Beed Loksabha Election : OBC नेत्या म्हणवून घेणाऱ्या पंकजा मुंडे तेव्हा कुठे होत्या? ; टी.पी.मुंडेंचा सवाल!

T.P Munde Vs Pankaja Munde : बीड लोकसभा निवडणुकीसाठी ओबीसीचा सक्षम उमेदवार देणार असल्याची घोषणाही केली.
T.P Munde and Pankaja Munde
T.P Munde and Pankaja MundeSarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election 2024 : ओबीसी आरक्षणाला धक्का लागत असताना ओबीसी नेत्या म्हणवून घेणाऱ्या पंकजा मुंडे तेव्हा कुठे होत्या, असा सवाल ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. टी. पी. मुंडे यांनी केला. बीड लोकसभा निवडणुकीसाठी ओबीसीचा सक्षम उमेदवार देणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीच्या आंदोलनाने जोर धरल्यानंतर राज्याचे नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांच्या पुढाकाराने राज्यभर ओबीसी एल्गार मेळावे झाले. जालना जिल्ह्यात झालेल्या पहिल्या मेळाव्या वेळी पंकजा मुंडे व धनंजय मुंडे या दोघांचेही बॅनरवर नाव होते. मात्र, भाजपने इतर नेत्यांना या मेळाव्याला पाठविल्याने आपण गेलो नाही, असे पंकजा मुंडे यांनी जाहीर केले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

T.P Munde and Pankaja Munde
Dhananjay Munde News : पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी धनंजय मुंडे मैदानात; अमरसिंह पंडितांच्या बैठकीला उपस्थिती!

बीडच्या मेळाव्यातही त्यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा समोर आल्यानंतर खुद्द छगन भुजबळ यांनी भाषणात अप्रत्यक्ष टीकाही केली होती. दरम्यान, आता पंकजा मुंडे( Pankaja Munde) यांच्या ओबीसी आरक्षण मेळाव्यातील अनुपस्थितीचा मुद्दा प्रा. टी. पी. मुंडे यांनी उपस्थित केला आहे.

परळी येथील ओबीसी मेळाव्यात प्रा. मुंडे म्हणाले, राज्यात ओबीसी समाजाची ताकद प्रचंड आहे. ओबीसींचे आरक्षण धोक्यात आले तर ओबीसीचा विकास खुंटला जाईल. महाराष्ट्रात ओबीसी समाजाचे २१ मेळावे घेण्यात आले. प्रत्येक मेळाव्यात लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता.

सर्वांच्या मतानुसार ओबीसींच्या स्वतंत्र पक्षाची स्थापना करण्यात आली. सरकारने आमच्या ताटातला घास काढून घेण्याचा प्रयत्न केल्यास ओबीसी त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असेही प्रा. टी. पी. मुंडे म्हणाले.

T.P Munde and Pankaja Munde
Beed Politics : कुटेंना प्रवेश देऊन भाजपने काय 'साधले'? सहा लाख गरिबांचे दोन हजार कोटींच्या ठेवी मिळेनात...

यावेळी मराठवाडा विभागातील पदाधिकाऱ्यांना टी.पी. मुंडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. मराठवाडा अध्यक्ष म्हणून भीमराव मुंडे, बीड जिल्हाध्यक्ष विनायक गडदे, तालुकाध्यक्ष सूर्यकांत मुंडे आणि तालुका उपाध्यक्ष माणिकराव सलगर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी भीमराव मुंडे, रिपाइंचे दशरथ शिंदे, प्रभाकर फड, संतराम गडदे, भागवत सलगर, आप्पाराव पांढरे महाराज, ओमप्रकाश सारडा, अनिल मस्के, अशोक नागरगोजे, इंद्रोबा दहिफळे, छत्रपती कावळे, मीरा जगताप आदी उपस्थित होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com