Parbhani Lok Sabha Constituency : महादेव जानकरांचे पार्सल भाजपनेच परत पाठवले ? बोर्डीकर, लोणीकरांच्या मतदारसंघातून जाधवांना लीड

Mahadev Jankar साताऱ्यातून आलेले हे पार्सल भविष्यात डोईजड ठरेल या भितीतून भाजपनेच परत पाठवले की काय? अशी चर्चा जिल्ह्यात सुरू झाले आहे.
Mahadev Jankar
Mahadev JankarSarkarnama

Parbhani loksabha Constituency : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना लोकसभेच्या परभणी मतदारसंघातून उतरवण्याची महायुतीची खेळी त्यांच्या अंगलट आली. साताऱ्यातून आलेले हे पार्सल भविष्यात डोईजड ठरेल या भितीतून भाजपनेच परत पाठवले की काय? अशी चर्चा जिल्ह्यात सुरू झाले आहे.

त्याला कारण म्हणजे भाजपचे विद्यमान आमदार असलेल्या मेघना बोर्डीकर यांच्या जिंतूर आणि परतूरचे आमदार तथा माजी मंत्री बबनराव लोणीकर या दोघांच्या मतदारसंघात जानकर पिछाडीवर गेले. इथून महाविकास (MVA) आघाडीचे संजय उर्फ बंडू जाधव यांना मताधिक्य मिळाल्याचे समोर आले आहे.

जानकर यांच्यासाठी हक्काच्या समजल्या जाणाऱ्या जिंतूर व परतूर या दोन्ही विधानसभेच्या मतदारसंघात त्यांना पिछाडीवर जावे लागले. इथून शिवसेना ठाकरे गटाचे संजय जाधव यांना अनुक्रमे 12 हजार 645 व 25 हजार 344 एवढे मताधिक्य मिळाले. ही आकडेवारी समोर आल्यानंतर आता महायुतीतील (Mahayuti ) इतर घटक पक्षांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Mahadev Jankar
Harshvardhan Jadhav News : 'माझी लायकी दाखवून दिलीत', चांगलं झालं.. हर्षवर्धन जाधव झाले उद्विग्न !

मराठवाडा आणि राज्यभरात महायुतीचे दिग्गज पराभूत झाल्याने आता महायुतीत कुरबुरी सुरू झाल्या आहेत. बारामतीत सुनेत्रा पवार याचा पराभव झाल्यानंतर अजित पवार यांनी थेट शिवसेना शिंदे गट आणि भाजपची मतं आम्हाला मिळाली नाहीत, असा आरोप करत नाराजीचा सूर लावला आहे.

त्यातच परभणीमध्ये विजयाची खात्री असतांना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून ही जागा महादेव जानकरांसाठी (Mahadev Jankar) भाजपने सोडवून घेतली होती. मात्र आता भाजपचे आमदार असलेल्या मतदारसंघातच जानकरांना मते मिळाली नाही, हे स्पष्ट झाले आहे. परभणीतील गंगाखेड विधानसभा मतदार संघ वगळता इतर पाच ही मतदार संघात संजय जाधव यांना आघाडी मिळाली.

Mahadev Jankar
Udayanraje & Pankaja Munde : पंकजाताईंना दिलेला शब्द उदयनराजे पाळणार; राजीनामा देणार का?

तसे पाहिले तर संजय जाधव हे पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होते. शेवटपर्यंत त्यांची आघाडी कायम होती. परभणी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणी गेल्या 32 वर्षापासून शिवसेनेचा आमदार विजयी होत आलेला आहे. विद्यमान आमदार डॉ. राहूल पाटील हे या ठिकाणी प्रतिनिधत्व करतात. या मतदारसंघातून संजय जाधव यांना तब्बल 1 लाख 8 हजार 374 मते मिळाली.

तर महादेव जानकर यांना 65 हजार 974 मते मिळाली. हाच मतदारसंघ जाधव यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला असे म्हटले जात आहे. कारण सर्वाधिक 42 हजार 400 ऐवढे मताधिक्य जाधव यांना या मतदारसंघातून मिळाले. पाथरी विधानसभा मतदार संघात संजय जाधव यांना 1 लाख 11 हजार 906 मते मिळाली तर महादेव जानकर यांना 82 हजार 735. या मतदार संघात जाधव यांना 29 हजार 171 मतांचे मताधिक्य मिळाले.

या मतदारसंघात कॉग्रेसचे सुरेश वरपुडकर हे आमदार आहेत. घनसावंगी विधानसभा मतदार संघातून संजय जाधव यांना 89 हजार 914 तर महादेव जानकर यांना 59 हजार 656 मते मिळाली. या मतदार संघात संजय जाधव यांना 30 हजार 258 मतांची लीड आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार राजेश टोपे हे या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. गंगाखेड या एकमेव विधानसभा मतदारसंघात जानकर यांना 6 हजार 711 मताची आघाडी मिळाली. त्यामुळे या पराभवाचे खापर जानकरांनी भाजपच्या माथी फोडले नाही म्हणजे मिळवलं, असेच म्हणावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com