Who Is Jaisingh Solanke : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीची घोषणा झाली नसली तरी, प्रत्येक पक्ष निवडणुकीचे गणित जुळविण्याच्या तयारीत आहेत. महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघामध्ये चांगलेच राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे. त्यातच राष्ट्रवादी अजित पवार गटातून मोठी बातमी समोर येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी बीड जिल्हाच्या राजकीय वर्तुळात मोठी घडामोड घडली आहे.
बीड जिल्हातील माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी राजकारणातून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचीही घोषणा केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली. तसे मागच्या विधानसभा निवडणुकीतच ही आपली शेवटची निवडणूक असे त्यांनी जाहीर केले होते. तर त्यांनी वारसदार म्हणून पुतणे जयसिंह सोळंके (Jaisingh Solanke) यांच्या नावाची घोषणा केली आहे.
प्रकाश सोळंकेंचे राजकीय वारसदार जयसिंह सोळंके कोण?
माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांटचे लहान भाऊ धैर्यशील सोळंके यांचे हे चिरंजीव आहेत. गेल्या अनेक वर्षापासून जयसिंह सोळंके राजकारणात सक्रीय आहेत. प्रकाश सोळंकेंसोबत राजकारणात त्यांची एन्ट्री घेतली, जयसिंह हे जिल्हा परिषदेत बांधकाम सभापती आहेत. बऱ्याच वर्षापासून राजकारणात सक्रीय असल्यामुळे बीड (Beed) मतदारसंघात त्यांचा चांगलाच जनसंपर्क आहे. त्यामुळे भविष्यात तेच माजलगाव , वडवणी आणि धारूर तालुक्यात राष्ट्रवादी पुढे नेणार अशी चर्चा सुरू झाली होती.
काकांसोबत राजकारणाचे धडे गिरवलेल्या जयसिंह साळंके यांनी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. माजलगाव, वडवणी आणि धारूर तालुक्यात ते चांगलेच सक्रिय आहेत. बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
सगळ्यात जमेची बाजू म्हणजे जयसिंह सोळंके यांचे वडील धैर्यशील सोळंके (Dharyasheel Solanke) हे सहकार क्षेत्र, शेती आणि राजकारण सक्रीय आहेत. त्यामुळे आता जयसिंह सोळंके आगामी विधानसभा निवडणूक (Vidhansabha Election) लढण्याची शक्यता असली तरी. सोळंकेंनी फार पूर्वीपासूनच विधानसभेची तयारी सुरू केली होती. त्यांच्याकडे असलेल्या जिल्हा परिषद सभापतीपदामुळे विधानसभेची बांधणी त्यांना सोयीची झाली आहे. प्रकाश सोळंके यांचे राजकीय वारसदार म्हणून आगामी विधानसभा निवडणूक लढण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
प्रकाश सोळंके यांची राजकीय कारकीर्द:
प्रकाश सोळंके यांची राजकीय कारकीर्द जिल्हा परिषद सदस्य म्हणून सुरु झाली. गेली अनेक वर्ष ते राजकारणात सक्रीय आहेत. पहिल्यांदाच काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर पराभूत झालेले प्रकाश सोळंके, 1999 च्या विधानसभा निवडणुकीत माजलगाव मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर विजयी झाले होते.
दोन टर्म भाजपकडून आमदार असलेले प्रकाश सोळंके 2009 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार होते. या काळात त्यांनी साडेचार वर्षे महसूल, भूकंप पुनर्वसन आदी खात्यांचे राज्यमंत्री म्हणूनही काम केल आहे. एकदा पराभवानंतर मागच्या 2019 च्या निवडणुकीत ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयी झाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.