Attack on Gunaratna Sadavarte Vehicle : मराठा आरक्षणासाठी आधी स्वतःची कार पेटवली, आता सदावर्तेंची फोडली; कोण आहे मंगेश साबळे ?

Maratha Reservation News : पाणी येत नसल्याने विहिरीत बाज टाकून आंदोलन केल्यामुळे प्रशासनाला तातडीने दखल घ्यावी लागली होती.
Maratha Reservation News
Maratha Reservation NewsSarkarnama

Marathwada Political News : मराठा आरक्षणाला विरोध आणि मनोज जरांगे पाटील यांच्या अटकेची मागणी करणारे ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्याबद्दल सध्या समाजामध्ये चीड आहे. (Mumbai News) या संतापातूनच आज मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या काही तरुणांनी मुंबईत जाऊन थेट सदावर्ते यांची आलिशान कार फोडली. ही बातमी वाऱ्यासारखी राज्यभरात पसरली, पोलिसांनी या तरुणांना अटक केली आणि दुपारी त्यांची जामिनावर सुटकाही झाली.

Maratha Reservation News
Marathwada Political News : बिअरचा खप वाढवू पाहणाऱ्या सरकारला बुद्धी दे; राजुरेश्वराला अभिषेक घालत तरुणाची बॅनरबाजी...

आंदोलनातून यंत्रणांना हलविण्याचे काम

सदावर्तेंची गाडी फोडणारा मराठा तरुण दुसरा-तिसरा कुणी नसून फुलंब्री येथे स्वतःची कार पेटवून देणारे तालुक्यातील गेवराई पायगाचा सरपंच मंगेश साबळेच आहेत. विविध लक्षवेधी आंदोलनातून त्यांनी आतापर्यंत यंत्रणांना हलवण्याचे काम केले आहे. (Maratha Reservation) पण मुंबईत जाऊन थेट ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची गाडी फोडण्याचे धाडस ते करतील, असं कुणालाही वाटल नव्हतं. इकडे मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीमध्ये सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

तर तिकडे मंगेश साबळे यांनी मुंबईत सदावर्ते यांच्या गाडीची सकाळी सहाच्या दरम्यान तोडफोड करत खळबळ उडवून दिली. `एक मराठा.. लाख मराठा...! छत्रपती शिवाजी महाराज की जय` अशा घोषणा देऊन निषेधही व्यक्त केला. (Marathwada) या आंदोलनात सरपंच मंगेश साबळे यांच्यासोबत वसंत बनसोड (पाथ्रीकर), राजू सावे या दोघांचाही सहभाग होता. अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते तेव्हा झालेल्या लाठीहल्ल्याचा निषेध म्हणून मंगेश साबळे यांनी स्वतःची नवी कोरी कार पेट्रोल टाकून जाळली होती. (Maharashtra) तसेच सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून पुतळ्याचे दहनही केले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुण्यात इंजिनिअरिंगचे शिक्षण

वैविध्यपूर्ण आंदोलनातून साबळे नेहमीच चर्चेत असतात. यापूर्वी फुलंब्री पंचायत समितीत सिंचन विहीर मंजूर करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्याकडून पैशाची मागणी होत असल्याने साबळे यांनी दोन लाखांची उधळण केली होती. फुलंब्री तालुक्यातील तळेगाव येथील तळेगाववाडी ही वस्ती भोकरदन हद्दीत आहे. या वस्तीचा समावेश फुलंब्रीत करावा, यासाठी आदिवासी वेशभूषा करत साबळे यांनी केलेले आंदोलन लक्षवेधी ठरले होते.

दुष्काळ जाहीर करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर अर्धनग्न आंदोलन, पाणीपुरवठा विहिरीला रोहित्र मिळत नसल्याने विद्युत वितरण कार्यालयात अर्ध नग्न आंदोलन, पाणी येत नसल्याने विहिरीत बाज टाकून आंदोलन केल्यामुळे याची दखल प्रशासनाला तातडीने घ्यावी लागली होती. आजच्या आंदोलनाने मंगेश साबळे पुन्हा प्रकाशझोतात आले आहेत. फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगाचे नियमित चर्चेत राहणारे सरपंच मंगेश साबळे पुणे येथे नामांकित काॅलेजमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होते.

Maratha Reservation News
Modi in Shirdi : मोदींना काळे झेंडे दाखविण्यास निघालेले शिवसैनिक, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ठेवले डांबून

मात्र २०१९ मध्ये वडिलांची प्रकृती बिघडल्याने ऑपरेशनसाठी येणाऱ्या अवाढव्य खर्चासाठी त्यांनी शासन दरबारी मदत मागितली. पण वेळीच मदत मिळाली नाही म्हणून त्यांनी फुलंब्री येथे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भर सभेत मुख्यमंत्री सहायता निधीतून उपचारासाठी खर्च द्या, अशी मागणी केली. तेव्हापासूनच मंगेश साबळे यांच्या आंदोलनाला सुरुवात झाली.

त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील टीव्ही सेंटरच्या टाॅवरवर चढून वडिलांच्या ऑपरेशनसाठी मुख्यमंत्री सहायता निधीची पुन्हा मागणी केली. तेव्हा खासदार इम्तियाज जलील, आमदार अंबादास दानवे यांनी त्यांना समजूत काढून खाली उतरवले होते. कालांतराने मंगेश साबळे यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांचे निधन झाल्यामुळे मंगेश साबळे यांनी शिक्षण सोडून सर्वसामान्यांसाठी आवाज उठवण्याचा निर्णय घेतला. आता मराठा आरक्षणाच्या आंदोलनात ते सक्रिय सहभागी झाले आहेत.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com