Laxman Hake News : लक्ष्मण हाकेंसोबत गेवराईत दंड थोपटत आव्हान देणाऱ्या पवन कवंर याच्यावर हल्ला!

OBC Activities Injured In Beed District : आरोपींच्या तातडीने मुसक्या आवळा, त्यांना अटक करा अशी मागणी हाके यांनी केली आहे. पोलीस अधीक्षकांनीही चोवीस तासात आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिले आहे.
Laxman Hake Supporter injured In Attack News Beed
Laxman Hake Supporter injured In Attack News BeedSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. माजलगाव जवळील सावरगाव येथे पवन कवंर यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

  2. लक्ष्मण हाके यांच्यासोबत उभे राहताना आमदार विजयसिंह पंडित समर्थकांना दिलेल्या आव्हानामुळे हा हल्ला झाल्याची चर्चा आहे.

  3. या घटनेमुळे गेवराईच्या राजकारणात खळबळ उडाली असून पोलिस चौकशी सुरू आहे.

Beed Political News : मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. तेव्हापासून पुन्हा राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटला. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी वाहन रॅली काढत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित यांना आव्हान दिले होते. दंड थोपटत मुख्य रस्त्यावर हाके यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते.

त्यावेळी त्यांच्यासोबत पवन कवंर हा तरूण कार्यकर्ताही होता. गाडीवर हातात काठी घेऊन तो विजयसिंह पंडित समर्थकांना आव्हान देत होता. दंड थोपटत गेवराईत फिरणाऱ्या पवन करव याच्यावर रात्री माजलगाव जवळ एका ढाब्यावर जीवघेणा हल्ला झाला. यात कवंर याचे हात पाय फॅक्चर झाले असून डोक्यालाही गंभीर इजा झाल्याचे समजते. दरम्यान, सहकाऱ्यावर जीवणघेणा हल्ला झाल्यानंतर लक्ष्मण हाके (Laxman Hake) संतप्त झाले आहेत.

हाके यांनी बीड पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांची भेट घेऊन पवन कवंर याच्यावर हल्ला करणारे हे गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित (Vijysingh Pandit) यांचे समर्थक आहेत. त्यांच्यासोबतचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे या आरोपींच्या तातडीने मुसक्या आवळा, त्यांना अटक करा अशी मागणी केली आहे. पोलीस अधीक्षकांनीही चोवीस तासात आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिले आहे.

दरम्यान, चोवीस तासात आरोपींना अटक झाली नाही, तर पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा हाके यांनी दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे.महिन्याभरापुर्वी गेवराईतच लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर आमदार विजयसिंह पंडित समर्थकांनी दगड आणि चप्पल भिरकावल्याचा प्रकार घडला होता. तेव्हा कारमधून बाहेर येत हाके यांनी दंड थोपटत आव्हान दिले होते. यावेळी पवन कवंर हाके यांच्यासोबतच कारच्या टपवर बसून काठी फिरवत पंडित समर्थकांना धमकावत होता.

Laxman Hake Supporter injured In Attack News Beed
Laxman Hake Controversy : लक्ष्मण हाकेंनी वाढवलं टेन्शन, म्हणाले, ओबीसीतील 'या' जातींना एससीतून आरक्षण द्या!

कुठे झाला हल्ला?

पवन कंवर काल (मंगळवारी) रात्री काही मित्रांसोबत माजलगाव जवळील एका ढाब्यावर जेवायला गेला होता. त्या ठिकाणी 30 ते 40 जणांनी मिळून त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात पवन कंवर याचा एक हात, पाय फ्रॅक्चर झाला आहे. तसेच डोक्यात देखील राॅडने हल्ला झाल्याचे हाके यांनी म्हटले आहे. काठ्या व लाथाबुक्क्यांनी चौघांना मारहाण झाली आहे.

Laxman Hake Supporter injured In Attack News Beed
‘गोट्या गितेला लवकर अटक करा’ मकोका रद्द होताच बाळा बांगर आक्रमक, Gotya Gite, Bala Bangar, Beed News

केरवाडी पालम येथील रहिवासी पवन कंवर व त्यांचे तीन साथीदार काल सावरगावजवळ एका धाब्यावर जेवण करत होते. त्याच वेळी अज्ञात तरुणांनी येऊन पवन व त्याच्या सहकाऱ्यावर हल्ला चढवला. जखमी अवस्थेत या चौघांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोरांचा शोध पोलीसांकडून सुरू आहे.

FAQs

पवन कवंर यांच्यावर हल्ला कुठे झाला?
उ.१: पवन कवंर यांच्यावर हल्ला माजलागव जवळील एका ढाब्यावर झाला.

प्र.२: हल्ल्याचं कारण काय होतं?
उ.२: विजयसिंह पंडित समर्थकांना आव्हान दिल्यामुळे हा हल्ला झाल्याची चर्चा आहे.

प्र.३: या हल्ल्यात पवन कवंर यांची प्रकृती कशी आहे?
उ.३: त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला असून ते जखमी झाले आहेत.

प्र.४: हल्ल्यामागे कोणाचा हात असल्याची शक्यता आहे?
उ.४: स्थानिक राजकीय वैमनस्य आणि समर्थकांतील संघर्षामुळे हा हल्ला झाल्याची शक्यता वर्तवली जाते.

प्र.५: पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे का?
उ.५: होय, पोलिसांनी या प्रकरणात चौकशी सुरू केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com