Parbhani Loksabha Constituency News : हिंदुत्व, निष्ठा अन् ठाकरेंबद्दलची सहानुभूती खासदार जाधवांना तारणार...

MP Sanjay Jadhav : उद्धव ठाकरे यांच्याशी ते एकनिष्ठ राहिले. यामुळेच त्यांना शिवसेना उपनेतेपदी बढती देण्यात आली.
Parbhani Loksabha Constituency
Parbhani Loksabha ConstituencySarkarnama
Published on
Updated on

Marathwada Shivsena News : परभणी जिल्हा हा शिवसेनेच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. याच जिल्ह्याने शिवसेनेला राजकीय पक्षाची मान्यता आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळवून दिले होते. शिवसेनेचा कायम बालेकिल्ला राहिलेला आणि गद्दारांना धडा शिकवणारा जिल्हा म्हणून परभणी ओळखला जातो. (Parbhani Loksabha Constituency ) बाळासाहेबांची शिवसेना फुटली, तिचे दोन तुकडे झाले याचे शल्य सर्वाधिक परभणीच्या हिंदुत्ववादी मतदारांना आहे.

Parbhani Loksabha Constituency
Hingoli Loksabha Constituency : मोपलवारांची दुसरी इनिंग ? हिंगोलीमधून युतीची उमेदवारी मिळण्याची शक्यता...

मराठवाड्यात अनेक जिल्ह्यांत शिवसेनेचे (Shivsena)आमदार, खासदार फुटले; पण परभणीचे खासदार, आमदार ठाकरेंच्या पाठीशी कायम राहिले. आता याच निष्ठा, हिंदुत्व आणि पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला असलेली सहानुभूती या जोरावर विद्यमान खासदार संजय (बंडू) जाधव (MP Sanjay Jadhav) दुसऱ्यांदा बाजी मारण्याच्या तयारीत आहेत. जाधव या त्रिसूत्रीचा अवलंब करताना दिसून येत आहेत.

परभणीमध्ये नुकत्याच झालेल्या पंडित प्रदीपकुमार मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेनंतर आता पुढील महिन्यात डिसेंबरमध्ये बागेश्वर धामचे मठाधिपती धीरेंद्र शास्त्री यांच्या हनुमंत कथेचे आयोजन (Parbhani) परभणीत खासदार जाधव यांच्या वतीने करण्यात आले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना परभणीकरांनी नेहमीच साथ दिली आहे. परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची उमेदवारी म्हणजे खासदारकीची हमी इतके हे समीकरण पक्के आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेला खासदार पक्ष सोडून जाण्याचीही परंपराही याच मतदारसंघात पाहायला मिळते. माजी खा.स्व. अशोक देशमुख, सुरेश जाधव, तुकाराम रेंगे आणि गणेश दुधगावकर या सर्वांनी शिवसेना पक्ष सोडून अन्य पक्षात प्रवेश केला. मात्र, पक्ष त्यागानंतर यापैकी कोणालाही आजतागायत राजकारणात यश मिळवता आलेले नाही. विद्यमान खासदार संजय जाधव यांनी मात्र पक्ष त्यागाची परंपरा मोडून काढली.

इतकेच नव्हे तर शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतरही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी ते एकनिष्ठ राहिले. यामुळेच त्यांना शिवसेना उपनेतेपदी बढती देण्यात आली. जाधव हे आध्यात्मिक वृत्तीचे म्हणून ओळखले जातात. ते प्रतिवर्षी पंढरपूरची वारी करतात, नवरात्र उत्सव साजरा केला जातो. या वेळी वारकरी संप्रदायातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तनं आयोजित करण्यात आली होती. परभणी शहरात सप्टेंबर महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या प्रसिद्ध कथावाचक पंडित प्रदीपकुमार मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे जाधव मुख्य यजमान होते.

भाविकांनी या कथेला अभूतपूर्व असा प्रतिसाद दिला. आता पुन्हा ६ व ७ डिसेंबर रोजी जाधव यांच्या वतीने प्रसिद्ध कथावाचक बागेश्वर धाम यांच्या हनुमान कथेचे आयोजन करण्यात आले आहे. तीन महिन्यांत दोन धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन त्यात लाखोंची गर्दी जमवून जाधव आपली हिंदुत्ववादी प्रतिमा अधिक घट्ट करू पाहत आहेत. गेल्या साडेचार वर्षांच्या कार्यकाळात खासदार जाधव यांच्या कार्यपद्धतीवर विरोधकांनी टीका, आरोप केले. पण या सगळ्यावर हिंदुत्व, निष्ठा आणि सहानुभूतीच्या जोरावर जाधव मात करण्याचा प्रयत्न करत आहेत.

हिंदुत्वाचा आक्रमक चेहरा म्हणून जाधव यांची ओळख आहे. शिवसेनेत बंडाळी झाल्यानंतर ठाकरे घराण्याविषयी निष्ठा असणाऱ्या मतदारात उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहानुभूती आहे. ती सहानुभूती मतदानात परावर्तित झाली तर जाधव यांना फायदेशीर ठरणार आहे. निवडणुकीला सामोरे जाताना भावभक्ती, हिंदुत्वाची शक्ती आणि ठाकरेंबद्दल सहानुभूती या जमेच्या बाजू असल्या तरी रस्त्यांच्या प्रश्नासंदर्भात जनतेत असलेली नाराजी, भाजपच्या उमेदवाराला मिळणारी प्रचारशक्ती, यांचा सामनाही त्यांना करावा लागणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com