Pankaja Munde News : सुरेश धस यांच्या आष्टीतील कार्यक्रमाला पंकजा मुंडेही हजर राहणार!

Pankaja Munde will attend an event in the Ashti constituency, which is represented by Suresh Dhas : सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघातील एका शासकिय कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत पंकजा मुंडे या देखील सहभागी होणार असल्याची माहिती आहे.
Suresh dhas- Pankaja Munde News
Suresh dhas -Pankaja Munde NewsSarkarnama
Published on
Updated on

Beed Political News : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांना टारगेट केले आहे. वाल्मीक कराड याचा संतोष देशमुख खून प्रकरणाशी असलेला संबंध आणि त्याची धनंजय मुंडे यांच्याशी असलेली जवळीक यावरून धस दररोज नवनवे आरोप करत आहेत.

राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी नुकताच जालना येथे राजकारण गढूळ पाण्यासारखे झाले आहे. लोक सुपारी घेऊन आरोप करतात, अशा शब्दात आमदार सुरेश धस यांच्या वर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर मुंडे आणि धस यांच्यातील राजकीय संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. विधानसभा निवडणुकीत पंकजाताईंनी आपल्या विरोधात काम केले, असा आरोप सुरेश धस यांनी केला.

या संपूर्ण घडामोडी आणि जिल्ह्यातील राजकीय वातावरण पाहता सुरेश धस आणि पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर येतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितित पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सुरेश धस (Suresh Dhas) आणि धनंजय पंकजा मुंडे समोरासमोर आले होते. त्यानंतर आता सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघातील एका शासकिय कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत पंकजा मुंडे या देखील सहभागी होणार असल्याची माहिती आहे.

Suresh dhas- Pankaja Munde News
Suresh Dhas : कृष्णा आंधळे करून करून काय करणार?; पुरावे तर विष्णू चाटे अन्‌ ‘आका’ने नष्ट केलेत : सुरेश धसांचा नवा बॉम्ब

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप आणि राजीनाम्याच्या मागणीवरून असलेला तणाव पाहता पंकजा मुंडे यांची आष्टीतील या कार्यक्रमातील हजेरी महत्त्वाची ठरणार आहे.सुरेश धस यांच्यामुळे राज्यात बीडची बदनामी झाली असा आरोप पंकजा मुंडे यांनी याआधी केला होता. त्यामुळे उद्या आष्टी येथे होणाऱ्या कार्यक्रमात धस आणि पंकजा मुंडे एकमेकांशी संवाद साधतात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आष्टीच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टरने आगमन होणार आहे.

Suresh dhas- Pankaja Munde News
Pankaja Munde : "काही लोक सुपारी घेतात अन्..." राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या...

त्यांच्यासोबतच पकंजा मुंडे या देखील आष्टीला जाणार असल्याची माहिती आहे. राज्य शासनाचा महत्त्वाचा कार्यक्रम असल्याने आणि मुख्यमंत्र्यांचे जिल्ह्यात आगमन होणार असल्याने त्या उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जाते.कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प अंतर्गत आष्टी उपसा सिंचन क्रमांक तीन शिंपोरा ते खुंटेफळ साठवण तलावाच्या पाईपलाईन कामाची पाहणी तसेच बोगदा कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी साडेअकरा वाजता होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com