Pankaja Munde On State Politics : पंकजा मुंडे म्हणतात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री तणावात दिसतात..

Maharashtra Political News : राज्यातील सत्तेत आल्यापासून त्यांच्यासमोर कुठले ना कुठले प्रश्न येत आहेत.
Pankaja Munde News
Pankaja Munde NewsSarkarnama
Published on
Updated on

Aurangabad Political News : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी छत्रपती संभाजीनगरजवळच्या वेरुळ येथे घृष्णेश्वराचे दर्शन घेत आपल्या `शिवशक्ती` परिक्रमेला सुरूवात केली. (BJP Leader Pankaja Munde) त्यांच्या या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. या निमित्ताने पंकजा मुंडे यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थीतीवर भाष्य केले.

Pankaja Munde News
Pankaja Munde At Grishneshwar : घृष्णेश्वराचे दर्शन घेत पंकजा यांच्या `शिवशक्ती` परिक्रमेला सुरूवात..

एका वृत्तावाहिनीशी बोलतांना त्यांनी एक महत्वाचे विधान केले. ते म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (Devendra Fadanvis) अजित पवार हे सध्या मला तणावात दिसतात, असे त्या म्हणाल्या. मराठा आरक्षणाचे आंदोलन चिघळले आहे. अंतरवाली सराटी येथे आंदोलकांवर झालेला लाठीहल्ला, गोळीबार, मारहाणीमुळे राज्यात ठिकठिकाणी या घटनेचे पडसाद उमटत आहेत.

रास्तारोको, बंद तर काही ठिकाणी हिंसक आंदोलनामुळे राज्यातील वातावरण तापलेले आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी राज्यातील सत्ताधारी तीनही प्रमुखांची अवस्थाच आपल्या प्रतिक्रियेतून सांगितली. राज्यात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपैकी सर्वात आश्वासक चेहरा तुम्हाला कुणाचा वाटतो? या प्रश्नाला पंकजा यांनी स्पष्ट उत्तर दिले.

या चेहऱ्याकडे पाहून मला काहीही वाटत नाही, पण सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार सध्या मला तणावात दिसतात. राज्यातील सत्तेत आल्यापासून त्यांच्यासमोर कुठले ना कुठले प्रश्न येत आहेत. आधी राज्यातल्या काही भागात पुराचे संकट आले होते, तर आता पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. पण यावर सकारात्मक तोडगा काढतांना ही मंडळी दिसत नाही. त्यामुळे यावर फारसे भाष्य मी करू इच्छित नाही.

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मी काम केले आहे, त्यामुळे त्यांच्या कामाचा झपाटा पाहिला आहे. अजित पवारांसोबत काम करण्याचा योग आला नाही. पण प्रशासनावर त्यांची पकड, प्रभाव असल्याचे मी प्रसारमाध्यमांतून ऐकले पाहिले आहे. त्यांच्या स्पष्टवक्तेपणाबद्दलही ऐकून आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत म्हणाल तर त्यांचे आपल्या कार्यकर्त्यांशी चांगले संबंध आहेत. शांत स्वभावामुळे त्यांचा कार्यकर्त्यांना लळा लागल्याचेही मला माहितीतून कळाले असल्याचे पंकजा म्हणाल्या.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com