Pankaja Munde : "ताई... ओ ताई...!" कार्यकर्त्याची एक हाक अन् पंकजा मुंडेंनी जे केलं, त्याने जिंकली लाखो मने! 'व्हिडिओ' होतोय तुफान व्हायरल!

Pankaja Munde public interaction viral : “ताई… ओ ताई…” या हाकेनंतर पंकजा मुंडेंनी दिलेला प्रतिसाद सोशल मीडियावर व्हायरल होत लाखो मने जिंकतोय. पाहा व्हिडिओ.
Pankaja Munde public interaction viral
pankaja MundeSarkarnama
Published on
Updated on

BJP News: भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे या कार्यकर्त्यांना वेळ देत नाहीत, भेटत नाहीत असा आरोप सातत्याने त्यांच्यावर केला जातो. कधी तो विरोधकांकडून तर कधी स्वपक्षातल्या नारांजाकडून. यावर मला मर्यादा आहेत, मला शिस्तीत वागलेलं आवडतं म्हणत पंकजा यांनी स्पष्टीकरणही दिले आहे. सध्या पंकजा मुंडे यांचा हेलिकाॅप्टरमध्ये बसताना कार्यकर्त्याने दिलेली हाक आणि त्याला तेवढ्याच उत्साहाने दिलेली ओ.. याचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

नियोजित कार्यक्रम आटोपून हेलिकाॅप्टरने परत जात असताना हेलिपॅडजवळ पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. प्रत्येक जण मोबाईलमध्ये त्यांची छबी, व्हिडिओ करण्यात व्यस्त होता. काहींना पंकजा मुंडे यांच्यासोबत सेल्फी घ्यायची होती. पण व्यस्त कार्यक्रमामुळे पंकजा मुंडे लगबगीने हेलिकाॅप्टरमध्ये बसण्यासाठी निघाल्या.

Pankaja Munde public interaction viral
Donald Trump viral post : 'ट्रम्प यांचा नवा धमाका!' अमेरिकेसोबतच आता 'या' देशाचेही राष्ट्राध्यक्ष? 'सोशल मीडियावरील पोस्ट'ने जगात खळबळ!

एक पाय हेलिकाॅप्टरमध्ये टाकत असतानाच गर्दीतून एका कार्यकर्त्याने बेंबीच्या देठा पासून 'ताई.. ओ ताई.. असा आवाज दिला, ही आरोळी कानावर पडताच, पकंजा मुंडे यांनीही तेवढ्याच उंच आवाजात ओ.. असा प्रतिसाद दिला, त्यावर पुन्हा कार्यकर्ता म्हणाला, फोटो काढायचांय ताई.. अन् पुन्हा त्याला ये इकडे म्हण पंकजा मुंडेंनी प्रतिसाद देत त्या कार्यकर्त्याचे मन जिंकले! आपल्या हाकेला पंकजा मुंडेंनी दिलेला प्रतिसाद पाहून भारावलेल्या कार्यकर्त्याने मग पोलीसांचा कडा पार करत थेट हेलिकाॅप्टरकडे धाव घेतली. पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांसोबत सेल्फी दिला आणि मगच त्यांचे हेलिकाॅप्टर उडाले.

पंकजा मुंडे कार्यकर्त्यांना वेळ देत नाही म्हणणाऱ्यांना चपराक देणारा हा प्रसंग घडला तो गहिणीनाथ गडावर. मंत्री पंकजा मुंडे या काल वैराग्यमूर्ती संत वामनभाऊ यांच्या सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी सोहळ्याला गहिनीनाथ गडावर आल्या होत्या. कार्यक्रम संपल्यानंतर परतत असतांना पंकजा मुंडे यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी त्यांच्या समर्थकाने मोठ्याने आरोळी देत 'फोटो काढायचांय ताई' असा आग्रह धरला. पुढे जे घडले त्याचा व्हिडिओ सध्या सगळ्यांच्या समोर आहे.

पंकजा मुंडे या गेली पाच-सहा वर्ष राज्याच्या राजकारणात काहीशा झाकोळल्या गेल्या होत्या. लोकनेते दिवगंत गोपीनाथ मुंडे यांचा संघर्ष आपल्याही आयुष्यात असल्याचे सांगत पकंजा यांनी आलेली संकट झेलत पुढे वाटचाल सुरूच ठेवली. 2019 मध्ये परळी विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव हा पंकजा मुंडे यांच्या राजकीय आयुष्यातील कटू क्षण. त्यानंतर पक्षाकडून त्यांना साईट ट्रॅक करण्यात आल्याने पाच वर्ष त्या राजकारणातून अक्षरशः बाहेर फेकल्या गेल्यासारखी परिस्थिती होती.

Pankaja Munde public interaction viral
Ladki Bahin Yojana : बहिणींना ओवाळणी मिळणार की खोळंबणार? निवडणूक आयोगाच्या 'त्या' प्रश्नाने खळबळ; हप्त्याबाबत पैशांचा फैसला आज!

2024 मध्ये या परिस्थितीत थोडासा बदल झाला आणि पक्षाने बीड लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली. परंतु मराठा विरुद्ध ओबीसी या आरक्षणाच्या वादात पंकजा मुंडे यांचा अवघ्या सहा हजार मतांनी पराभव झाला. महायुती असल्याने परळीतून पुन्हा विधानसभा लढवण्याचे त्यांचे स्वप्न भंगले. पण विधान परिषदेवर संधी आणि त्यांनतर मंत्रीमंडळात स्थान देत पक्षाने त्यांचे पुनर्वसन केले. आता पंकजा मुंडे यांची राजकीय गाडी पुन्हा रुळावर येऊ लागली आहे. कार्यकर्ते आणि आपल्यातील दरी, अंतर वाढणार नाही याची काळजी त्या अधिक घेत असल्याचे त्यांच्या 'या' कृतीवरून दिसून आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com