Parbhani District APMC : बेबनाव, तरी नेत्यांनी आपापले गड राखत आघाडीला ताकद दिली..

Market Committee : बेबनाव उघडपणे दिसून येत होता. मात्र तरीही महाविकास आघाडीने जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये मिळवलेले यश उजवे ठरते.
Parbhani APMC Election News
Parbhani APMC Election NewsSarkarnama

Marathwada : परभणी जिल्ह्यात झालेल्या दहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Parbhani District APMC) निवडणुकीत यंदा महाविकास आघाडीची सरशी झाली आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांनी व लोकप्रतिनिधींनी आपापले गड राखले आहेत. हे करत असतांना सत्ताधारी भाजप-शिंदे गटाला रोखत महाविकास आघाडीला ताकदही दिली. जिल्ह्यातील बहुतांश सहकारी संस्था, ग्रामपंचायत ताब्यात असतांनाही महाविकास आघाडीला काही बाजार समित्यांमध्ये मात खावी लागली. याचे एकमेव कारण महाविकास आघाडीतील लोकप्रतिनिधींचे एकमेकांशी बिघडलेले हितसंबंध.

Parbhani APMC Election News
Dharashiv District APMC: महाविकास आघाडीला मिळालेले यश, सत्ताधारी आमदारांसाठी धोक्याची घंटा ?

खासदार संजय जाधव, (Sanjay Jadhav) आमदार सुरेश वरपुडकर, डॉ. राहूल पाटील, बाबाजानी दुर्राणी यांच्यासह माजी आमदार विजय भांबळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांनी त्यांच्या प्रभावक्षेत्रातील बाजार समितीत्यावर बहुमतासह सत्ता मिळवली. (Mahavikas Aghadi) तर दुसरीकडे भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर व रासपचे डॉ. रत्नाकर गुट्टे यांना मात्र त्यांच्याच मतदारसंघात दोन बाजार समित्यांवर पाणी सोडावे लागले.

जिल्ह्यातील ११ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका सुरु आहेत. त्यापैकी १० निवडणुकीचे मतदान पूर्ण होऊन निकाल ही घोषित झाले. एकमेव मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. (Parbhani) जिल्हात झालेल्या १० कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मात्र महाविकास आघाडी प्रणित पॅनलने बाजी मारली आहे. (Marathwada) जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायत, सहकारी संस्था या राष्ट्रवादी कॉग्रेस, कॉग्रेस व शिवसेना (ठाकरे गटाच्या) ताब्यात आहेत. त्यामुळेच त्यांना हे यश सहजरित्या पटकविता आले.

त्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांचा ही मोठा वाटा आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. कारण या बाजार समिती निवडणुकीच्या वेळी अनेक नाट्यमय घटना घडल्या होत्या. याच बाजार समितीचे माजी सभापती विजय जामकर यांचा अर्ज छाननीत अवैध ठरला होता. त्यानंतर महाविकास आघाडीकडून दाखल झालेल्या ११ उमेदवारांचे अर्जही मागे घेण्यात आले नव्हते. नंतर या अतिरिक्त ठरलेल्या ११ उमेदवारांनी अधिकृत उमेदवारांना पाठींबा दिला होता.

परंतू त्यांना बाद मतांचा फटकाही बसल्याचे पहावयास मिळाले. या ठिकाणी शिवसेना (ठाकरे गटाचे) खासदार संजय जाधव व कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर यांनी लक्ष घातले होते. पाथरी बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे सय्यद खान यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांना आव्हान दिले होते. त्यामुळे या ठिकाणचा निकाल अनपेक्षित लागेल अशी चर्चा होती. या ठिकाणची निवडणुक राष्ट्रवादी कॉग्रेस विरुध्द शिवसेना शिंदे गट, भाजप यांच्यात झाली. यात १२ उमेदवार विजयी करत आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी त्यांचे वर्चस्व सिद्ध केले आहे.

Parbhani APMC Election News
Nilanga APMC Result News: निलंगेकरांकडून परफेक्ट नियोजन अन् करेक्ट कार्यक्रम..

सोनपेठ बाजार समितीच्या निवडणुकीत परत एकदा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकरांनी त्यांचा प्रभाव कायम ठेवला. या ठिकाणी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या विरोधात शिवसेना (शिंदे गट), भाजप व कॉग्रेसही मैदानात होती. परंतू या सर्वांना पराभूत करत सर्वच्या सर्व १८ उमेदवार राष्ट्रवादी कॉग्रेसचे विजय झाले. राजेश विटेकरांनी पुन्हा एका निर्विवाद वर्चस्व प्रस्तापित केले. पूर्णेतही खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीची निवडणुक घेण्यात आली. त्यात महाविकास आघाडीने १८ पैकी १५ जागा जिंकत सत्ता मिळवली.

शिवसेना शिंदे गट, भाजप व रासपच्या पॅनला केवळ तीन जागेवर समाधान मानावे लागले. गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीतही महाविकास आघाडीचा वरचष्मा दिसून आला. आमदार रत्नाकर गुट्टे यांचा हा मतदार संघ असतांनाही महाविकास आघाडीने या ठिकाणी १० जागा जिंकत सत्ता स्वताकडे ठेवली. आमदार गुट्टे यांच्या पॅनलाला केवळ ८ जागा मिळाल्या. या ठिकाणी माजी आमदार सीताराम घनदाट, डॉ. मधुसुदन केंद्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य भगवान सानप या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांची प्रतिष्ठा पणाला लावली होती. ताडकळस बाजार समितीमध्ये मात्र त्रिशंकु परिस्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणी रासप प्रणित पॅनला ९, कॉग्रेसला ६ तर राष्ट्रवादी कॉग्रेसला ३ जागा मिळाल्या.

Parbhani APMC Election News
Sharad Pawar Retirement News: रोजंदारीचे कामगार देखील म्हणतात, पवार साहेबच हवेत!

बोर्डीकर, गुट्टेंना मतदार संघातच अपयश

जिंतूरच्या भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांचा मतदार संघ जिंतूर व सेलू या दोन तालुक्याचा आहे. जिंतूर हे त्यांचे होमपिच आहे, त्यामुळे त्या ठिकाणच्या बाजार समितीमध्ये बहुमत त्यांच्या बाजून आले आहे. १८ पैकी १४ जागेवर भाजप विजयी झाली आहे. मात्र त्यांच्याच मतदार संघातील सेलू बाजार समितीवर माजी आमदार विजय भांबळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने १० उमेदवार विजयी करत बहुमत मिळवले. भाजपला या ठिकाणी केवळ ६ जागा मिळाल्या, या ठिकाणी सत्तातंतर झाले आहे.

दुसरीकडे गंगाखेडेच रासप आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांना खुद्द गंगाखेड बाजार समितीमध्येच आठ जागेवर समाधान मानावे लागले. या ठिकाणी महाविकास आघाडीच्या पॅनलने १० जागा मिळवून बहुमत स्व:ताकडे ठेवले. पालममध्ये मात्र रासप, शिवसेना शिंदे गटाने १४ जागा मिळवून यश संपादन केले. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या कॉग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) व राष्ट्रवादी कॉग्रेस यांच्या नेत्यामध्ये या निवडणुकीत बेबनाव दिसून आला.

निवडणुकीच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादी कॉग्रेसकडून परभणी बाजार समितीच्या बाबतीत भाजपला पाठींबा देण्याचे घोषित केले होते. त्याच बरोबर महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेतही राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांची अनुपस्थिती खटकली होती. त्यावरूनच महाविकास आघाडीतील नेत्यांचा बेबनाव उघडपणे दिसून येत होता. मात्र तरीही महाविकास आघाडीने जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये मिळवलेले यश उजवे ठरते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com