पक्षांतराच्या चर्चेने घात, सावंतांना धक्का, वाशी नगरपंचायतीत भाजपला बहुमत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेल्या निवडणुकीत फक्त एक जागा मिळाली होती यावेळी तर एकही जागा त्यांना जिकंता आलेली नाही. ( Shivsena Mla Tanaji Sawant)
Mla Tanaji Sawant
Mla Tanaji SawantSarkarnama

उस्मानाबाद : भुम-परंडा-वाशी मतदारसंघाच्या आजी-माजी आमदारांना धक्का देत नगर पंचायत निवडणुकीत मतदारांनी भाजपच्या पारड्यात मतांचे भरभरून दान दिले आहे. (Osmanabad District) राजकीय ताकद नसतांना केवळ शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल मोटे यांच्यातील वादाचा फायदा भाजपला मोठ्या प्रमाणात झाला आहे. (Shivsena) भाजपने पुर्ण बहुमत मिळवत विद्यमान आमदार तानाजी सावंत यांना जोरदार झटका दिला. (Bjp)

वाशी नगरपंचायतमध्ये शिवसेनेची एकहाती सत्ता होती, पण भाजपने ती खेचून आणली. सावंत भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा असतानाच हा निकाल हाती आल्याने जनतेने त्यांना नाकारल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे. सावंत व माजी आमदार राहुल मोटे यांनी वाशीची नगरपंचायत आपल्याकडे घेण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती.

मोटे यांच्या पक्षाला इथे खातेही उघडता आलेले नाही. गेल्या वेळी वाशी नगरपंचायतमध्ये काॅंग्रेसच्या प्रशांत चेडे यांच्याकडे एकहाती सत्तेच्या चाव्या होत्या. त्यांच्या नेतृत्वाखाली १७ पैकी १२ जागेवर काॅंग्रेसने दणदणीत विजय मिळवत सत्ता मिळवली होती. तर शिवसेनेच्या वाट्याला एकच जागा आली होती. पण कालांतराने चेडे सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केला होता.

त्यामुळे एक नगरसेवक असूनही चेडे यांच्यासह अख्खा मोठा काॅंग्रेसचा गटच सेनेत दाखल झाला, पर्यायाने वाशी नगरपंचायतीवर सेनेची सत्ता आली. साहजिकच विधानसभेला प्रा.सावंत याना वाशीमध्ये मोठे मताधिक्य देखील मिळाले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मताधिक्य मिळालेले असतानाही यावेळी मात्र शिवसेनेला धक्का बसणारा निकाल हाती आला. भाजपने १७ पैकी १० जागा जिंकत बहुमत मिळवले, तर शिवसेनेला ७ जागांवर समाधान मानावे लागले.

दोन वर्षातच मतदारांनी शिवसेनेला नाकारले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. प्रशांत चेडे यांच्याबरोबरच आमदार सावंत यांचाही प्रभाव कमी झाल्याचे चित्र निकालावरुन स्पष्ट होत आहे. या उलट फारसा प्रभाव नसलेल्या भाजपाला लोकांनी भरभरुन मतदान दिले आहे. शिवाय एकहाती सत्ता स्थापन करुन आजी-माजी आमदारांना एकप्रकारे आत्मचिंतन करायला भाग पाडले आहे.

Mla Tanaji Sawant
अब्दुल सत्तारांचा दानवेंना चकवा ; सोयगाववर भगवा फडकविला

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेल्या निवडणुकीत फक्त एक जागा मिळाली होती यावेळी तर एकही जागा त्यांना जिकंता आलेली नाही. याठिकाणी राज्यस्तरावरील नेत्यांच्या प्रचारसभा आयोजीत करण्यात आल्या होत्या, तरीही जनतेने राष्ट्रवादी व तेथील नेतृत्वाला नाकारले. त्यामुळे माजी आमदार मोटे यांना अजुन बराच टप्पा गाठावा लागणार असे दिसते.

तर विद्यमान आमदार असून देखील प्रा.सावंत गेल्या दोन वर्षात मतदारसंघामध्ये अपवादानेच दिसल्याने त्यांच्याबद्दलचा राग देखील मतदारांनी मतपेटीतून दाखवल्याचे स्पष्ट होते. शिवाय गेल्या काही दिवसापासुन त्यांची भाजपशी होत असलेली सलगी लोकांना आवडली नाही, त्याचाच परिणाम शिवसेनेच्या निकालावर झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com