Pankaja Munde News : पंकजा मुंडे म्हणाल्या, '... तर तुमचं 'ते' कर्ज मी व्याजासकट परत करेन !'

Beed Lok Sabha News : बीड जिल्ह्यात चौथ्या टप्प्यात मतदान होणार असल्याने आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. बीडमधील निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे.
Pankja Munde
Pankja MundeSarkarnama
Published on
Updated on

Beed News : लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्याने सर्वत्र रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकांमुळे सत्ताधारी व विरोधी पक्षांकडून आरोप करण्याची एकही संधी सोडली जात नसल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. विशेषतः बीड जिल्ह्यात चौथ्या टप्प्यात मतदान होणार असल्याने आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. बीडमधील निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे.

सध्या बीड लोकसभेच्या उमेदवारांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. आताची लोकसभा निवडणूक ही उज्ज्वल भविष्याची आहे. शांत मनाने विचार करून मत देण्याचे आवाहन त्यांनी करीत विधानसभा निवडणूक पुढे आहे. ही निवडणूक संसदेची आहे. त्यामुळे विचारपूर्वक मतदान करा. (Pankaja Munde News)

Pankja Munde
PM Modi : PM झाल्यानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदाच 'RSS'च्या भूमीत मुक्कामी ! काय आहे कारण?

बीडमध्ये मी सर्वात मोठं कॅन्सर रुग्णालय उभं करणार आहे. मी आपल्या जिल्ह्यासाठी उद्योग आणणार आहे. कलयुगात अस्त्र शस्त्र घेऊन पुढे चालावे लागेल. ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आहे. माझा विजय निश्चित आहे, असा विश्वास भाजपच्या (Bjp) उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja munde) यांनी व्यक्त केला.

बीड लोकसभा मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी त्या म्हणाल्या, माझ्यासाठी आगामी काळात होणारी ही निवडणूक अवघड नाही. मला कुठलेही कपट कारस्थान न करता मतदान करा. मी जात कधीही काढणार नाही. तुमचे मतदान मी कर्ज समजेन, अन् तुम्ही केलेले मतदान हे येत्या काळात व्याजासकट परत करेन, असे आवाहन माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडकरांना केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2009 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून (Bjp) मुंडेसाहेब निवडणुकीला उभे होते. तेव्हा मी या परिसरातील एक न एक गाव फिरले आहे. 2014 सालच्या निवडणुकीत सुरेश धस आमच्याविरोधात राष्ट्रवादीकडून उभे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच प्रीतम मुंडेंची व्हावी, असे वाटत होते. सध्याचे राजकारण डायनॅमिक झाले आहे. दोन दिवसांत काहीही बदल होत आहेत. मी मागितली नाही तरीही मला उमेदवारी मिळाली, हे ईश्वराचे दायित्व आहे.

लहान बहिणीपेक्षा अधिकचे लीड द्या

गेल्या दोन निवडणुकीत माझ्या लहान बहिणीला जेवढे लीड दिले. त्यापेक्षा छटाक भर मते मला जास्त द्या. मी 22 वर्षे राजकारणात आहे. मग आता आभाळ का कोसळले आहे? ही निवडणूक संसदेची आहे. मोदीजी मला विचारतील पंकजा कुठे आहे म्हणून... तुम्हालादेखील अभिमान वाटेल बीडचे नाव दिल्लीत येत्या काळात घुमणार आहे, असेही पंकजा मुंडे या वेळी बोलताना म्हणाल्या.

R

Pankja Munde
Pankaja Munde News : पालकमंत्रिपदाच्या काळात टीका करणारे आज सोबत, ही देवाचीच किमया; पंकजा मुंडे कोणाबद्दल म्हणाल्या..!

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com