Parbhani Lok Sabha Constituency : 'भक्ती'च्या शक्तीमुळे संजय जाधव यांच्या खासदारकीची हॅटट्रिक होईल का ?

Parbhani Political News : ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्रमक हिंदुत्वाचा चेहरा, अशी संजय जाधव यांची ओळख आहे.
Parbhani Lok Sabha Constituency | Sanjay Jadhav
Parbhani Lok Sabha Constituency | Sanjay JadhavSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : परभणी लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला होण्यासाठी ज्या मावळ्यांनी मेहनत घेतली त्यातील एक प्रमुख नाव म्हणजे खासदार संजय जाधव. शहरप्रमुख ते शिवसेना उपनेते असा यशस्वी प्रवास केलेल्या खासदार जाधव यांना परभणी जिल्ह्यातच नव्हे तर राज्याच्या राजकीय क्षेत्रात 'बॉस' या नावाने ओळखले जाते. जाधव धार्मिक वृत्तीचे असून दरवर्षी पायी पंढरपूरची वारी करतात. परभणीत झालेल्या हिंदू-मुस्लीम दंगलीत दंगलखोरांना प्रतिबंध करण्यासाठी संजय जाधव ठामपणे उभे होते. संजय जाधव उभे राहिले नसते तर एकही दुकान शिल्लक राहिले नसते, अशी प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी व्यक्त केली होती.

शिवसेनेचा आक्रमक हिंदुत्वाचा चेहरा अशी ओळख झाल्यामुळे परभणीच्या जनतेने त्यांना दोनवेळा आमदार आणि दोनवेळा खासदार केले. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर राज्याच्या राजकीय क्षेत्रात उलथापालथ झाली. दिग्गज नेते पक्ष सोडून जात असताना खासदार जाधव मात्र अगदी नि:संकोचपणे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले. आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीत खासदारकीची हॅटट्रिक करण्यासाठी संजय जाधव सज्ज आहेत.

Parbhani Lok Sabha Constituency | Sanjay Jadhav
Parbhani Loksabha Constituency : परभणी लोकसभेवर दावा सांगत भाजप शिंदे गटाला देणार धक्का..

नाव (Name)

संजय हरिभाऊ जाधव (बंडू जाधव या नावाने परिचित)

जन्मतारीख (Birth date)

1 जून 1967

शिक्षण (Education)

बारावी

कौटुंबिक पार्श्वभूमी (Family Background)

संजय जाधव यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. वडील हरिभाऊ व आई अनुसयाबाई यांच्याकडून त्यांना वारकरी संप्रदायाचा वारसा मिळाला. खासदार जाधव हे कुटुंबात सर्वात ज्येष्ठ असून लहान भगिनी संध्याताई व बंधू विजय असा त्यांचा परिवार आहे. पत्नी क्रांती जाधव या गृहिणी असून, निवडणूक काळात प्रचारासाठी त्या सक्रिय असतात. साक्षी व वेदांत ही दोन मुले आहेत. साक्षी पुण्यात फूड टेक्नॉलॉजीचे शिक्षण घेत असून वेदांत अकरावीत आहे.

नोकरी किंवा व्यवसाय काय? (Service/Business)

शेती

लोकसभा मतदारसंघ कोणता? (Lok Sabha Constituency)

परभणी

राजकीय पक्ष कोणता? (Political Party Affiliation)

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

Parbhani Lok Sabha Constituency | Sanjay Jadhav
Marathwada Water Issue : पाण्यासाठी मराठवाडा गोदावरी पाटबंधारे कार्यालयावर शाई फेकली..

आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुका लढविल्या? किंवा आतापर्यंतचा राजकीय प्रवास? (Election Contested or Political Journey)

संजय जाधव या शिवसैनिकातील क्षमता ओळखून 1991 मध्ये त्यांची परभणी शहरप्रमुख म्हणून प्रथम नियुक्ती झाली. त्यानंतर नगरपरिषदेमध्ये उमेदवारी मिळाली, मात्र यश आले नाही. अखेर 2001 च्या नगर परिषद निवडणुकीत यश मिळाले आणि पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. या संधीचे सोने करत जाधव यांनी मेहनत घेत लक्षवेधी काम केले. 2002 मध्ये पक्षाने त्यांना जिल्हाप्रमुखपदी बढती दिली. या काळात संजय जाधव यांचे कार्यक्षेत्र वाढले. संपूर्ण जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली.

शिवसेना स्टाईल आंदोलनाची जिल्ह्यातील सरकारी अधिकाऱ्यांनी धास्ती घेतली होती. पक्षाविस्तारासाठी केलेल्या दमदार कामगिरीमुळे 2004 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना परभणी विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली. संजय जाधव भरघोस मतांनी निवडून आले. 2009 मधील विधानसभा निवडणुकीत पक्षाने पुन्हा एकदा संजय जाधव या नावाला पसंती दिली. 2009 मध्ये संजय जाधव दुसऱ्यांदा आमदार झाले. परभणी जिल्ह्यातील मतदार कायमच शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिला, मात्र निवडून आलेल्या खासदारांनी पक्ष बदलण्याची दुर्दैवी परंपरा निर्माण झाली. अशोक देशमुख, सुरेश जाधव, तुकाराम रेंगे, गणेश दुधगावकर यांनी पक्ष बदलले. संजय जाधव यांनी मात्र पक्ष बदलण्याच्या परंपरेला ब्रेक लावला.

Parbhani Lok Sabha Constituency | Sanjay Jadhav
Uday Samant: 'पदाधिकारी भाजपचे, सेवा ठाकरे गटाची'; उदय सामंतांनी सुनावले खडेबोल

2014 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने संजय जाधव यांना लोकसभा जिंकून आणण्याची जबाबदारी दिली. मतदारांनी आमदार संजय जाधव यांना भरघोस मतांनी निवडून देत दिल्लीला पाठवले. निवडून येण्याची हमी असल्याने 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने दुसऱ्यांदा संजय जाधव यांना उमेदवारी दिली. संजय जाधव दुसऱ्या वेळेस लोकसभेत पोहोचले. 2022 मध्ये शिवसेनेत बंडाळी झाली, मात्र खासदार संजय जाधव हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत उभे राहिले आणि निष्ठावंत असल्याचे सिद्ध केले. पक्षाने त्याना नुकतेच शिवसेना उपनेतेपदी बढती दिली आहे.

आतापर्यंत केलेली सामाजिक कामे? (Social Work in the Constituency)

संजय जाधव हे 1987 पासून समाजकारणात सक्रिय आहेत. राजे संभाजी मित्र मंडळाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्यास प्रारंभ केला. राजे संभाजी मित्र मंडळाचा नवरात्र महोत्सव या समस्त परभणीकरांसाठी आकर्षणाचे केंद्र असतो. याच माध्यमातून त्यांनी रुग्णांना आवश्यक मदत करण्याचे कार्य सुरू केले.

2019 मधील निवडणूक लढविली होती का? त्याचा निकाल काय लागला? (Whether Contested 2019 Lok Sabha Election)

2019 मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढवली आणि विजय झाले.

Parbhani Lok Sabha Constituency | Sanjay Jadhav
Mahendra Dalvi : शिंदे गटाच्या आमदाराची 'महावितरण'च्या अभियंत्याला जीवे मारण्याची धमकी; ऑडिओ क्लिप व्हायरल

2019 मधील निवडणूक निकालात विजय मिळाला असल्यास त्याची कारणे काय होती? पराभव झाला असल्यास त्याची कारणे काय होती? (Reasons for Winning the Election or Losing the Election)

शिवसेना-भाजप युतीमध्ये परभणी लोकसभा मतदारसंघ कायमच शिवसेनेकडे राहिला आहे. तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीमध्ये परभणीची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसने लढवली. परभणी लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. परभणी लोकसभेसाठी शिवसेनेची उमेदवारी म्हणजे खासदारकीची हमी इतके हे घट्ट समीकरण आहे. 2019 मधील लोकसभा निवडणुकीत संजय जाधव हे शिवसेनेकडून तर राजेश विटेकर हे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. संजय जाधव यांना 5,38,941 मते मिळाली तर राजेश विटेकर यांना 4,96,742 मते प्राप्त झाली. शिवसेनेच्या संजय जाधव यांचा विजय झाला. वंचित बहुजन आघाडीचे आलमगीर खान यांनीही मैदान गाजवले. त्यांना तब्बल 1,49,946 मते मिळाली. शिवसेना-भाजपची युती असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा लाभ झाला.

Parbhani Lok Sabha Constituency | Sanjay Jadhav
Maharashtra Politics : तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं तर पोराला...; बंडू जाधवांचा ठाकरेंना घरचा आहेर

मतदारसंघातील जनसंपर्क कसा आहे? (Public Relation in Constituency)

संजय जाधव हे मतदारसंघातील मतदारांना तसेच कार्यकर्त्यांसाठी उपलब्ध असतात. संपर्क कार्यालयात तसेच निवासस्थानीही ते अभ्यागतांना वेळ देतात.

सोशल मीडियावरील प्रसिद्धीबद्दल? (Social Media Handles)

संजय जाधव यांची भाषणे, उपक्रमांचे फेसबुक, एक्स X (ट्विटर), इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर अपडेट असतात.

उमेदवाराने केलेली महत्त्वाची राजकीय विधाने किंवा वक्तव्ये (Political Statements made by Candidate)

महाविकास आघाडी सत्तेत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत झालेल्या वादानंतर सामान्य शिवसैनिकावर अन्याय होत असल्याबाबत संजय जाधव यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. यासाठी त्यांनी पक्षप्रमुखांकडे राजीनामाही दिला होता. शिवसेनेतील बंडाळीनंतर औंढा नागनाथ येथे झालेल्या पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना जाधव यांनी पक्षातील बंडाळीबद्दल केलेले विधान वादग्रस्त ठरले होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदी आरूढ झाले, मात्र त्यांनी आपला मुलगा आदित्य ठाकरे यांनाही मंत्री केले, हे न पटल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केली, असे विधान त्यांनी केले होते. मात्र यासंदर्भात स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले की, आपण पक्षाशी एकनिष्ठच आहोत. मात्र माध्यमांनी आपले संपूर्ण भाषण न दाखवता केवळ काही भाग दाखवला आहे. कुख्यात दहशतवादी रिंधाच्या टोळीने संजय जाधव यांना धमकी दिल्याचे प्रकरणही गाजले होते.

राजकीय गुरु कोण? (Political Godfather/Guru)

रवींद्र वायकर. संजय जाधव यांच्या राजकीय कारकिर्दीत शिवसेनेचे तत्कालीन परभणी संपर्कप्रमुख रवींद्र वायकर यांचा सिंहाचा वाटा आहे. रवींद्र वायकर यांनी संजय जाधव यांच्यातील क्षमता ओळखून त्यांना शहरप्रमुख, नगर परिषदेची उमेदवारी आणि जिल्हाप्रमुख अशी महत्त्वाची जबाबदारी दिली. संजय जाधव यांनीही वायकर यांच्या अपेक्षांची पूर्ती करत पक्षसंघटन मजबूत केले.

Parbhani Lok Sabha Constituency | Sanjay Jadhav
NCP State President : अजितदादांची इच्छा असेल तरच मी प्रदेशाध्यक्ष होतो; जयंतरावांनी पवारांपुढे ठेवली होती अट

सकारात्मक मुद्दे (Positive Points about candidate)

संजय जाधव हे शिवसेनेच्या आक्रमक हिंदुत्वाचा चेहरा आहेत. कुठल्याही कामाबाबत संदिग्ध भूमिका न घेता रोखठोक भूमिका व सडेतोड बोलणे हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे. यामुळे आलेला व्यक्ती क्षणिक नाराज झाला तरी गोड बोलून वेळ मारून नेण्याचे काम संजय जाधव यांनी कधीही केले नाही. संजय जाधव यांचे व्यक्तिमत्व धार्मिक वृत्तीचे आहे. दरवर्षी पंढरपूरची पायी वारी करणे भजन, कीर्तनात सहभागी होण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे धार्मिक क्षेत्रात, भाविक वर्गात त्यांचा चाहता वर्ग आहे.

प्रसिद्ध कथावाचक पं. प्रदीपकुमार मिश्रा यांची शिवमहापुराण कथेचे त्यांनी यशस्वीपणे आयोजन केले. भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत लाखोंच्या संख्येने गर्दी केली. प्रसिद्ध कथावाचक बागेश्वर धाम सरकार येथील धीरेंद्र शास्त्री यांच्या हनुमंत कथेचेही अशाच पद्धतीने आयोजन केले होते. परभणीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली मोठे जनआंदोलन उभारले गेले.

नकारात्मक मुद्दे (Negative Points about candidate)

परभणी जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत सर्वसामान्य जनतेमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत होती. विशेषतः राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक वर्षे रखडले होते. संबंधित कंत्राटदारांनी काम अर्धवट सोडले होते. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेक अपघात होऊन त्यामध्ये नागरिकांना जीव गमवावा लागला होता. जाधव यांच्या विरोधकांनी या प्रश्नावर संजय जाधव यांना घेरले आणि आरोप -प्रत्यारोप झाले. रेल्वेच्या प्रश्नांबाबतही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या प्रश्नावर संजय जाधव यांनी पाठपुरावा करणे आवश्यक होते, असाही तक्रारीचा सूर विरोधकांकडून काढण्यात येतो.

उमेदवारी न मिळाल्यास काय होऊ शकते (If didn’t get chance to contest Lok Sabha election what will be the consequences)

खासदार संजय जाधव हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याने महाविकास आघाडीच्या जागावाटपात परभणी लोकसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडे असणार हे उघड आहे आणि विद्यमान खासदार संजय जाधव हेच उमेदवार असतील, हेही स्पष्ट आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार असल्यामुळे जाधव यांना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सहकार्य असेल, मात्र जाधव यांच्या प्रतिस्पर्धीकडे मोदींच्या आक्रमक प्रचाराचे पाठबळ असणार आहे. उमेदवारी नाही मिळाली तरी ते बंडखोरी करणार नाहीत.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com