Suresh Dhas News : 'आष्टीत किती लक्ष घालायचे ते घाला', सुरेश धस यांचे पंकजा मुंडेंना आव्हान!

Suresh Dhas Reaction On Pankaja Mundes Statement : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष भडकला तेव्हापासून सुरेश धस आणि पंकजा मुंडे या एकाच पक्षात असलेल्या दोन नेत्यांमधली संबंध ताणले गेले.
Suresh Dhas Reaction On Minister Pankaja Mundes Statement News
Suresh Dhas Reaction On Minister Pankaja Mundes Statement NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. पंकजा मुंडे यांनी "मी आष्टीत लक्ष घालणार" असे विधान करून स्थानिक राजकारणात चर्चा रंगवली.

  2. त्यावर माजी आमदार सुरेश धस यांनी थेट प्रत्युत्तर देत म्हटलं – “किती लक्ष घालायचे ते घाला, जनता सर्व पाहते.”

  3. या वक्तव्यामुळे बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा मुंडे विरुद्ध धस अशी राजकीय चुरस रंगली आहे.

Beed Political News : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मी आष्टी आणि केज या दोन मतदारसंघात अधिक लक्ष देणार आहे, असे मंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर केले होते. भाजपाचे आमदार सुरेश धस यांचे आणि पंकजा मुंडे यांचे बिघडलेले संबंध पाहता त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात वेगळ्या अर्थाने चर्चा सुरू होती. धस यांनी यावर ' आष्टीत किती लक्ष घालायचे ते घाला' असे म्हणत आता पंकजा मुंडे यांना आव्हान दिले.

पंकजा मुंडे यांनी दिवाळी स्नेहमिलनाच्या कार्यक्रमात परळी येथे केलेल्या भाषणाची सर्वत्र चर्चा आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मला माझा पक्ष मोठा करायचा आहे. आमचा कुठेही पराभव होता कामा नये, यासाठी सगळ्यांनी कामाला लागा, असे आवाहन करतानाच बीड जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचे वाटप आणि जबाबदारी पंकजा यांनी फिक्स केली. सुरेश धस यांच्या आष्टीसह आमदार नमिता मुंदडा यांच्या केजमध्ये आपण स्वतः लक्ष घालणार आहोत, असे पंकजा यांनी या मेळाव्यात म्हटले होते.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची खंडणी प्रकरणातून अपहरण आणि निर्घृण हत्या झाल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात रान पेटवले होते. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष भडकला तेव्हापासून सुरेश धस आणि पंकजा मुंडे या एकाच पक्षात असलेल्या दोन नेत्यांमधली संबंध ताणले गेले. धस यांच्या आष्टी मतदारसंघातील विकासकामाच्या लोकार्पणासाठी पंकजा मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री म्हणून सहभागी झाल्या होत्या.

Suresh Dhas Reaction On Minister Pankaja Mundes Statement News
Pankaja Munde : चांगल्या-वाईट काळात माझ्यावर प्रेम केलंत त्याबद्दल परळीकरांनो थँक्यू ! पंकजा मुंडे गहिवरल्या

यावेळी केलेल्या भाषणात पंकजा मुंडे यांनी सुरशे धस यांच्याबद्दलची नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत्या तोंडावर पंकजा यांनी आपण आष्टीमध्ये विशेष लक्ष घालणार आहोत, असे म्हणत धस यांच्यावर निशाणा साधला. यावर धस यांना जेव्हा माध्यमांनी बोलतं केलं, तेव्हा 'पंकजा मुंडे या मंत्री आहेत, ते जिल्ह्यात कुठेही जाऊ शकतात. त्यांना आष्टीत काय लक्ष घालायचे ते त्यांनी घालावे' असे म्हणत यावर अधिक बोलणे टाळले.

Suresh Dhas Reaction On Minister Pankaja Mundes Statement News
Suresh Dhas : एका नेत्याची विकेट पडली, अगदी क्लीन बोल्ड! सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांना डिवचले

दरम्यान, बीड जिल्ह्यात महायुतीमध्ये एकत्र असलेले पंकजा आणि धनंजय मुंडे हे दोघे बहीण भाऊ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आमने-सामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुरवातीला पंकजा मुंडे यांच्याशी युती संदर्भात आपली चर्चा झाली आहे, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले होते. परंतु आता दोघेही बीडमध्ये स्वबळ आजमावण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

FAQs

1. पंकजा मुंडे यांनी कोणते विधान केले होते?
त्या म्हणाल्या की, "मी आता आष्टीत लक्ष घालणार आहे," ज्यामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली.

2. सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंना काय उत्तर दिलं?
धस म्हणाले, “किती लक्ष घालायचे ते घाला, जनता ठरवेल कोण बरोबर आहे.”

3. या वादाचा संदर्भ काय आहे?
आष्टी मतदारसंघातील राजकीय वर्चस्वावरून पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील जुनी स्पर्धा पुन्हा पेटली आहे.

4. या वादाचा परिणाम स्थानिक राजकारणावर काय होऊ शकतो?
कार्यकर्त्यांमध्ये विभागणी होण्याची शक्यता असून, निवडणुकीत या वादाचा प्रभाव दिसू शकतो.

5. दोन्ही नेते कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत?
पंकजा मुंडे भाजपच्या नेत्या आणि सरकारमध्ये मंत्री आहेत, तर सुरेश धस हे देखील भाजपचे आमदार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com