Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama

Eknath Shinde PA : एकनाथ शिंदेंच्या पीएचे बनावट फेसबुक अकाऊंट, दिला सावधानतेचा इशारा!

Prabhakar Kale Fake Facebook Account : सोशल मीडियाच्या माध्यमातून नेते, अधिकारी यांच्या नावाने फेक अकाऊंट तयार करून पैशांची मागणी करण्याच्या घटना वाढत असताना उपमुख्यमंत्री शिंदेंच्या पीएचे नावाने बनावट अकाऊंट उघडल्याचे समोर आले आहे.
Published on

Thane News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खाजगी स्वीय सहाय्यक (पीए) प्रभाकर काळे यांच्या नावाने फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अज्ञात व्यक्तीने काळे यांचा फोटो व नाव वापरून हे अकाऊंट तयार केल्याची माहिती समोर आली.

'प्रभाकर काळे' या नावाने सुरू असलेले फेसबुक अकाऊंट माझे नसून नागरिकांनी त्या अकाऊंटशी कोणताही संवाद साधू नये, असे स्पष्ट आवाहन पीए प्रभाकर काळे यांनी केले आहे. तसेच, त्या अकाऊंटवरून कोणतीही माहिती शेअर करू नये, पैशांची मागणी झाल्यास ती देऊ नये आणि शक्य असल्यास अकाऊंट रिपोर्ट करावे, असेही त्यांनी सांगितले.

सोशल मीडियाच्या माध्यमातून नेते, अधिकारी यांच्या नावाने फेक अकाऊंट तयार करून चॅट किंवा फोनद्वारे नागरिकांकडे पैशांची मागणी करण्याच्या घटना वाढत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या प्रकरणी ठाणे पोलिसांच्या सायबर सेलमार्फत तपास व कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Eknath Shinde
Thane Muncipal : ठाणे महापालिका प्रशासनाच्या कारभारावर भाजपचे बोट, तीन वर्षांच्या हिशोबाची केली मागणी

पोलिसांकडून सावधानतेचा इशारा

राजकीय नेत्यांची, त्यांच्या पीएची बनावट अकाऊंट बनवून आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांकडून खात्री केल्याशिवाय अशा बनावट अकाऊंटवर विश्वास ठेवू नये तसेच कोणतेही आर्थिक व्यवहार करू नये असे आवाहन यापूर्वीच केले आहे.

Eknath Shinde
Sahar Shaikh News: 'कैसे हराया' म्हणत आव्हाडांना डिवचणाऱ्या 'MIM'च्या सहर शेखची तेलंगणातही जादू; ओवैसींसमोरच गाजवलं भाषण

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com