Parbhani BJP Politics : 'तयारीला लागा, सिग्नल मिळाला' बोर्डीकर समर्थकांचा दावा ; आता अजितदादा कोणता सिग्नल देणार ?

Marathwada NCP News : परभणी लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही असणाऱ्या अजित पवार गटाचे प्रयत्न निष्फळ ठरतात की काय ?
Parbhani BJP Politics
Parbhani BJP Politics Sarkarnama
Published on
Updated on

Marathwada Politics : शिवसेना, राष्ट्रवादी या दोन पक्षांत फूट पडल्यापासून राज्यातील समीकरणे बदलली आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत महायुती म्हणून भाजप, शिवसेना (शिंदे) राष्ट्रवादी (अजित पवार) आणि इतर असे एकूण 11 पक्ष मिळून एकत्रित निवडणूक लढवणार असल्याचे भाजपचे राज्यातील सगळेच नेते सांगत आहेत. (Parbhani BJP Politics) एवढेच नाही तर महायुती म्हणून लोकसभा एकत्र लढणार असले तरी उमेदवाराचे चिन्ह कमळच असणार, असा दावा विरोधी पक्षांकडून केला जात आहे.

Parbhani BJP Politics
Nanded NCP News : अजितदादांकडून नांदेडमध्ये कार्यकर्त्यांना बळ, सहाजणांची `डीपीडीसी`वर नियुक्ती..

परभणी (Parbhani) लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीने दावा केला असल्याच्या चर्चा आहेत. 2019 च्या निवडणुकीत राजेश विटेकर हे दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे तेव्हा हुकलेल्या संधीचे सोने 2024 मध्ये करण्यासाठी अजित पवार (Ajit Pawar) इच्छूक आहेत. असे असताना माजी मंत्री रामप्रसाद बोर्डीकर, त्यांच्या कन्या आमदार मेघना बोर्डीकर-साकोरे यांच्या समर्थकांनी समाज माध्यमांवर `तयारीला लागा, सिग्नल मिळाला आहे`, अशा पोस्ट टाकायला सुरूवात केल्याने राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे.

परभणी लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही असणाऱ्या राष्ट्र्वादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रयत्न निष्फळ ठरतायत की काय? अशी चर्चा या निमित्ताने जिल्ह्यात सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीला अवघ्या काही महिन्यांचा कालावधी उरला आहे. (BJP) शिवसेना-भाजप युती असताना परभणी लोकसभा मतदारसंघ कायम शिवसेनेकडे होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या उमेदवाराला जिल्ह्यातील जनतेने भरघोस मतांनी निवडून दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये बंडाळी झाली आणि सर्वच समीकरणे बदलली. परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय जाधव यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ दिल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार तेच असणार हे स्पष्ट आहे. महायुतीच्या जागावाटपात भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (अजित पवार गट) रस्सीखेच सुरू आहे. गेल्या निवडणुकीत परभणी मतदारसंघात राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती.

राजेश विटेकर हे अजित पवार यांच्यासोबत असल्यामुळे महायुतीच्या जागावाटपात परभणी लोकसभा मतदासंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असावा याबाबत स्वत: अजित पवार आग्रही असल्याचे बोलले जाते. कर्जतमधील पक्षाच्या शिबिरात अजित पवार यांनी मार्गदर्शनात यासंदर्भात बोलून दाखवले होते. तसेच पक्षाने परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी राष्ट्र्वादीचे संजय बनसोडे यांची नियुक्ती केली. जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी नेमणूक करताना भाजप व शिंदे गटाच्या तुलनेत राष्ट्र्वादी कॉंग्रेसला झुकते माप मिळाले होते.

Parbhani BJP Politics
Parbhani Lok Sabha Constituency : 'भक्ती'च्या शक्तीमुळे संजय जाधव यांच्या खासदारकीची हॅटट्रिक होईल का ?

या पार्श्वभूमीवर महायुतीच्या जागावाटपात परभणी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे (अजित पवार गट) असणार हे निश्चित मानले जात होते. मात्र भाजपचे लोकसभा निवडणूकप्रमुख माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व जिंतूर विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांच्या निकटवर्तीयाने समाज माध्यमावर प्रसारित केलेल्या पोस्टमुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे. आता अजित पवारांकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कोणता सिग्नल मिळतो ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

Parbhani BJP Politics
Parbhani Loksabha News : परभणीत महायुतीचा उमेदवार कोणीही असो, चिन्ह मात्र कमळच...?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com