Parbhani News : परभणी लोकसभा मतदारसंघातील निवडणूक सर्वाधिक चर्चेची आहे. कारण या ठिकाणी दोन वेळा शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर शिवसेनेचे उमेदवार संजय ऊर्फ बंडू जाधव खासदार राहिले आहेत. आता ते तिसऱ्या वेळी खासदार होण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र या वेळी त्यांच्याकडे धनुष्यबाण नसून मशाल हे निवडणूक चिन्ह आहे, तर दुसरीकडे महायुतीकडून रासपचे महादेव जानकर रिंगणात आहेत. मात्र या मतदारसंघात मराठा विरुद्ध ओबीसी अशा संघर्ष उभा राहिल्याचे चित्र दिसून येत होते. स्वत: जानकर म्हणाले की, काही मराठा तरुणांचा रोष असू शकतो. (Lok Sabha Election 2024)
महादेव जानकर यांनी 'सरकारनामा'ला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना मराठा विरुद्ध ओबीसी लढाईच्या मुद्द्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. 'ज्या मराठवाड्यातून मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला. त्याच मराठवाड्यात तुमचा परभणी हा लोकसभा मतदारसंघ येतो. त्यामुळे मराठा आणि ओबीसी हा ध्रुवीकरणाचा जो मुद्दा आहे, यामुळे निवडणुकीत तुम्हाला काही अडचण निर्माण होईल का? असा प्रश्न सरकारनामाच्या वतीने जानकरांना विचारण्यात आला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या प्रश्नावर जानकर म्हणाले, "अंतरवाली सराटी हे गाव माझ्याच लोकसभा मतदारसंघात म्हणजे परभणीत आहे. या देशात पहिलं आरक्षण छत्रपती शाहू महाराज यांनी दिलं. त्याचं घटनेत रुपांतर करण्याचं काम डॅा. बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. एखाद्या जातीला आरक्षणात घालणं किंवा काढणं आमचं काम नसतं. यासाठी दोन तृतीयांश बहुमत संसदेत लागतं. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मिटींग झाली तेव्हा राज्यातील सर्व पक्षांचे नेते म्हणजे एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, रामदास आठवले प्रकाश आंबेडकर, बच्चू कडू, विनय कोरे बैठकीत होते. या बैठकीत ठरलं असं की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यायचं. "
जानकर पुढे म्हणाले, "आता मुद्दा काढला जातो की आऱक्षण टिकेल का? आम्ही दिल्लीत बसलोय ना. मराठ्यांमध्ये दोन टक्के लोकं सुधारलेले आहेत. 98 टक्के लोकं मागास आहेत. जमीन नाही. मुलांची लग्न होत नाही. त्यांना आरक्षण देणं गरजेचं आहे. दलित तरुणांच्या उद्धारासाठी बार्टी आहे, तर मराठ्यांसाठी सारथी स्थापन केलं पाहिजे, अशी माझी भूमिका होती.
"आज मराठा समाजातील (Maratha Reservation) काही तरूण आहेत. ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष चाललेला आहे. पण आम्ही त्यांना समजावतो. असे तरुण माझ्याकडे आले तर त्यांच्याशी मी संवाद साधतो. तेव्हा ते माझे समर्थक बनतात. मला आता अनुभव यतोच आहे. पाच - सहा वेळा काही तरुण माझ्या गाडीपुढे येऊन घोषणा देत होते. मी म्हणालो, या बसा. मी त्यांची समजूत काढल्यानंतर ते म्हणाले,साहेब तुम्हीच आम्हाला आरक्षण देऊ शकता. जे विरोध करतात त्यांना मी सांगितलं की, मराठा -धनगर आणि माळी एकाच आईची लेकरं आहेत, असं गुलामगिरीत महात्मा फुलेंनी लिहलं आहे, असे जानकर म्हणाले.
"मराठा बांधवांना मी एवढेच सांगेन की, तु्म्ही जी माझ्याबद्दल शेवटच्या दिवशी जे काही बोंबबोंब उठवणार आहात, मराठा विरु्ध जानकर असं काही मुद्दा नाही. माझ्या पक्षाचे दोन आमदार मराठा झाले. सभापती मराठा झाले. माझाल पक्ष कोणत्याही जाती धर्माविरुद्ध नाही. एकही विधान माझं समाजाविरोधात गेलेलं नाही. आम्ही भांडणं लावणारी माणसं नाही आम्ही जोडणारी माणसं आहे, असे जानकर (Mahadev Jankar) म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.