मुंडे समर्थकांची भाजप मंत्र्यांच्या कार्यालयावर दगडफेक; प्रविण दरेकरांचा ताफा अडवला

Pankaja Munde news विधान परिषदेच्या निवडणूकीत पक्ष श्रेष्ठीकडून पंकजा मुंडेंना डावलण्यात भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस वाढली आहे
Pankaja Munde news
Pankaja Munde news

Pankaja Munde news

औरंगाबाद : विधान परिषदेच्या निवडणूकीत पक्ष श्रेष्ठीकडून पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) डावलण्यात भाजपमध्ये (BJP) अंतर्गत धुसफूस वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या समर्थकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असतानाच रविवारी (12जून) काही मुंडे समर्थकांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा ताफा अडवल्याची माहिती समोर आली आहे.

त्यातच पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या कार्यालयावर दगडफेकीचा (stone pelting) प्रयत्न केला. यावेळी भागवत कराड यांचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाले. त्यामुळे प्रचंड राडा झाला. हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या मुंडे समर्थकांना मारहाण करण्यात आली. जालन्यात काहींनी आत्मक्लेश आंदोलन केले.

Pankaja Munde news
धक्कादायक : पुण्याच्या ग्रामीण भागातील अकरा तरूण बिश्नोई गँगच्या संपर्कात

तर दूसरीकडे विनायक मेटे यांनी आयोजित केलेल्या शिवसंग्रामच्या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी प्रविण दरेकर शनिवारी रात्री बीडला गेले होते. त्या रात्री त्यांनी शासकीय विश्रामगृहावर त्यांनी मुक्काम केला. प्रवीण दरेकर हे मुक्कामाला असतानाही बीड जिह्यातील एकही भाजप कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली नाही. रविवारी सकाळी बीड हुन धाराशिव ला गेले आणि तिथून 11 वाजता पुन्हा बीडला जात असताना काही भाजप कार्यकर्त्यांनी चौसाळ्याजवळ प्रवीण दरेकरांच्या वाहनांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. प्रचंड घोषणाबाजी केली.

बीडमधील हा कार्यक्रम आटोपून ते पुढच्या दौऱ्यावर निघाले असताना पंकजा मुंडे समर्थकांनी दरेकर आणि फडणवीस यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पण दरेकरांनी गाडी न थांबवल्याने पंकजा समर्थक थेट गाडय़ांसमोर आडवे झाले. यात मुंडे समर्थकांसह एक पोलीस कर्मचारी जखमी झाला.

त्यानंतर दरेकर धाराशिव येथील कार्यक्रम आटोपून औरंगाबादला जाताना पारगाव परिसरातही पंकजा मुंडे समर्थकांनी मोठी गर्दी केली. प्रविण दरेकरांचा ताफा येताच मुंडे समर्थकांनी तो अडव आपली नाराजी दरेकरांसमोर मांडली. भाजपकडून मुंडे बहिणींवर अन्याय होत असल्याचे सांगत खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही आणि आता पंकजा मुंडेंनाही विधान परिषदेत उमेदवारी मिळाली नाही, अशी भूमिका मुंडे समर्थकांनी घेतली आहे .

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com