Laxman Hake Controversy : लक्ष्मण हाकेंनी वाढवलं टेन्शन, म्हणाले, ओबीसीतील 'या' जातींना एससीतून आरक्षण द्या!

Laxman Hake SC Reservation : लक्ष्मण हाके हे ओबीसींमध्ये मराठा समाजाला आरक्षण नको, अशी भूमिका मांडत असतानाच ओबीसींमधील काही जातींना एससीमधून आरक्षण देण्याची मागणी करत आहेत.
Laxman Hake
Laxman Hake sarkarnama
Published on
Updated on

Laxman Hake News : हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भातील जीआरनंतर मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष निर्माण झाला आहे. या जीआर विरोधात ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके हे राज्यभर दौरा करत आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध करताना सरकाच्या जीआरमुळे ओबीसीमध्ये घुसखोरी होत असल्याचा आरोप ते करत आहेत. दरम्यान, जीआरला विरोध करत असताना त्यांनी ओबीसी समाजातील जातींना अनुसूचित जाती (एससी)मधून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

हाके म्हणाले, धोबी, नाभिक समाजाला एससीमधून आरक्षण द्या. आमचा नाभिक समाज असेल, धोबी समाज असेल, बलुत्या -आलुत्या वाल्यांना एससी आरक्षण मिळावं. देशभरात ते एससीमध्ये येतात. या सगळ्या गोष्टी कोणी एससी एसटीमध्ये देणार असेल, मिळणार असतील तर आम्हाला आनंद आहे ना.'

'पण हे आरक्षण मिळण्याच्याआधी ओबीसींची झोपडी उद्ध्वस्त करण्याची भाषा कोणी करत असेल तर त्यांचा रक्षणसाठी, गावगाड्यातील अठरा पगड जातींच्या हक्कांच्या रक्षणासाठी लक्ष्मण हाके रस्त्यावर उतरेल.', असे देखील त्यांनी सांगितले.

Laxman Hake
Maharashtra Government : एकनाथ शिंदेंच्या माजी आमदाराला 20 कोटींची खिरापत; ही कबुली फडणवीस, अजितदादांना गोत्यात आणणार?

पँथर सेना आक्रमक

लक्ष्मण हाकेंच्या ओबीसींना एससी एसटीतून आरक्षण देण्याच्या वक्तव्यानंतर पँथर सेना आक्रमक झाली आहे. संघटनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी हाकेंना इशारा देत म्हटले की, एससी आरक्षणाकडे वाकड्या नजरेनं पाहू नये, वाकड्या नजरेनं पाहिलं तर डोळे काढून हातात देऊ.

बंजारा समाज एसटीसाठी आग्रही

सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करून मराठा समाजाला कुणबी ठरवत ओबीसीतून आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा केला. त्याच न्यायाने बंजारा समाजाची नोंद हैदराबाद गॅझेटमध्ये एसटीमधून आहे. त्यामुळे अनुसूचित जमातीचे आरक्षण बंजारा समाजाला मिळाले पाहिजे, अशी मागणी करण्यात येत आहे. या मागणीसाठी बुलढाण्यात बंजारा समाजाकडून मोर्चा देखील काढण्यात येणार आहे.

Laxman Hake
Sanjay Gaikwad controversy : 3 कोटींची रोकड अन् 100 बोकड: संजय गायकवाडांचा हा 'पॅटर्न' स्थानिकच्या इच्छुकांत धडकी भरवणारा?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com