Parbhani Mayor News: परभणीत महापौर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा की काँग्रेसचा? आरक्षण सोडतीमुळे सस्पेन्स वाढला

Parbhani municipal corporation : परभणी महापालिकेत सर्वसाधारण आरक्षणामुळे महापौरपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना आणि काँग्रेसमध्ये चुरस निर्माण झाली असून अल्पसंख्याक प्रतिनिधित्वाचा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे.
Leaders and corporators of Shiv Sena (UBT) and Congress during discussions over mayoral selection in Parbhani Municipal Corporation after general category reservation announcement.
Leaders and corporators of Shiv Sena (UBT) and Congress during discussions over mayoral selection in Parbhani Municipal Corporation after general category reservation announcement.Sarkarnama
Published on
Updated on

Municipal Corporation News : परभणी महापालिकेत शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस पक्षाने आघाडी करत शिवसेना-भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादी पक्षाला धक्का दिला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 25 नगरसेवक निवडून आणत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान पटकावला. तर काँग्रेसने 12 जागा जिंकत भक्कम साथ देत परभणी महापालिकेवर आघाडीचा झेंडा फडकवला. महापौर पदाच्या आरक्षणात सर्वसाधारण गटाला संधी मिळाली. त्यानंतर आता परभणी महापालिकेत उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा महापौर बसणार की काँग्रेसचा? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

उद्धव ठाकरेंच्या पक्षाने हिंदुत्व सोडले असा आरोप सातत्याने राज्यातील सत्ताधारी शिवसेना-भाजपकडून सातत्याने केला जातो. परभणी खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी एकत्र येत महाविकास आघाडीची मोट बांधली. दोन्ही पक्षांनी मुस्लिम मतदारांची निर्णायक संख्या लक्षात घेता मोठ्या प्रमाणात या समाजाला प्रतिनिधित्व दिले. आता महापौर पदावरही महाविकास आघाडीकडून अल्पसंख्याक नगरसेवकाला संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकसभा निवडणुकीत परभणीमध्ये महाविकास आघाडीने विजयाचा झेंडा रोवला होता. या विजयात मुस्लिम मतांचा भूमिकाही महत्वाची ठरली होती. हाच प्रयोग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसने महापालिका निवडणुकीतही केला आणि तो कमालीचा यशस्वी ठरला. त्यामुळे महापौर पदाच्या शर्यतीत आघाडीकडून धक्कादायक नाव पुढे येऊ शकते.

महानगरपालिका निवडणूकीत उद्धव ठाकरेंचा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यांचे 25 नगरसेवक निवडून आले आहेत. तर ग्रेसचे 12 नगरसेवक विजयी झाले आहेत. या आघाडीने बहुमताचा आकडा देखील ओलांडला आहे. परभणीचे महापौरपद सर्वसाधारण गटासाठी सुटल्यानंतर सर्वसाधारण गटातील उमेदवारांच्या आनंदाला उधाण आले आहे.

शिवसेनेकडून महापौरपदाचे प्रबळ दावेदार म्हणून माजी उपमहापौर सय्यद समी उर्फ माजुलाला, शाम खोबे, दिलीपसिंग ठाकुर व सय्यद इकबाल सय्यद खाजा यांची नावे चर्चेत आहेत. खासदार संजय जाधव व आमदार डॉ. राहुल पाटील या पैकी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मुस्लीम समाजाला महापौर पदावर संधी देण्याचा आश्चर्यकारक निर्णय देखील या नेत्यांकडून घेतला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे.

दरम्यान, विभागीय आयुक्त कार्यालयाकडून सर्वच पक्षाच्या प्रमुखांना गटनेते, नगरसेवकांच्या नोंदणी संदर्भात पत्र मिळाले आहे. त्या-त्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष, पक्षाचे नेते यांची गट नेते निवडण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. भाजपकडून तिरुमला मुकूंद खिल्लारे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून महापौर व गटनेता स्वतंत्र दिला जाऊ शकतो, अशीही चर्चा आहे. सय्यद समी उर्फ माजुलाला, शाम खोबे, दिलीपसिंग ठाकुर, सय्यद इकबाल सय्यद खाजा या नावांसह प्रतिमा अतुल सरोदे यांच्या नावांवर खल सुरू असल्याचे बोलले जाते.

Leaders and corporators of Shiv Sena (UBT) and Congress during discussions over mayoral selection in Parbhani Municipal Corporation after general category reservation announcement.
Jalna Municipal Corporation News : जालना महापालिकेत महापौर पदाचा पहिला मान स्त्री शक्तीला; 'या' आहेत रेसमध्ये..

महापौर पदावर भाजपचाही दावा..

महानगरपालिका निवडणूकीत भाजपाला 12 जागा मिळाल्या. परंतु या पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी पत्रकात परिषदेत महापौर भाजपाचा होणार असा दावा केला आहे. आम्हाला एक मोठा पक्ष समर्थन देणार असल्याचे सांगत त्यांनी खळबळ उडवून दिली आहे. त्यानंतर परभणीमध्ये भाजपच्या ऑपरेशन लोटसची चर्चा सुरू झाली आहे. महापौरपद भाजपाला मिळवायचे असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस (12), जनसुराज्य पक्ष (3), यशवंत सेना (1) व अपक्ष (1) हे सर्व एकत्र आले तरी बहुमत गाठणे शक्य नाही. त्यांना अन्य पक्षातील सदस्य फोटावे लागणार आहे, पण ते सध्या तरी शक्य वाटत नाही.

Leaders and corporators of Shiv Sena (UBT) and Congress during discussions over mayoral selection in Parbhani Municipal Corporation after general category reservation announcement.
Parbhani ZP Elections: माजी मंत्र्यांच्या कुटुंबातील 5 जण झेडपीच्या रिंगणात; तिघे जण भाजपकडून, मुलगी 'मशाल' तर पुतण्या काँग्रेसचा उमेदवार

आरक्षणावर घेतला आक्षेप

मुंबईत आरक्षण सोडतीसाठी माजी उपमहापौर भगवान वाघमारे, सुनिल देशमुख, गुलमीरखान या सदस्यासह उध्दवसेनेचे अतुल सरोदे गेलो होतो. त्यामध्ये परभणी पालिकेचे आरक्षण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी निश्चित केल्या जात होते. यावर आक्षेप नोंदवत या सर्वानी हे आरक्षण यापुर्वीच झाल्याचे नगरविकास विभागाच्या निदर्शनास आणून दिले, त्यानंतर आरक्षण सर्वसाधारण गटासाठी सुटले. काँग्रेसच्या नवनिर्वाचित सदस्यांची शुक्रवारी बैठक होऊन त्यामध्ये गटनेत्याची निवड होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com