पंकजा मुंडेचे कमबॅक, तीन नगरपंचायतींवर भाजपचा झेंडा; धस ठरले किंगमेकर

केजमध्ये खासदार रजनी पाटील यांना नगर पंचायतीवरील काँग्रेसची सत्ता टिकविता आली नाही. (Beed District)
Pankaja Munde-Suresh Dhas
Pankaja Munde-Suresh DhasSarkarnama
Published on
Updated on

बीड : नगर पंचायत निवडणुकीत जिल्ह्यात भाजपने बाजी मारली आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या मार्गदर्शनाखाली पाच पैकी तीन नगर पंचायती आमदार सुरेश धस यांनी मोठ्या फरकाने जिंकल्या आहेत. (Beed District) केवळ वडवणी नगर पंचायतीमध्ये राष्ट्रवादीला विजय मिळविता आला. (Bjp) राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी या ठिकाणी ताकद लावली होती.काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांच्या केजमध्ये स्थानिक जनविकास आघाडीने सर्वाधिक जागा जिंकल्या तर काँग्रेसला तीन जागांवर समाधान मानावे लागले.

या आघाडीला भाजपचे जेष्ठ नेते रमेश आडसकर यांचे पाठबळ होते. याच ठिकाणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या कन्या डॉ. हर्षदा यांना पराभव पत्करावा लागला. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्या शिरुर कासार गावात राष्ट्रवादीला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले. आष्टी मतदार संघाचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांच्या मतदार संघातील तीनही नगर पंचायती भाजपचे आमदार सुरेश धस यांनी जिंकल्या.

तर, जिल्ह्यात शिवसेनेला केवळ दोन जागा जिंकता आल्या असून नुतन शिवसेना जिल्हा प्रमुख अप्पासाहेब जाधव यांच्या कार्यक्षेत्रातील व वणीत उभारलेले सहाही शिवसेना उमेदवार पराभूत तर झालेच शिवाय पाच उमेदवारांचे डिपॉझिटही गुल झाले. जिल्ह्याच्या एकंदरीत निकालातील ही वैशिष्ट्य आहेत. जिल्ह्यातील केज, वडवणी, शिरुर कासार, पाटोदा व आष्टी या पाच नगर पंचायतींची निवडणुक झाली.

बुधवारी (ता. १९) मतमोजणी हेाऊन निकाल जाहीर झाले. यात जिल्ह्यातील एकूण पाच नगर पंचायतींच्या ८५ जागांपैकी सर्वाधिक ४८ जागा भाजपने जिंकल्या. तर, राष्ट्रवादीला २१ जागा जिंकता आली. काँग्रेसला पाच, शिवसेनेला दोन व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एक जागा जिंकली. तर, केजमध्ये जनविकास आघाडीने आठ जागा जिंकल्या.

दरम्यान, आष्टी मतदार संघातील आष्टीसह पाटोदा व शिरुर कासार नगर पंचायतींवर सत्ता कायम ठेवण्यात भाजप आमदार सुरेश धस यांना यश मिळाले. या मतदार संघाचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांना कुठलाही करिष्मा करता आला नाही. तर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्या नेतृत्वाखालील शिरुर कासार या गावच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची धुळधाण उडाली.

Pankaja Munde-Suresh Dhas
पक्षांतराच्या चर्चेने घात, सावंतांना धक्का, वाशी नगरपंचायतीत भाजपला बहुमत

वडवणी नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी स्थानिक पातळीवर भाजप व इतर पक्षीयांना सोबत घेऊन सत्तांतर घडवून आणले. केजमध्ये खासदार रजनी पाटील यांना नगर पंचायतीवरील काँग्रेसची सत्ता टिकविता आली नाही.

काँग्रेसला केवळ तीन जागा मिळाल्या आहेत. या ठिकाणी भाजपचे चिन्ह गोठले असले तरी भाजप नेते रमेश आडसकर यांनी पाठबळ दिलेल्या स्थानिक जनविकास आघाडीने सर्वाधिक आठ जागा जिंकल्या. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या कन्या डॉ. हर्षदा यांचा येथून पराभव झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com