Mahayuti Vs MahaVikas Aghadi : मुस्लीम नेते महायुतीसोबत, महाविकास आघाडीसाठी धोक्याची घंटा…

Parbhani : अनेक मुस्लीम नेते, पदाधिकाऱ्यांची महायुतीला साथ...
Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Marathwada News : परभणी जिल्ह्यात मुस्लीम समाजातील नेतृत्वाने कायमच काँग्रेस, राष्ट्रवादीची साथ दिली तर शिवसेना व भाजपला दूर सारले. मात्र काळाची पावले ओळखत शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे सईद खान यांच्या नेतृत्वात परभणी येथील काँग्रेसचे नेते माजुलाला यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी यापूर्वीच अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्ह्यातील हे तीनही मुस्लीम (Muslim) समाजातील प्रमुख नेतेमंडळी महायुतीसोबत गेल्यामुळे महाविकास आघाडीसाठी ही धोक्याची घंटा समजली जाते. संसदीय लोकशाही शासन व्यवस्थेत निवडणुकीमध्ये मत हीच खरी ताकद आहे. मुस्लीम समाजाचे मतदान हे नेहमीच एकगठ्ठा होते. एकगठ्ठा मतांचा परिणाम थेट निवडणूक (Election) निकालांवर होत असल्यामुळे मुस्लीम समाजाची मते निर्णायक असतात. (Mahayuti Vs MahaVikas Aghadi)

Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Latur Lok Sabha Constituency: लातूरमध्ये भाजप भाकरी फिरवणार, खासदार श्रृंगारेंना...

भारतीय जनता पक्षाचा हिंदुत्वाचा नारा आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आक्रमक हिंदुत्वाचे विचार यामुळे मुस्लीम समाजाने शिवसेना-भाजपशी कायम अंतर राखत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जवळ केले. मुस्लीम मतदार वर्षानुवर्षे काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभा राहिला. काँग्रेस नेतृत्वानेही मुस्लीम मतांची नेहमीच काळजी घेतली. यासाठी पक्षावर तुष्टीकरणाचे सुध्दा आरोप झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तेलंगाना येथील एआयएमआयएम या मुस्लीम समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पक्षाला प्रारंभी समाजाने अनुकूल कौल दिला. यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी मध्ये अस्वस्थता निर्माण झाली. परंतु एमआयएमला मतदान म्हणजे शिवसेना-भाजप उमेदवाराच्या विजयास हातभार होत असल्याचे दिसून आले. तसेच ओवेसी बंधूंकडून अतिशय कडव्या विचारांचा प्रसार होत असल्यामुळे मुस्लीम समाजातही एमआयएमबद्दल साशंकता निर्माण झाली. एमआयएमला भाजपची बी टीम म्हणून आरोप केले गेले. मात्र अन्य कोणताही राजकीय पर्याय दिसत नसल्याने मुस्लीम समाज पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळण्याची चिन्हे दिसू लागली.

Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Sanjay Bansode : लातूर लोकसभेसाठी मंत्री संजय बनसोडेंच्या नावाची चर्चा; कमळ की घड्याळ चिन्हावर लढणार याची उत्सुकता

शिवसेना शिंदे गटाचा पर्याय 

काँग्रेस, एमआयएमकडून निराश झालेल्या मुस्लीम नेतृत्वाने अखेर शिवसेना शिंदे गटाकडे जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी पद स्वीकारल्यापासून राज्यातील मुस्लीम समाजातील नेत्यांना पक्षात आणण्यात त्यांनी यश मिळवले आहे. परभणीतील काँग्रेसचे नेते माजुलाला यांनी नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

त्यांच्यासोबत राज्यातील मुस्लीम समाजातील तब्बल दीडशे नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यातील बहुतांश नेते काँग्रेस, राष्ट्रवादीमधील आहेत. राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी यापूर्वीच अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीसाठी ही धोक्याची घंटा समजली जात आहे.

Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Dharashiv Loksabha : धाराशिव लोकसभेसाठी अजित पवारांची दादागिरी ; भाजपही अनुकूल ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com