High Court : सरकारी जागेवर अतिक्रमित घरात राहणारा लोकप्रतिनिधी अपात्रच ..

Nanded : सरपंच यांनी ग्रामपंचायतीच्या मिळकतीवर अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या घरात वास्तव्य केले आहे.
Bombay High Court Bench Aurangabad
Bombay High Court Bench AurangabadSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधीने निवडणुकीचा अर्ज भरताना शासकीय अतिक्रमित जागेवर राहण्याचे ठिकाण नमूद केलेले असेल आणि नंतर ते घर सोडून दिले असेल तरी कायद्याने अशी व्यक्ती संस्थेच्या सदस्यपदी राहण्यास अपात्र ठरते, असा निष्कर्ष काढत खंडपीठाचे न्या. अरुण पेडणेकर यांनी नांदेड (Nanded) जिल्हाधिकाऱ्यांनी एका सरपंचाला अपात्र ठरवण्याचा निर्णय कायम ठेवला.

Bombay High Court Bench Aurangabad
G-20 News : रेड कार्पेट, फुलांच्या उधळणीत विदेशी पाहुण्यांची लेणी व मकबऱ्याला भेट..

या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा २०१८ सालचा जनाबाई विरुद्ध अप्पर विभागीय आयुक्त व इतर खटल्याचा संदर्भ देण्यात आला होता. (High Court) या खटल्यात सदस्याच्या कुटुंबातील कोणीही शासकीय वा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मालमत्तेवर अतिक्रमण केले असल्यास संबंधित सदस्य त्याचे सदस्यत्व व पदही गमावतो, असा निवाडा केला होता. (Marathwada)

नांदेड जिल्ह्यातील कापसी (ता. लोहा) ग्रामपंचायतीतील सोनाली ढेपे यांनी ॲड. उमाकांत देशमुख यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. याचिकेनुसार प्रतिवादी सरपंच यांनी ग्रामपंचायतीच्या मिळकतीवर अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या घरात वास्तव्य केले आहे. त्याआधारे ढेपे यांनी नांदेड जिल्हाधिकाऱ्यांकडे विवाद अर्ज दाखल करून सरपंचांच्या पद धारण करण्यावर आक्षेप नोंदवला.

नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेऊन ढेपे यांचा आक्षेप मंजूर केला. आणि सरपंचांना पदधारण करण्यास अपात्र ठरवले. सरपंचांनी विभागीय आयुक्तांकडे अपिल दाखल केले. विभागीय आयुक्तांनी सरपंच अपात्र नसल्याचे घोषित केले. त्याविरुद्ध सोनाली ढेपे यांनी खंडपीठात धाव घेतली होती. खंडपीठाने वरीलप्रमाणे निष्कर्ष काढत संबंधित सरपंचांच्या आक्षेपावर नांदेड जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवला.

या निर्णयामुळे अतिक्रमण केलेली मालमत्ता आपल्या नावावर नसून पती, पत्नी, नातेवाईक आदींच्या नावावर असल्याचे सांगून अतिक्रमणाला आपण जबाबदार नाही, अशी पळवाट काढण्याच्या प्रकाराला पायबंद बसण्याची व्यवस्था झाली, असे या प्रकरणी राज्य निवडणूक आयोगातर्फे बाजू मांडलेले ॲड. अजित कडेठाणकर यांनी सांगितले. या प्रकरणी शासनाकडून ॲड. किरण जाधवर, पंचायत समितीतर्फे योगिता थोरात यांनी काम पाहिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com