Samrudhi Highway : बाळासाहेबांच्या नावाने असलेल्या `समृद्धी` च्या लोकार्पणापासून उद्धवसेना दूरच..

Aurangabad : शिंदे-फडणवीस सरकारमधील अनेक मंत्री,आमदार, खासदारांना या सोहळ्याचे साक्षीदार होता आले.
Samrudhi Highway News, Aurangabad
Samrudhi Highway News, AurangabadSarkarnama

Shinde Group-Bjp News : महाराष्ट्राला समृद्ध करणारा हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे `समृद्धी` महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान Narendra Modi नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपूरात संपन्न झाले. हा महामार्ग ज्या ज्या जिल्ह्यातून जातो त्या त्या ठिकाणी शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांनी या उद्घाटन सोहळ्याला व्हिडिओ काॅन्फरन्स्िंगच्या माध्यमातून हजेरी लावली.

Samrudhi Highway News, Aurangabad
Aurangabad : `छत्रपती संभाजीनगर` ला केंद्राची लवकरच मंजुरी मिळणार..

औरंगाबाद येथे वेरूळ प्लाझा माळीवाडा येथे (Dr.Bhagwat Karad) केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ.भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे, हरिभाऊ बागडे, आमदार प्रशांत बंब, शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थितीत होते. (Bjp) महाराष्ट्राला २५ वर्ष पुढे नेणारा हा विकासाचा महामार्ग असल्याचे मत कराड यांनी यावेळी व्यक्त केले.

२०१४ मध्ये युतीचे सरकार आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना समृद्धी महामार्गाची मुहुर्तमेढ रोवली गेली होती. या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री होते. तेव्हा या महामार्गाला हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय झाला होता. नागपूर ते मुंबई अशा या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. नागपूर ते शिर्डी हा पहिला टपा आजपासून वाहतुकीला खुला झाला आहे.

२०१९ मध्ये राज्यात झालेल्या घडामोडीनंतर शिवसेना-राष्ट्रवादी व काॅंग्रेस या तीन पक्षांचे आघाडी सरकार येवून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले होते. युती सरकारच्या काळातील अनेक प्रकल्पांना स्थगिती देण्याचा धडाका आघाडी सरकारने सुरू केला होता. कोरोना काळात तर राज्याचा विकास पुर्णपणे ठप्प झाला होता. असे असले तरी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने असलेल्या समृद्धी महामार्गाचे काम मात्र सुरूच होते.

आता हा महामार्ग तयार होवून त्याचे लोकार्पण होत असतांना ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने हा महामार्ग आहे, त्या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या आमदार, खासदारांना मात्र या लोकार्पणापासून लांब ठेवण्यात आले. पण बाळासाहेबांची शिवसेना असलेल्या आणि महाविकास आघाडी आणि आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी असलेल्या अनेक मंत्री आणि आमदार, खासदारांना मात्र या सोहळ्याचे साक्षीदार होता आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com