Pathri Municipal Council : माजी आमदार बाबाजाणी दुर्रानींच्या आरोपांना वैतागले : पाथरी नगरपालिकेने शोधला जालीम उपाय

Municipal meeting live stream : शुक्रवारी होणाऱ्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. असा उपक्रम राबविण्याची पाथरीतील ही पहिलीच वेळ असल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. गेल्या काही दिवसांत पालिकेतील सत्ताधारी गटावर विरोधकांकडून विविध विषयांवरून सातत्याने आरोप केले जात आहेत.
Babajani Durrani
Citizens gather outside Pathri Municipal office watching the live streaming of the council meeting on a large LED screen, promoting transparency in governance.Sarkarnama
Published on
Updated on

Parbhani News, 26 Mar : गेल्या काही दिवसात पाथरी नगरपालिकेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्या कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावरून खटके उडत आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार बाबाजानी दुर्राणी हे व त्यांच्या पक्षाचे इतर सदस्य सातत्याने सत्ताधारी पक्षावर आरोप करत असतात.

यावर सत्ताधारी पक्षाने आता पारदर्शक कारभार म्हणत नगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेचे थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला आहे. नगरपालिकेच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी, विरोधकांकडून होणारे आरोप खोडून काढण्यासाठी येथील पालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी हा महत्त्वपूर्ण, ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

शुक्रवारी (ता. 27) होणाऱ्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. असा उपक्रम राबविण्याची पाथरीतील ही पहिलीच वेळ असल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. गेल्या काही दिवसांत पालिकेतील सत्ताधारी गटावर विरोधकांकडून विविध विषयांवरून सातत्याने आरोप केले जात आहेत.

Babajani Durrani
Ashok Kharat Case : खरातच्या आहारी गेलेल्या आमदाराला बायकोने दरबारात जाऊन भरला होता दम, 'त्या' माजी मंत्र्याचीच पडली विकेट?

सभेतील चर्चा, निर्णय, विकास कामांच्या मुद्द्यांवरून होणारे आरोप-प्रत्यारोप, मुद्दे अनेकदा सामान्यांपर्यंत पोचत नाहीत. त्यामुळे सभेतील नेमकी वस्तुस्थिती जनतेसमोर मांडण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी थेट प्रक्षेपणाचा मार्ग निवडला आहे.

सर्वसामान्यांना पालिकेच्या सभेचा वृत्तांत, आपल्या प्रभागातील लोकप्रतिनिधी नेमकी काय भूमिका मांडतात, हे पाहता यावे यासाठी पालिका कार्यालयाबाहेर मोठा एलईडी लावण्यात येणार आहे. याद्वारे सभेचे कामकाज दाखविले जाणार आहे. त्यातून कामकाजात पारदर्शकता येईल. अफवांना पूर्णविराम मिळेल, असा विश्वास सत्ताधारी गटाकडून व्यक्त केला जात आहे.

Babajani Durrani
Uddhav Thackeray Meeting : उद्धव ठाकरेंच्या बैठकीत खडाजंगी; प्रियांका चतुर्वेदी उठून गेल्या, खासदारांची 'ती' मागणी अन् आदित्य ठाकरेही नाराज!

एकाधिकारशाहीची प्रथा मोडीत काढणार

गेली पस्तीस वर्षे एकाधिकारशाहीने पाथरी पालिकेचा कारभार चालला आहे. ही प्रथा मोडीत काढून सर्व कामे पारदर्शक करण्यासाठी व घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोचण्यासाठी आम्ही सभेच्या थेट प्रक्षेपणासाठी पालिका कार्यालयाबाहेर मोठा एलईडी स्क्रीन लावण्याचा निर्णय घेतला असल्याचे नगराध्यक्ष आसेफ खान यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com