Maharashtra Political News : मुंबईतील मुलुंड भागात कार्यालयासाठी भाड्याने जागा घेण्यासाठी गेलेल्या मराठी तरुणीला `इथे महाराष्ट्रीयन अलाउड नाही`, असे म्हणत ठक्कर नावाच्या व्यक्तीने धक्काबुक्की केल्याचा आरोप केला जातोय. (Mumbai News) या संदर्भात सदर महिलने माध्यमांशी बोलताना आपल्याला धक्काबुक्की झाल्याचेही सांगितले. या पार्श्वभूमीवर राजकीय क्षेत्रातूनदेखील प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत.
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी या विषयावर भाष्य केले आहे. शासकीय बंगला सोडल्यानंतर जेव्हा मुंबईत मी घर शोधायला गेले तेव्हा मलादेखील मराठी म्हणून घर नाकारण्यात आल्याचा अनुभव आला. (BJP) मराठी लोकांना आमच्या भागात घर देत नाही, हे मीदेखील अनुभवले आहे, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्रात असे प्रकार घडत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
घडलेला प्रकार हा अत्यंत दुर्दैवी आहे. भाषावाद, प्रांत या विषयावर मी कधी भाष्य करत नाही. परंतु सध्याची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती पाहून मन खिन्न होते. (Maharashtra) मराठी म्हणून जागा नाकारल्यानंतर त्या तरुणीने जो व्हिडिओ टाकला तो संताप आणणारा आहे. राज्यात सध्या आरक्षणावरून वेगवेगळे समाज समोरासमोर येत आहेत, जाती-जातीमध्ये भांडणे सुरू झाली आहेत.
एकीकडे सगळी सुबत्ता आहे, सोयी आहेत, गाड्या आहेत तरी समाजामध्ये अस्वस्थता आहे. तर दुसरीकडे समाज वेगवेगळ्या रंगात वाटला गेला आहे, हिरवा, पिवळा, निळा, भगवा. कधी कधी वाटतं एका चक्रावर हे सगळे रंग एकत्र करून फिरवली तर त्यातून पांढरा रंग तयार होतो. पांढरा रंग हा शांततेच प्रतीक आहे. पण सध्याची राजकीय परिस्थिती पाहून मन अस्वस्थ होतं.
मुंबईत मराठी मुलीसोबत जो प्रकार जागा भाड्याने घेण्यावरून झाला आहे. तो अनुभव अनेकांना मुंबईत घर घेताना येतो. मी जेव्हा मुंबईत घर शोधत होते, तेव्हा मलाही असा अनुभव आला, मराठी माणसांना आम्ही जागा देत नाही हे मीही ऐकले आहे, याचा पुनरुच्चारदेखील पंकजा मुंडे यांनी केला. मुलुंड पश्चिममधील शिवसदन सोसायटीतील या प्रकाराचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत.
Edited By : Jagdish Pansare
विविध राजकीय पक्षांनी या मुद्यावर संताप व्यक्त करत झालेल्या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. काॅंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनीही ही घटना अतिशय गंभीर असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रात मराठी माणसालाच `महाराष्ट्रीयन आर नाॅट अलाऊड` म्हणून मुजोरी केली जाणार असेल तर ते सहन करता कामा नये. राज्य सरकारने तातडीने चौकशी करावी, अशी मागणी ट्विटच्या माध्यमातून केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.