

Parbhani News : राज्यात 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समितीसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे राज्यभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच आता नेत्याच्या कुटुंबाबतील घराणेशाहीचा मुद्दा पुढे आला असताना आता परभणी जिल्ह्यातील भाजपच्या माजी मंत्र्यांच्या कुटुंबातील पाच जण मैदानात उतरल्याचे पुढे आले आहे. भाजपकडून मुलगा, सून आणि पुतण्याला त्यांनी रिंगणात उतरवले आहे तर उबाठा शिवसेनेकडून मुलगी तर काँग्रेसकडून आणखी एक पुतण्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने ही निवडणूक लक्षवेधी ठरत आहे.
आगामी काळात होत असलेल्या परभणी जिल्हा परिषद निवडणुकीत माजी मंत्री, ज्येष्ठ नेते सुरेश वरपुडकर यांनी काही दिवसापूर्वीच काँग्रेससोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत परभणी महापालिकेत मोठे फेरबदल पाहावयास मिळाले. त्यामुळे सर्वांचे लक्ष त्याकडे लागले आहे. त्यातच आता सुरेश वरपुडकर यांच्या कुटुंबातील तब्बल पाच जण वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून निवडणूक लढवत असल्याने मोठी चर्चा रंगली आहे.
एकाच कुटुंबातील पाच सदस्य वेगवेगळ्या पक्षांतून जिल्हा परिषद निवडणूक लढवत असल्याने सोशल मिडीयावर याबाबत जोरात चर्चा रंगली आहे. घराणेशाही, पक्षनिष्ठा आणि स्थानिक राजकारण या सर्व मुद्द्यांवरून परभणी जिल्ह्यातील ही निवडणूक सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत असून, मतदार काय निर्णय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपकडून (BJP) सुरेश वरपुडकर यांचा मुलगा, सून आणि पुतण्या तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून मुलगी तर काँग्रेसकडून आणखी एक पुतण्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे येत्या काळात ही निवडणूक विशेष लक्षवेधी ठरत आहे. भाजपचे माजी मंत्री सुरेश वरपुडकर हे परभणी जिल्ह्यातील प्रभावी व ज्येष्ठ नेते मानले जातात. काही महिन्यांपूर्वी त्यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला असून, महापालिका निवडणुकीत त्यांच्यावर निवडणूक प्रमुख म्हणून महत्त्वाची जबाबदारीही सोपवण्यात आली होती. आता जिल्हा परिषद निवडणुकीतही त्यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे.
परभणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कुटुंबातील पाच जण विविध पक्षांकडून निवडणूक लढवत असल्याने राजकीय वर्तुळात तसेच सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली. सुरेश वरपुडकर यांचे चिरंजीव समशेर वरपुडकर हे सिंगणापूर जिल्हा परिषद गटातून भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. तर त्यांची पत्नी प्रेरणा वरपुडकर या दैठणा गटातून भाजपच्या उमेदवार म्हणून मैदानात उतरल्या आहेत. तसेच वरपुडकर यांचे पुतणे बोनी वरपुडकर हे लोहगाव गटातून भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या सर्व लढतीकडे लक्ष लागले आहे.
त्यासोबतच सुरेश वरपुडकर (Suresh warpudkar) यांच्या कन्या सोनल देशमुख या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. झरी जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार राहुल पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे एका बाजूला भाजप, तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांची शिवसेना असा थेट सामना एकाच कुटुंबात पाहायला मिळत आहे.
लोहगाव गटातून सुरेश वरपुडकर यांचे दुसरे पुतणे अजित वरपुडकर हे काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. अजित वरपुडकर आणि सुरेश वरपुडकर यांचे राजकीय मतभेद सर्वश्रुत असून, याआधीही दोघांमध्ये फारसे सख्य नसल्याची चर्चा होती. तसेच बोनी वरपुडकर यांचे वडील विजय वरपुडकर आणि सुरेश वरपुडकर यांच्यातही पूर्वी मतभेद होते. मात्र जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बंधूनी जुळवून घेतल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.