MLA Rahul Patil On Bangar : माझी शिफारस केली असे सांगणाऱ्या बांगरांनी `शिफारस` शब्द लिहून दाखवावा...

Shivsena News : जाधव व पाटील यांनी शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला.
MLA Rahul Patil News
MLA Rahul Patil NewsSarkarnama
Published on
Updated on

Parbhani Political News : संतोष बांगर हे अपघाताने झालेले आमदार आहेत, केवळ काही महिन्यांसाठी त्यांची आमदारकी शिल्लक आहे. (Shivsena News) माझी शिफारस केल्याचे ते सांगत आहेत, त्यांनी कागदावर शिफारस हा शब्द लिहून दाखवावा, असे आव्हान परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांना दिले आहे.

MLA Rahul Patil News
MLA Santosh Bangar Wish : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, विघ्नहर्त्या बाप्पाकडून बांगरांनी घेतला नवसाचा मोदक...

शिवसेना (शिंदे गट) चे कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी नुकतेच शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय जाधव व आमदार राहुल पाटील (Rahul Patil) यांच्यावर टीका केली होती. परभणीच्या विकासाबाबत प्रश्न उपस्थित करताना त्यांनी राहुल पाटील यांच्या आमदारकीची शिफारस मीच केली असल्याचे सांगितले होते.

त्याला प्रत्युत्तर देताना राहुल पाटील यांनी सांगितले की, माझी शिफारस करण्याचा दावा करणाऱ्यानी कागदावर शिफारस हा शब्द लिहून दाखवावा. (Parbhani) माझी आमदारकीची दुसरी टर्म आहे. अपघाताने आमदार झालेल्यांची आमदारकी काही महिन्यांपुरती शिल्लक आहे. त्यामुळे त्यांनी जेवढे मिळाले आहे तेवढ्यात समाधान मानावे, असा टोलाही पाटील यांनी लगावला.

दरम्यान, आमदार संतोष बांगर यांनी खासदार जाधव व आमदार राहुल पाटील यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचे राजकीय क्षेत्रात पडसाद उमटले आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या परभणी जिल्ह्यात शिवसेनेतून बाहेर पडून अन्य पक्षात नशीब आजमावणाऱ्या राजकीय नेत्यांच्या पदरी निराशाच पडली आहे.

पक्षांतर केलेल्या एकाही राजकीय नेत्यांचे पुनर्वसन झालेले नाही. हा इतिहास बघता जाधव व पाटील यांनी शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आमदार संतोष बांगर यांनी शिवसेना (ठाकरे गट) च्या नेत्यांविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. बांगर यांनी केलेल्या टीकेला आमदार पाटील यांनी प्रत्युत्तर दिले असले तरी खासदार जाधव यांनी मात्र बांगरांच्या टीकेकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.

MLA Rahul Patil News
Ashok Chavan On Assembly Speaker : अशोक चव्हाणांना का आठवला सनी देओलच्या चित्रपटाचा डायलाॅग...

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पाहता परभणी जिल्ह्यात बंडखोर विरुद्ध एकनिष्ठ असा सामना रंगण्याची शक्यता आहे. बांगर यांनी जाधव-पाटील यांच्यावर टीका केल्यानंतर सोशल मीडियावरदेखील प्रतिक्रिया उमटत आहेत. विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी उद्धव ठाकरेंसोबत असलेले बांगर विधानसभा अध्यक्षांच्या निवडीच्या वेळी अचानक सत्ताधारी शिंदे गटासोबत बसलेले दिसले.

यावर राज्यभरातून आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. तत्पूर्वी उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले म्हणून हिंगोलीकरांनी बांगर यांचा भव्य सत्कारही केला होता. या वेळी अश्रू ढाळत बांगर यांनी केलेले भाषण आजही चर्चेचा आणि टीकेचा विषय ठरत आहे. येणाऱ्या काळात शिंदे गट विरुद्ध ठाकरे यांच्यात संघर्ष भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com