Bhimrao Dhonde News : आष्टीत लक्ष घालणार म्हणताच, पंकजा मुंडे समर्थक माजी आमदार भीमराव धोंडे राष्ट्रवादीच्या वाटेवर!

Beed -Ashti Political Movement In BJP : पंकजा यांच्या आष्टी लक्ष घालणार या विधानाचा थेट परिणाम त्यांचे समर्थक माजी आमदार भीमराव धोंडे यांच्यावरच अधिक झाल्याचे दिसून आले आहे.
EX MLA Manohar Dhonde Join NCP News Beed
EX MLA Manohar Dhonde Join NCP News BeedSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. माजी आमदार भीमराव धोंडे यांनी भाजपचा निरोप घेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.

  2. या निर्णयामुळे पंकजा मुंडे गटात खळबळ माजली असून बीड जिल्ह्यातील राजकीय गणित बदलण्याची शक्यता.

  3. ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Beed Political News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. दोन डिसेंबरला मतदान आणि तीन रोजी निकाल लागणार आहे. त्यापुर्वीच विविध राजकीय पक्षांमध्ये मोठ्या घडामोडी घडायला लागल्या आहेत.काही दिवसापुर्वी भाजप नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांनी परली येथील दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात गेवराईचे माजी आमदार बदामराव पंडीत यांचा प्रवेश करून घेतला होता. याच कार्यक्रमात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विधानभा मतदारसंघनिहाय जबाबदारीचे वाटप पंकजा यांनी केले होते. त्यात केज आणि आष्टी या दोन मतदारसंघात आपण स्वतः लक्ष घालणार असल्याचे सांगितले होते.

पंकजा यांच्या या विधानाचा अर्थ त्या आमदार सुरेश धस यांना रोखण्याचा प्रयत्न करणार असा काढला गेला. सुरेश धस यांनीही पंकजा यांचे हे आव्हान स्वीकारत आष्टीत किती लक्ष घायायचे तितके घाला, आमचं काही म्हणणं नाही, असे म्हटले होते. मात्र पंकजा यांच्या आष्टी लक्ष घालणार या विधानाचा थेट परिणाम त्यांचे समर्थक माजी आमदार भीमराव धोंडे यांच्यावरच अधिक झाल्याचे दिसून आले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर धोंडे यांनी पंकजा मुंडे यांची साथ सोडत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाचा निर्णय घेतला आहे.

11 नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत भीमराव धोंडे आपल्या समर्थकांसह पक्षप्रवेश करणार आहेत. आष्टी मतदार संघात भीमराव धोंडे चार वेळा आमदार राहिले आहेत. 2014 च्या निवडणुकीत ते भाजपा कडून विजयी झाले. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीसाठी पंकजा मुंडेंनी स्वतः प्रयत्न केले. मात्र भाजपाने सुरेश धस यांना उमेदवारी दिली. त्यामुळे बंडखोरी करत भीमराव धोंडे यांनी अपक्ष निवडणूक लढली. मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

EX MLA Manohar Dhonde Join NCP News Beed
Suresh Dhas News : 'आष्टीत किती लक्ष घालायचे ते घाला', सुरेश धस यांचे पंकजा मुंडेंना आव्हान!

पंकजा मुंडे या बीड जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी अनेक माजी मंत्री, आमदारांना गळाला लावत आहेत. असे असताना त्यांच्या विश्वासातील सहकारी बाहेर पडत असल्याने हा त्यांना मोठा धक्का समजला जात आहे. ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर भीमराव धोंडेंनी पक्षाला रामराम केल्याने पंकजा मुंडे यांची डोकेदुखी वाढणार आहे.

EX MLA Manohar Dhonde Join NCP News Beed
Pankaja Munde : वैद्यनाथ कारखाना गोपीनाथ मुंडेंचा आत्मा, तो विकला नाही तर वाचवला! पंकजा मुंडेंकडून स्पष्टीकरण

भीमराव धोंडे यांच्या जोरावच पंकजा मुंडे आष्टीमध्ये आमदार सुरेश धस यांना रोखू पाहत होत्या. परंतु आता तेच पक्ष सोडून जात असल्याने पंकजा यांना आष्टीत अधिकच लक्ष घालावे लागणार असे दिसते.भीमराव धोंडे यांनी 1980 मध्ये आष्टी मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत विजय मिळवला होता. तर पुढच्या निवडणुकीत ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. 1990 मध्ये काँग्रसेने विद्यमान आमदार म्हणून त्यांना पुन्हा उमेदवारी दिली आणि त्यांनी विजयाची हॅट्रीक केली.

गोपीनाथ मुंडेंमुळे भाजपात

भीमराव धोंडे हे 2014 मध्ये दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे भाजपात आले होते. पक्षात प्रवेश करताच त्यांना चौथ्यांदा विधानसभेची उमेदवारी मिळाली आणि भीमराव धोंडे यांनी विजयाचा चौकार ठोकला. 2024 मध्ये धोंडे पाचव्यांदा विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते. परंतु दरम्यान, सुरेश धस यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश झाला होता. त्यामुळे त्यांनी आष्टीतून उमेदवारीवर दावा सांगितला.

पंकजा मुंडे यांनी भीमराव धोंडे यांच्या नावाचा आग्रह धरला. पण पक्षाने धस यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली. भीमराव धोंडे यांनी बंडाचा झेंडा फडकवत अपक्ष उमेदवारी दाखल करत निवडणूक लढवली पण त्यांचा 78 हजार मतांनी पराभव झाला. धस आमदार झाल्यानंतर आष्टी मतदार संघात धस विरुद्ध धोंडे असा संघर्ष सुरू आहे. विशेषतः कडा सहकारी साखर कारखान्याच्या गाळपावरून दोघांमध्ये मतभेद असल्याचे बोलले जाते.

FAQs

  1. प्रश्न: भीमराव धोंडे कोणत्या पक्षात गेले?
    उत्तर: ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील होणार आहेत.

  2. प्रश्न: भीमराव धोंडे पूर्वी कोणत्या पक्षात होते?
    उत्तर: ते पूर्वी भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार होते.

  3. प्रश्न: या प्रवेशाचा पंकजा मुंडे यांच्या राजकारणावर काय परिणाम होईल?
    उत्तर: त्यांच्या गोटातील मतं फाटण्याची शक्यता असून स्थानिक पातळीवर अडचणी वाढतील.

  4. प्रश्न: प्रवेशाची घोषणा कधी होणार आहे?
    उत्तर: अजित पवारांच्या उपस्थितीत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

  5. प्रश्न: बीड जिल्ह्यातील राजकारणावर या घटनेचा कसा प्रभाव पडेल?
    उत्तर: राष्ट्रवादी काँग्रेसला स्थानिक पातळीवर बळकटी मिळेल आणि बीडमध्ये नवे समीकरण तयार होऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com