Parbhani: ठाकरेंची साथ सोडण्याआधीच फुटीर खासदाराने केली होती एकनाथ शिंदेंना मदत : विधानपरिषद निवडणुकीसंबंधात धक्कादायक खुलासा

Sanjay Jadhav, Rahul Patil, Parbhani Politics: खासदार संजय जाधव यांनी आमदार राहुल पाटील यांच्या गद्दारीच्या आरोपांना प्रत्युत्तर देत २०१९ लोकसभा निवडणुकीतील घडामोडी, शिवसेनेतील प्रवेश आणि परभणीच्या राजकारणावर स्पष्ट भूमिका मांडली.
Parbhani MP Sanjay Jadhav addressing a public gathering, delivering a fierce counterattack against MLA Rahul Patil's allegations and explaining his political stance.
Parbhani MP Sanjay Jadhav addressing a public gathering, delivering a fierce counterattack against MLA Rahul Patil's allegations and explaining his political stance.Sarkarnama
Published on
Updated on

Parbhani Politics: नुकत्याच झालेल्या परभणी - हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आपण डाॅ. विवेक नावंदर यांचे काम केले नाही, याची जाहीर कबुली परभणीचे खासदार संजय जाधव यांनी एका कार्यक्रमात दिली. नावंदर यांना आपण निवडणुकीच्या भानगडीत पडू नका, तुम्ही प्रामाणिक आहात, तुमच्याकडे कष्टाचा पैसा आहे. तुम्ही तो फोडाफोडीत घालवू शकत नाही. समोर दोन तगडे उमेदवार उभे आहेत. पण त्यांनी माझा सल्ला एकला नाही आणि निवडणूक लढले अन् पडले. मी स्वतः तुमच्या सोबत राहणार नाही हे ही मी त्यांना स्पष्ट सांगीतले होते, असे खासदार जाधव म्हणाले.

नावंदर यांचा काट्याने काटा काढण्यासाठी त्यांना कोणी उभे केले होते का? हे त्यांनी तपासून पहावे, असा सल्लाही जाधव यांनी दिला. पंचवीस वर्ष विरोधी पक्षात राहून राजकारण केले. लोकांची कामं करायची असतील तर सत्ता असायला हवी. देशाचे राज्याचे राजकारण बदलले आहे. ते आता समाजकारणावर नाही तर अर्थकारणावर चालते.

Parbhani MP Sanjay Jadhav addressing a public gathering, delivering a fierce counterattack against MLA Rahul Patil's allegations and explaining his political stance.
Saeed Khan : 'शपथ घेऊन सांगतो, गद्दारी करणाऱ्यांना सोडणार नाही'; आमदार होताच शिंदेंच्या शिलेदाराचा विटेकरांना गर्भित इशारा

मी कामातून उत्तर देईल, मी पंचवीस वर्षे विरोधी पक्षात राहून काम केले. विरोधात असताना काय अडचणी येतात हे मी अनुभवले आहे. मी आता शिवसेनेत प्रवेश केला आहे, मला कोणाच्या प्रामाणिकपणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही, असा टोलाही जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्या परभणी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर लगावला.

"२०१९ मध्ये मला परभणी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळाली होती. तरीही आमदार राहुल पाटील यांनी सोयऱ्या - धायऱ्याचे काम केले, राजकारण केले. मी पक्षाचा असून विरोधात काम आणि राजेश विटेकरांचे काम केले. त्यामुळे ज्याने गद्दारी केली आहे, त्याने माझ्यावर गद्दारीचा आरोप करू नये". अशा शब्दात खासदार संजय जाधव यांनी आमदार राहुल पाटील यांच्या टीकेवर पलटवार केला आहे.

त्यामुळे प्रामाणिकपणे लोकांची कामं करण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. पण माझ्यावर गद्दारीचा आरोप केला जातो. मला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, पण ज्यांनी माझ्यावर टीका केली ते परभणीचे आमदार कायम सोयऱ्या - धायऱ्याचे राजकारण करत राहिले. पण ही जनता हीच माझी सगी सोयरी आहे. २०१९ मध्ये लोकसभेची उमेदवारी मला मिळालेली असताना आमदारांनी राजेश विटेकरांचे काम केले, मग ज्याने स्वतः गद्दारी केली, त्याने मला गद्दार म्हणावे का? असा सवालही संजय जाधव यांनी उपस्थित केला.

Parbhani MP Sanjay Jadhav addressing a public gathering, delivering a fierce counterattack against MLA Rahul Patil's allegations and explaining his political stance.
Parbhani News: खासदारांच्या बंडाची धग परभणीपर्यंत..! ठाकरेंचा आमदार संतापानं पेटून उठला; संजय जाधवांना 2029 निवडणुकीवरुन आत्ताच दिला इशारा

आता कोणाच्या टीकेला उत्तर द्यायचे नाही, तर लोकांची कामं करायची आहेत. ज्या लोकांनी माझ्यावर ३० ते ३५ वर्ष विश्वास टाकला त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाही. आतापर्यंत मी प्रामाणिकपणे काम करत आलो, एखाद्याचे काम होणार असेल तर होच सांगीतले, आणि होणार नसले तर समोरच्याला प्रामाणिकपणे तुझे काम होणार नाही, हे देखील सांगितल्याचे संजय जाधव यांनी सांगीतले. जातीपातीचे राजकारण आता चालत नाही. सगळ्या समाजाला अठरापगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन चालावे लागते. सईद आणि आरेफ खान हे दोन तगडे नेते आपल्या लाभले आहेत.

सईद खान आमदार होणार हे मी आधीच सांगीतले होते. महायुतीच्या काही लोकांनी गद्दारी केली नाही तर डाॅ. विवेक नावंदर एवढे मतं घेऊच शकत नव्हते. सईद खान यांचा विजय एकतर्फी होता. या दोघांच्या माध्यमातून आपल्या भागातील विकास कामे करून घ्या, असे आवाहनही खासदार संजय जाधव यांनी उपस्थितांना केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com