Sanjay Jadhav : बोर्डिकरांचं मतदान नसताना त्या कशा आल्या? भाजपच्या पैशांच्या वापरावर ठाकरेंचा खासदार प्रचंड संतापला

Shiv Sena UBT News : परभणी महापालिका निवडणुकीत भाजपकडून पैशांचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत खासदार संजय जाधव यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून लोकशाही धोक्यात असल्याचे म्हटले आहे.
Shiv Sena UBT MP Sanjay Jadhav addressing media in Parbhani, strongly criticizing alleged misuse of money power by BJP during municipal corporation elections.
Shiv Sena UBT MP Sanjay Jadhav addressing media in Parbhani, strongly criticizing alleged misuse of money power by BJP during municipal corporation elections.Sarkarnama
Published on
Updated on

Parbhani Municipal Corporation News : भाजपकडून पैशाचा वारेमाप वापर महापालिका निवडणुकीतही सुरू आहे. पैशाच्या जोरावरच निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या जाणार असतील तर त्या न घेतलेल्या बऱ्या, अशा शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय जाधव यांनी संताप व्यक्त केला. भाजपने लोकशाहीला घातक अशी पद्धत निवडणुकीत आणली आहे, असा आरोपही त्यांनी केला.

भाजपने लोकशाहीला घातक अशा पद्धतीने निवडणुका करून ठेवल्या आहेत. त्यांना लोकशाहीपेक्षा ठोकशाहीच मान्य आहे. निवडणुकांमध्ये पैशांचा धुमाकूळ घातला जात असून पैशाच्या जोरावरच सत्तास्थापना करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची टीका संजय जाधव यांनी केला. जर पैशाच्या आधारेच निवडणुका होत असतील, तर निवडणुका न घेतलेल्या बऱ्या. पैशाच्या माध्यमातून अविचाराला प्रोत्साहन दिले जात आहे.

मतदारांना पैसा वाटायचा आणि त्यानंतर 5 वर्षे फिरकायचेही नाही, हीच मानसिकता भाजपची झाली आहे. भाजपने केवळ गप्पा मारू नयेत, तर जनतेसमोर त्यांच्या कार्याचा हिशेब द्यावा, असे आव्हान देत जाधव यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली. सध्याच्या राजकारणात विचार, मूल्ये आणि लोकहित बाजूला पडत असून पैशालाच सर्वाधिक महत्त्व दिले जात असल्याचे ते म्हणाले.

Shiv Sena UBT MP Sanjay Jadhav addressing media in Parbhani, strongly criticizing alleged misuse of money power by BJP during municipal corporation elections.
'भोकरदमध्येही प्रचार करेल', संजना नेमकं काय बोलल्या? Sanjan Jadhav, Raosaheb Danve, Jalna Election

सत्ताधाऱ्यांनी कितीही पैसे वाटले तरी परभणीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच महापौर होणार असा दावा संजय जाधव यांनी केला. जनतेचा कौल आणि कार्यकर्त्यांची ताकद आमच्या पाठीशी असून भाजपचे डावपेच यशस्वी होणार नाहीत. प्रशासन सत्ताधीशांच्या ताटाखालचे मांजर झाले असून त्यांच्यावर प्रचंड दबाव आहे. त्यामुळे प्रशासनाकडून काय अपेक्षा करणार? असा सवाल करत त्यांनी रात्री 10 वाजता सर्वसामान्यांसाठी सर्व काही बंद करण्यात आले, मात्र भाजपच्या लोकांना मोकळे सोडण्यात आले, असा आरोप केला.

Shiv Sena UBT MP Sanjay Jadhav addressing media in Parbhani, strongly criticizing alleged misuse of money power by BJP during municipal corporation elections.
Parbhani Election: 'क्रॉस वोटिंग'च्या भीतीने उमेदवार धास्तावले! प्रभाग पद्धत ठरतेयं डोकेदुखी

प्रशासन निष्पक्षपणे काम करत नसून सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली निर्णय घेत असल्याचे ते म्हणाले. आपण पत्नी व कुटुंबासह मतदानाला आलो होतो तर निवडणूक अधिकाऱ्यांनी मी माणसं घेऊन आलो असं म्हणत मला रोखले. दुसरीकडे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे इथे मतदान नसताना त्या इकडे कशासाठी आल्या होत्या? त्यांना प्रशासनाचे अधिकारी का रोखत नाहीत? असा सवालही संजय जाधव यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com