Prakash Solunke : काका-पुतण्या संघर्ष टळला, अखेर आमदार प्रकाश सोळंकेंनी राजकीय वारसदार जाहीर केला!

Manjlegaon Assembly Constituency Prakash Solunke Jaisingh Solanke : दोन टर्म भाजपकडून आमदार असलेले प्रकाश सोळंके 2009 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार होते. या काळात त्यांनी साडेचार वर्षे मंत्री होते.
 Prakash salunke  Jaisingh Solanke
Prakash salunke Jaisingh Solanke sarkarnama
Published on
Updated on

Prakash salunke News : माजी दिवंगत उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांच्या तिसऱ्या पिढीतला राजकीय वारसदार अखेर जाहीर झाला. मोठ्या ओढाताणीनंतर काका आमदार प्रकाश सोळंके यांनी पुतणे जयसिंग सोळंके यांना राजकीय वारसदार जाहीर केले. मागच्या विधानसभा निवडणुकीत आपली शेवटची निवडणूक असे जाहीर करणारे आमदार प्रकाश सोळंके या निवडणुकीसाठी देखील सातत्याने प्रयत्नशिलच होते. हे माजलगाव मतदारसंघात लपून राहिले नव्हते.

जिल्ह्यात यापूर्वी दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे तसेच माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, आमदार संदीप क्षीरसागर यांच्यात ‘काका - पुतणे’ अंक घडला होता. मात्र, प्रकाश सोळंके यांनी स्वत: थांबण्याचा निर्णय घेतला असला तरी यामागे अंतर्गत ओढाताण मतदारसंघात लपून नाही.

प्रकाश सोळंके यांची राजकीय कारकीर्द जिल्हा परिषद सदस्य म्हणून सुरु झाली. पहिल्यांदा काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर पराभूत झालेले प्रकाश सोळंके पुढच्या 1999 च्या विधानसभा निवडणुकीत माजलगाव मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर विजयी झाले.

दोन टर्म भाजपकडून आमदार असलेले प्रकाश सोळंके 2009 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार होते. या काळात त्यांनी साडेचार वर्षे महसूल, भूकंप पुनर्वसन आदी खात्यांचे राज्यमंत्री म्हणूनही काम केले. एकदा पराभवानंतर मागच्या 2019 च्या निवडणुकीत ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयी झाले. दरम्यान, त्यावेळीही त्यांचे पुतणे जयसिंग सोळंके विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक होते.

दरम्यान, या निवडणुकीत त्यांनी आपली ही शेवटची निवडणूक असल्याचे प्रत्येक सभांमध्ये सांगितले. मात्र, 2024 ची विधानसभा लढवायचीच याच दृष्टीनेच त्यांचे प्रयत्न सुरु होते. मात्र, काकांनी आपल्याला राजकीय वारसदार जाहीर करावे, यासाठी पुतणे जयसिंग सोळंके देखील प्रयत्नशिल होते.

 Prakash salunke  Jaisingh Solanke
Devendra Fadnavis 'CM' : छगन भुजबळांनीही केला देवेंद्र फडणवीसांचा ‘मुख्यमंत्री’ असा उल्लेख!

लोकनेते सुंदरराव सोळंके कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत देखील सुंदरराव सोळंके यांचे पुत्र विरेंद्र सोळंके अध्यक्ष व जयसिंग सोळंकेंना उपाध्यक्ष करण्यात आले. मागच्या काळात प्रकाश सोळंके यांच्या स्नुषा अॅड. पल्लवी सोळंके यांना मतदारसंघातील वाढविलेला संपर्क आणि काही काळाने अटोपता घेतलेला राबता, मतदारसंघात स्वत:, स्नुषा की पुतण्या अशी ओढाताण हे लपून राहिली नव्हती.

अखेर रविवारी (ता.4) मतदारसंघातील मालीपारगाव, शहाजनपूर, वाघोरा, महातपुरी, सुलतानपुर आणि पुरुषोत्तमपुरी या गावांतील दौऱ्यात आमदार प्रकाश सोळंके यांनी पुतणे जयसिंग सोळंके यांना राजकीय वारसदार जाहीर केले. जयसिंग सोळंके यांनी पंचायत समितीचे उपसभापती व जिल्हा परिषदेचे सभापती म्हणून काम केलेले आहे.

दरम्यान, 2019 साली आघाडीच्या सरकारमध्ये मंत्रीपद मिळाले नाही म्हणून प्रकाश सोळंके यांची उघड नाराजी चांगलीच चर्चेत आली होती. त्यांनी थेट आमदारकीचा राजीनामा देण्याचेही जाहीर केले होते. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्याबद्दलच्या वक्तव्याचेही पडसाद चांगलेच उमटले होते.

(Edited By Roshan More)

 Prakash salunke  Jaisingh Solanke
Solapur Politics : बबनदादांनी टायमिंग साधलं; फडणवीस माढ्यात असतानाच पवारांच्या भेटीसाठी पुणे गाठले!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com