PM Modi and Uddhav Thackeray
PM Modi and Uddhav ThackeraySarkarnama

PM Modi and Uddhav Thackeray : मोदींपाठोपाठ परभणीत उद्धव ठाकरेंचीही तोफ प्रचार सभेतून धडाडणार!

Parbhani Loksabha Constituency : परभणी लोकसभा मतदारसंघासाठी 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

Loksabha Election 2024 : महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (ता.20) परभणीत प्रचार सभा घेणार आहेत. या सभेची जय्यत तयारी सुरू असतानाच ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही मोदींपाठोपाठ 23 एप्रिल रोजी परभणीत सभा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे गटाचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारासाठी होणाऱ्या या सभेकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

शिवसेनेचा गड समजल्या जाणाऱ्या परभणीत खासदार संजय जाधव(Sanjay Jadhav) यांना उद्धव ठाकरे यांनी तिसऱ्यांदा लोकसभेची उमेदवारी दिली. आतापर्यंत, उद्धव ठाकरे यांचे दोन मराठवाडा दौरे झाले आहेत, पण यात परभणीचा समावेश नव्हता. हिंगोली, नांदेड जिल्ह्यात ठाकरे यांनी दोन दिवस दिले, पण शेजारच्या परभणीत त्यांनी एकही बैठक किंवा सभा घेतली नव्हती. दुसरीकडे महायुतीकडून महादेव जानकर यांना लोकसभेची उमेदवारी झाल्यापासून भाजप-राष्ट्रवादी व मित्रपक्षांनी परभणीत प्रचारासाठी जोर लावल्याचे चित्र आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

PM Modi and Uddhav Thackeray
Sambhajinagar: ... अन् तेव्हाच शिवसेनेने 'खान-बाण'चे राजकारण संपवले; दानवेंचे ओवेसींना प्रत्युत्तर

एवढेच नाही, तर जानकरांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीस, पवार आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे(Pankaja Munde) आवर्जून उपस्थित होत्या. पण दोन वेळा परभणीतून लोकसभेवर निवडून गेलेले आणि तिसऱ्यांदा मैदानात असलेल्या संजय जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ठाकरे गटाचा मुंबईतून एकही मोठा नेता आला नव्हता.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि जिल्ह्यातील स्थानिक महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तिकडे धाराशिवमध्ये ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यासाठी स्वतः आदित्य ठाकरे हजर होते. संजय जाधव यांच्याकडे पक्षाच्या नेतृत्वाचे दुर्लक्ष का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

PM Modi and Uddhav Thackeray
Parbhani Loksabha Constituency: जानकर यांचा दावा दोन लाखांच्या मताधिक्याचा, तर जाधव म्हणतात हॅटट्रिक तर करणारच!

परभणी लोकसभा मतदारसंघासाठी 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. म्हणजेच प्रचार संपण्याच्या एक दिवस आधी शेवटच्या सभेसाठी उद्धव ठाकरे परभणीत येणार आहेत. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्याआधी आदित्य ठाकरेंची सभा किंवा दौरा परभणीत होणे अपेक्षित होते, पण तसेही नियोजन दिसत नाही. एकीकडे महायुतीचे उमेदवार जानकरांसाठी राज्य आणि देशपातळीवरचे नेते एकवटले असताना महाविकास आघाडीचे संजय ऊर्फ बंडू जाधव मात्र एकाकी असल्याचे चित्र आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com