Raosaheb Danve : रावसाहेब दानवे म्हणतात 'चारशे पार' प्रचंड बहुमताने पुन्हा भेटू...

Raosaheb Danve : सतराव्या लोकसभेच्या शेवटच्या अधिवेशनाचे आज सूप वाजले. अनेकजण संसदेला नमस्कार करून ऋण व्यक्त करत होते, तर अनेकांच्या डोळ्यात अश्रूही तरळले.
Raosaheb Danve
Raosaheb Danve Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : सतराव्या लोकसभेच्या शेवटच्या अधिवेशनाचे शनिवारी सूप वाजले. अनेक आठवणींची शिदोरी घेऊन सर्वच खासदार पुन्हा या सभागृहात येण्याची इच्छा व्यक्त करत बाहेर पडले. अनेकजण संसदेला नमस्कार करून ऋण व्यक्त करत होते, तर अनेकांच्या डोळ्यात अश्रूही तरळले. अधिवेशनाचा शेवटाचा दिवस संसद भवन परिसरात खासदारांच्या गर्दीने गजबजून गेला होता. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या.

मराठवाड्यातील जालना लोकसभा मतदारसंघातून दानवे सलग पाचवेळा लोकसभेवर निवडून गेले. आज अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी त्यांनी सहकारी खासदारांसोबत संसद भवनासमोर फोटो काढत अठराव्या लोकसभेत चारशे पार बहुमतासह पुन्हा भेटूया, अशा भावना व्यक्त केल्या आहेत. 17 व्या लोकसभेच्या शेवटच्या अधिवेशनाचा आज समारोप झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Raosaheb Danve
Parbhani Loksabha Constituency : ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव शड्डू ठोकून मैदानात, पण...

विकसित भारत करण्याचा संकल्प करीत पुढचा प्रवास सुरु झाला. या पाच वर्षात मुख्यतः 370 कलम हटविणे, महिलांना आरक्षण देणे, ट्रिपल तलाख, गरीब कल्याण अन्न योजना, श्रीराम मंदिराचे पुनर्निर्माण व ब्रिटिशकालिन कायदे रद्द करणे ही या 17 व्या लोकसभेची मोठी उपलब्धी आहे. जालना - छत्रपती संभाजीनगर लोकसभा क्षेत्रातील मतदारांमुळे खासदार म्हणून स्वातंत्र्यानंतर ते अमृतकाळापर्यंतच्या पाच लोकसभेचं मला भाग होता आलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात या केंद्र सरकारचा मंत्री म्हणून भारतीय संसदेच्या जुन्या आणि नव्या दोन्हीही सदनाचे साक्षिदार मला होता आलं, ते केवळ जालना-छत्रपती संभाजीनगर लोकसभा क्षेत्रातील जनतेच्या प्रेमामुळेच, असे म्हणत त्यांनी जनतेचे आभार व्यक्त केले. तसेच 18 व्या लोकसभेमध्ये 400 च्या पार प्रचंड बहुमतानी पुन्हा भेटूया, असा विश्वासही व्यक्त केला.

(Edited By-Ganesh Thombare)

Raosaheb Danve
Shivsena UBT : उद्धव ठाकरेंच्या संभाजीनगर दौऱ्यात चंद्रकांत खैरेंची उमेदवारी फिक्स ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com