Harshvardhan Jadhav News : 'माझी लायकी दाखवून दिलीत', चांगलं झालं.. हर्षवर्धन जाधव झाले उद्विग्न !

Aurangabad Lok Sabha Constituency : यापुढे लोकांनी त्यांची कामे नव्या खासदारांकडूनच करून घ्यावीत. कारण तुम्हीच त्यांच्या कामावर विश्वास दाखवून त्यांना मते दिली आहेत. मला जबाबदारीतून मुक्त केलं त्याबद्दलही आभार..
Harshwardhan Jadhav Lok Sabha
Harshwardhan Jadhav Lok Sabha

Chhatrapati Sambhajinagar : गेल्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष लढून तब्बल 2 लाख 83 हजारांवर मतं मिळवून मराठा फॅक्टर दाखवून देणारे हर्षवर्धन जाधव 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र सपशेल फेल ठरले. अपक्ष म्हणून निवडणूक लढलेल्या जाधव यांना यावेळी फक्त 39 हजार एवढी मतं मिळाली. या पैकी 36 हजार मतं ही जाधव यांनी दोन वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलेल्या कन्नड-सोयगाव मतदारसंघामधील आहेत.

गेल्या निवडणुकीत पावणे तीन लाखांवर मतदान घेणाऱ्या हर्षवर्धन जाधव यांना मराठा आरक्षणाच्या मुद्यावर दुसऱ्यांदा मात्र मतदारांनी थारा दिला नाही. कन्नड-सोयगाव वगळता संपुर्ण जिल्ह्यात जाधव यांना अवघी तीन हजार मतं मिळवता आली. यामुळे संतप्त झालेल्या जाधव यांनी सोशल मिडियाच्या (Social Media) माध्यमातून उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त केली.'माझी लायकी दाखवून दिलीत, ते चांगल केलं'. पिशोर गावात महायुतीच्या संदीपान भुमरे यांना माझ्यापेक्षा जास्त मतं मिळाली. त्यामुळे संदीपान भुमरे हे कन्नड-सोयगाव मतदारंसघात, जिल्ह्यात माझ्यापेक्षा चागलं काम करु शकतील असं दिसतयं. शेतकऱ्यांचे प्रश्न पीक विमा, वीज बील, बियाणे, मराठा आरक्षणाचा प्रश्न या सगळ्याच मुद्यावर मी काहीच काम केले नाही, हे सिद्ध होतंय, असे जाधव म्हणाले.

कन्नड-सोयगांव मतदारसंघातून भुमरेंना 68 हजार मते मिळाली आहेत. त्यामुळे यापुढे लोकांनी त्यांची कामे नव्या खासदारांकडूनच करून घ्यावीत. कारण तुम्हीच त्यांच्या कामावर विश्वास दाखवून त्यांना मते दिली आहेत. मला जबाबदारीतून मुक्त केलं त्याबद्दलही आभार. संभाजीनगरमध्ये मला पाडलं, तिकडे जालन्यात रावसाहेब दानवेंना पाडलं. आता संदीपान भुमरे तुमचे सगळे प्रश्न सोडवतील, तेव्हा तुम्हाला शुभेच्छा देतो. भुमरे खासदार झालेत, त्यांनाही शुभेच्छा देतो. माझं पुढे काय करायचं ते मी ठरवीन, अशा शब्दात हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या मतदारसंघातील मतदारांवर राग व्यक्त केला.

Harshwardhan Jadhav Lok Sabha
Sandipan Bhumare : 'या' त्रिमूर्तींनी दिलं भुमरेमामांना लीड; पण मंत्र्यांच्या मतदारसंघात पिछेहाट

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्यात आमदारकीचा राजीनामा देणारे हर्षवर्धन जाधव हे पहिले आमदार (MLA) ठरले होते. या शिवाय आरक्षणाच्या मुद्द्यावर सातत्याने त्यांनी आक्रमक भूमिका घेत थेट दिल्लीत उपोषण केले होते. गेल्या निवडणुकीत मराठा समाजाने जाधव यांना एकगठ्ठा मते दिली होती, परंतु विजयासाठी ती अपुरी पडली. याचा फटका शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांना बसला आणि ते पराभूत झाले. दोघांच्या भांडणात स्पर्धेतही नसलेल्या एमआयएमचे इम्तियाज जलील यांची लॉटरी लागली आणि ते निवडून आले. मत विभाजन त्यांच्या पथ्यावर पडले आणि संभाजीनगरात एमआयएमचा झेंडा पहिल्यांदा फडकला.

Harshwardhan Jadhav Lok Sabha
Jalna Lok Sabha Constituency : दानवेंच्या पराभवानंतर जालन्यात 'स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा'...

ही चूक आणि मतांचे विभाजन टाळण्यासाठी मराठा मतदार महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिल्याचे त्यांना मिळालेल्या मताधिक्यावरून स्पष्ट झाले. मत विभाजन टळले आणि तब्बल 26 वर्षांनी संभाजीनगरला मराठा खासदार मिळाला. मात्र मतदारांनी नाकारल्यामुळे संतापलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी सोशल मिडियावरून आपली उद्विग्नता व्यक्त केली आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Harshwardhan Jadhav Lok Sabha
Beed Lok Sabha Constituency : विजयाचा गुलाल घेऊनच बजरंग बाप्पांनी घेतली जरांगे पाटलांची भेट..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com