Uddhav Thackeray Meeting : उद्धव ठाकरेंच्या बैठकीत खडाजंगी; प्रियांका चतुर्वेदी उठून गेल्या, खासदारांची 'ती' मागणी अन् आदित्य ठाकरेही नाराज!

Aaditya Thackeray Priyanka Chaturvedi Shivsena UBT MP : उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या बैठकीमधील इनसाईड स्टोरी समोर आली आहे. या बैठकीत ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली.
Aaditya And Uddhav Thackeray .jpg
Aaditya And Uddhav Thackeray .jpgSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदारांना फोडण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेंकडून करण्यात येत असल्याची चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी 'मातोश्री'वर खासदारांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये खडाजंगी झाल्याची माहिती आता समोर आली आहे.

खासदार फुटणार चर्चेमुळे उद्धव ठाकरे खासदारांवर नाराज होते. ते म्हणाले, मला एनसीपीचे लोक सांगतात तुमचे खासदार फुटणार आहेत. पण माझा तुमच्यावर विश्वास आहे. ही लढाई मी तुमच्या भरवश्यावर लढत आहे. आणि लढायचं नसेल तर तसं सांगा मी थांबतो.

त्यातच राज्यसभेची शिवसेनेची हक्काची जागा होती मात्र ती जागा शरद पवारांना सोडल्याने प्रियंका चतुर्वेदी यांनी बैठकीत आपली नाराजी बोलून दाखवली. ⁠शरद पवारांना राज्यसभा दिली म्हणून प्रियांका चतुर्वेदींनी संजय राऊतांवर नाराजी व्यक्त केली तसेच त्या बैठकीतून उठून गेल्या.

Aaditya And Uddhav Thackeray .jpg
Rajya Sabha Election: आदित्य ठाकरेंनीच पलटवला संजय राऊतांचा डाव..., 2028 ला राज्यसभेच्या खासदारकीची वाट अवघड?

खासदारांनी आपल्या समस्या उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडल्या. जिल्हा परिषद निवडणूक आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत पक्षातील मोठ्या नेत्यांकडून पाठबळ मिळाले नाही. उद्धव ठाकरे हे मुंबई महापालिकेमुळे मुंबईत अडकून पडले होते.

मात्र, आदित्य ठाकरे आणि इतर मोठ्या नेत्यांनी मुंबईबाहेर पडायला हवे होते, मत व्यक्त करत आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रात फिरावं अशी विनंती खासदारांनी केली. त्यामुळे आदित्य ठाकरे खासदारांवर नाराज असल्याचे सुत्रांनी सांगितले.

Aaditya And Uddhav Thackeray .jpg
MVA Rajya Sabha: 'मविआ'कडून शरद पवारांना राज्यसभेसाठी उमेदवारी, 'मातोश्री' अन् 'दिल्ली'हून 24 तासांतच सूत्रं फिरली; 4 कारणं ठरली महत्त्वाची?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com