Modi in Shirdi : मोदींना मराठ्यांची गरज राहिली नाही; उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटलांचा संताप

PM Modi Shirdi Visit Manoj Jarange Patil Reaction : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौऱ्याची आज दिवसभर चर्चा होती. यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
PM Modi, Manoj Jarange Patil
PM Modi, Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation Latest News : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज शिर्डीत येऊन गेले, पण मराठा आरक्षणाबाबत काहीच बोलले नाही. आता जालन्यातील अंतरवाली सराटीत आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. 'पंतप्रधान मोदी आले. मात्र, मराठा आरक्षणावर बोलले नाहीत. मोदींना मराठा आणि क्षत्रिय मराठ्यांची गरज राहिली नाही', असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

PM Modi, Manoj Jarange Patil
Manoj Jarange Indefinite Hunger Strike : मी प्रामाणिकपणे सांगतो; संभाजीराजे छत्रपतींनी जरांगे पाटलांना स्पष्टच सांगितलं

'गोरगरिबांची मोदींना आता गरज राहिली नाही. देशातला मराठा आणि क्षत्रिय मराठा याची त्यांना गरज नाही राहिली. मोदी आले, पण गोरगरिबांवर बोललेही नाहीत. चांगली प्रक्रिया राबवली त्यांनी. ठीक आहे, मिळवू आम्ही आरक्षण', असा ठाम निर्धार जरांगे पाटील यांनी पुन्हा व्यक्त केला.

श्रद्धेय महोदयांना काड्या करायचं माहिती - जरांगे पाटील

श्रद्धेय महोदयांनी विचारात बदल करायला हवा. सापाला दूध पाजण्याचं काम श्रद्धेय महोदयांनी केलं. गोड बोलून सापाला तो जिवंत करत तर नाही ना? हे श्रद्धेय महोदयांना कळत नाही का? आपलाच गेम तर करत नाही ना? आता हे सर्वसामान्यांना कळायला लागलं आहे. श्रद्धेय महोदयांचा शिष्य त्यांचाच आणि सरकारचाच गेम करायला लागला आहे. श्रद्धेय महोदयांचं डोकं कसं ठिकाणावर येत नाही, त्यांना कळत कसं नाही? सरकार आंदोलन शांततेनं हाताळत आहे. आणि आरडाओरडा करणाऱ्या शिष्याचं श्रद्धेय महोदय ऐकणार नाहीत. आम्हाला आशा आहे ते जनतेच्या बाजूने राहतील. आणि शिष्याला बळ देण्याचं कमी करतील, असं जरांगे पाटील म्हणाले. जरांगे पाटील यांचा रोख नेमका कुणाकडे आहे? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री शंभूराज देसाईन यांनी मोठी माहिती दिली आहे. सरकार जरांगे पाटील यांच्या सतत संपर्कात आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जे-जे आवश्यक आहे, ते आम्ही करतोय. मराठा आरक्षणासाठी केंद्राची मदत घ्यावी लागली तर ती घेऊ. आणि महाराष्ट्राला मदत मिळेल, असं मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलं.

PM Modi, Manoj Jarange Patil
Attack on Gunaratna Sadavarte Vehicle : मराठा आरक्षणासाठी आधी स्वतःची कार पेटवली, आता सदावर्तेंची फोडली; कोण आहे मंगेश साबळे ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com