Pooja More controversy : 'हा फक्त ट्रेलर, मनोज जरांगे आणि तुमचे...', पूजा मोरेंनी उमेदवारी मागे घेताच लक्ष्मण होकेंचा हल्लाबोल

Pooja More Withdraws PMC Nomination : पुण्यातील प्रभाग क्रमांक 2 मधून पूजा मोरे यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच यापूर्वी भाजपच्या नेत्यांविरोधात वक्तव्य केल्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.
 Pooja More, Manoj jarange patil, Laxman hake
BJP candidate pooja More seen in tears while withdrawing her Pune Municipal Corporation election nomination amid protests and political controversy.Sarkarnama
Published on
Updated on

Beed News, 02 Jan : भाजप समर्थक आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून झालेल्या टोकाच्या विरोधामुळे अखेर पूजा मोरे यांना पुणे महानगरपालिकेसाठी दाखल केलेली उमेदवारी मागे घ्यावी लागली आहे. पुण्यातील प्रभाग क्रमांक 2 मधून त्यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

मात्र, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच यापूर्वी भाजपच्या नेत्यांविरोधात वक्तव्य केल्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. यामध्ये पहलगाम हल्ल्यानंतर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया आणि मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेमुळे भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना प्रचंड ट्रोल केलं.

या सर्व घडामोडीनंतर अखेर पूजा मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. हा अर्ज मागे घेतांना त्यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, पूजा मोरे यांनी माघार घेताच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुजा मोरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना देखील लक्ष्य केलं.

लक्ष्मण हाके म्हणाले, 'तुम्ही वर्षाला एक पक्ष बदलताय. पूजा मोरेंनी काय व्यक्तव्य केली आहेत ते महाराष्ट्राने पाहिलं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी संघटनेपासून, संभाजी ब्रिगेड ते स्वराज्य पक्षापर्यंत फिरून झाल्यानंतर कमाळावर निवडणूक लढायला निघालाय? आधी यांना ओबीसीमधून उमेदवारी पाहिजे होती. पण ती मिळाली नाही म्हणून भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. मात्र जनता सजग आहे.', असं म्हणत त्यांनी मोरे यांच्यावर निशाणा साधला.

 Pooja More, Manoj jarange patil, Laxman hake
BJP News : आधी हिंदुत्व, मग निवडणूक! पुण्यात भाजपने स्वत:च्याच उमेदवाराला घ्यायला लावली माघार

तर मोरे यांच्या मुद्द्यावरून हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर देखील टीका केली. जरांगे पाटील आणि तुमचे कर्तृत्व मोठे आहे. अती केली की माती होते. हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है, असं म्हणत हाकेंनी खासदार बजरंग सोनवणे, आमदार विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके, राजेश टोपे यांना देखील इशारा दिला.

 Pooja More, Manoj jarange patil, Laxman hake
Kolhapur News : सतेज पाटील जे काही बोलतील त्याला प्रत्युत्तर मिळेलच; खासदार महाडिकांनी दिला इशारा

या सर्व नेत्यांचा उल्लेख करत ते म्हणाले, 'हा पिक्चर अजून बाकी आहे. तुम्ही ओबीसी नेते, ओबीसी आरक्षण, ओबीसी समाजाला सोडलं नाही. त्यामुळे आम्ही आहोच, तुम्ही एकदा निवडणुकीला उभे राहत, तुमच्या राजकारणा आमच्या शुभेच्छा.'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com