात वाढता रोष पाहता केंद्राकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले होते. आता यावरून देखील शिवसेनेने भाजप व राज्यपालांना लक्ष केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com