Pankaja Munde : "काही लोक सुपारी घेतात अन्..." राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या...

Pankaja Munde on Politics : जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा शिवसेनेच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी सध्याच्या राजकीय आरोप-प्रत्यारोपावर भाष्य केलं.
Pankaja Munde News
Pankaja Munde NewsSarkarnama
Published on
Updated on

Jalna News, 02 Feb : राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखे आहे. आपण किती दिवस त्यात तुरटी फिरवायची, काही लोक ठरवून सुपारी घेऊन आरोप करतात, अशा शब्दात जालना (Jalna) जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सध्याच्या राजकीय आरोप-प्रत्यारोपावर खंत व्यक्त केली आहे. त्या जालन्यात सत्कार समारंत्राच्या कार्यक्रमात बोलत होत्या.

जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा शिवसेनेच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी सध्याच्या राजकीय आरोप-प्रत्यारोपावर भाष्य केलं.

त्या म्हणाल्या, "राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखं आहे. आपण किती दिवस त्यात तुरटी फिरवायची, काही लोक ठरवून सुपारी घेऊन आरोप करतात." तर मला तुमच्या नजरेत मला गोपीनाथ मुंडे दिसतात, ती नजर खाली जाऊ नये म्हणून राजकारणात आले. मला कार्यकर्त्यांचं प्रचंड प्रेम लाभलं आहे.

Pankaja Munde News
Sanjay Ruat : दिल्लीतून एकनाथ शिंदेंचा फोन टॅपिंग? त्यांच्याच आमदाराने दिली माहिती, राऊतांचा खळबळजनक दावा

मात्र, मला कायम एका गोष्टीचं टेन्शन येतं ते म्हणजे, तुमच्या सगळ्यांच्या अपेक्षा कशा पूर्ण करणार? असंही त्या यावेळी म्हणाल्या. दरम्यान, सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेत असलेला विषय म्हणजे धनंजय मुंडेंचा राजीनामा यावर देखील त्यांनी भाष्य केलं.

Pankaja Munde News
Congress, RJD and Union Budget : अर्थसंकल्पात बिहारसाठीच्या घोषणांवरून I.N.D.I.A ब्लॉकमध्ये फूट? ; 'काँग्रेस' अन् 'राजद'...

त्या म्हणाल्या, "स्वतः अजित पवारांनी (Ajit Pawar) स्पष्ट केलं आहे की, या त्यांचा संबंध आढळला तर आम्ही योग्य ती कारवाई करू. संबंध नसेल तर अन्याय व्हायला नको, हा अजितदादांचा निर्णय आहे." शिवाय तपास यंत्रणांवरच हे सगळं अवलंबून आहे. आपल्याला त्याच्याबद्दल माहिती नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com