Ex.Mp Hemant Patil News : खासदारकीची तहान हळद केंद्राचे अध्यक्षपद देऊन भागवली

Political rehabilitation of former MP Hemant Patil? : भावना गवळी, कृपाल तुमाने या सहकाऱ्याचे मुख्यमंत्र्यांनी पुनर्वसन केले, पण हेमंत पाटील यांच्याबाबत काही निर्णय झाला नव्हता. यातून स्वतः हेमंत पाटील व त्यांच्या समर्थकांची घालमेल वाढली.
Hemant Patil
Hemant PatilSarkarnama
Published on
Updated on

Hingoli Shivsena Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील मंत्री होण्यास इच्छूक असलेल्या काही आमदार आणि लोकसभा निवडणुकीत उमेदवारी जाहीर केल्यानंतर पत्ता कट केलेल्या एका माजी खासदाराला पद देत त्यांची नाराजी दूर केली. हिंगोलीचे माजी खासदार हेमंत पाटील यांची हिंगोली हळद संशोधन केंद्राचे प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीत हिंगोलीतून (Shivsena) आधी जाहीर झालेली उमेदवारी, नंतर ती रद्द करण्यात आली. पाटील यांचे होणारे संभाव्य राजकीय नूकसान टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वाशिमच्या विद्यमान खासदार यांची उमेदवारी कापून हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली. पण त्यांचा पराभव झाला आणि हेमंत पाटील यांच्या राजकीय पुनर्वसनाचा प्रश्न कायम राहिला.

भावना गवळी, कृपाल तुमाने या सहकाऱ्याचे मुख्यमंत्र्यांनी पुनर्वसन केले, पण हेमंत पाटील यांच्याबाबत काही निर्णय झाला नव्हता. यातून स्वतः हेमंत पाटील व त्यांच्या समर्थकांची घालमेल वाढली. विधानसभेच्या निवडणुका दोन महिन्यावर असताना पक्षाची कुठलीच जबाबदारी नसल्याने पुढे काय ? ही चिंता मुख्यमंत्र्यांनी पाटील यांना हिंगोली येथील हळद संशोधन केंद्राचे प्रमुख पद देत मिटवली. त्यामुळे हेमंत पाटील यांना खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावले असेच म्हणावे लागेल.

Hemant Patil
Hingoli Assembly Election : हिंगोली विधानसभा निवडणुकीत काय होणार? उत्सुकता शिगेला...

महायुतीच्या विरोधात मराठवाडा, महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून संताप आहे. (Hemant Patil) अशावेळी शिंदेंकडून पक्षातील मराठा आमदार, नेत्यांना डावलले जात आहे, असा संदेश जाऊ नये, याची काळजी हिंगोली जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचे दिसते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हिंगोलीत मुख्यमंत्र्यांनी उमेदवारी दिलेल्या बाबुराव कोहळीकर यांचा पराभव झाला होता.

माजी खासदार हेमंत पाटील पत्नीच्या प्रचारात वाशिम मध्ये गुंतल्यामुळे ते हिंगोलीकडे फिरकले नव्हते. यामागे आपली उमेदवारी कापल्याची नाराजी होती, अशी चर्चा त्यावेळी मतदारसंघात होती. बाबुराव कोहळीकर यांचा पराभव ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांनी केल्याने मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसला होता. दोन वेळा एकनाथ शिंदे हिंगोलीत प्रचारासाठी आले होते, तरीही ही जागा शिवसेनेला राखता आली नव्हती.

Hemant Patil
Hemant Patil : सीएम शिंदेंनी शब्द पाळला; गवळी,तुमानेनंतर हेमंत पाटलांचंही जोरदार 'कमबॅक'; थेट मंत्रिपदाचंच 'गिफ्ट'

विधानसभा निवडणुकीत लोकसभेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी खासदारकीचा राजीनामा लोकसभा अध्यक्षांकडे देणारे हेमंत पाटील यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा असणारे पद देऊन बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. हे पुनर्वसन हेमंत पाटील यांना मान्य आहे की नाही? हे त्यांच्या पक्षातील सक्रीयेतून पुढीला काळात दिसून येणार आहे. 2005 ते 2013 दरम्यान, नांदेडचे शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत असलेले हेमंत पाटील नांदेड-वाघाळा महापालिकेत नगरसेवक होते. 2014 मध्ये ते विधानसभेवर पहिल्यांदा निवडून गेले. 2019 मध्ये हिंगोली लोकसभा मतदारसंघातून ते विजयी झाले.

मराठा आरक्षणासाठी काय केले? असा जाब जेव्हा आंदोलकांनी त्यांना अडवून विचारला होता, तेव्हा आपण आरक्षणासाठी खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचे हेमंत पाटील यांनी जाहीर केले होते.पुढे राजीनामा कधी देणार? अशी विचारणाही मराठा आंदोलकांनी हेमंत पाटील यांना केली होती. यावर 29 आॅक्टोबर 2023 रोजी पाटील यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा लोकसभा अध्यक्षांकडे दिला होता. मात्र तो मंजूर न करता सभागृहात हा विषय मांडा, असा सल्ला लोकसभा अध्यक्षांनी पाटील यांना दिला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com