Ambadas Danve On Alandi News : औरंगजेबाचे पोस्टर झळकवणारे मोकाट अन् वारकऱ्यांवर लाठ्या ; वा रे हिंदुत्व..

Shivsena : कारसेवकांवर गोळ्या झाडणाऱ्याला पद्मविभूषण आणि वारकऱ्यांना लाठीचा प्रसाद हे भाजपच करू जाणे.
Opposition Leader Ambadas Danve-Dcm Fadanvis News
Opposition Leader Ambadas Danve-Dcm Fadanvis NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : आळंदीत काल वारकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेचे तीव्र पडसाद वारकरी सांप्रदाय व सामान्यांमधून उमटत आहेत. (Ambadas Danve On Alandi News) प्रकरण अंगटल येत असल्याने पोलिसांनी आता लाठीचार्ज झालाच नाही असा दावा केला आहे. मात्र समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या व्हिडिओतून सत्य स्पष्टपणे दिसत आहे.

Opposition Leader Ambadas Danve-Dcm Fadanvis News
Dilip Walse Patil News : ''वारकऱ्यांवरील लाठीचार्जचं समर्थन कसं करता येईल?''; वळसे पाटलांचा फडणवीसांसह पोलीस आयुक्तांना सवाल

या घटेवरून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठत आहे. (Shivsena) विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी `औरंगजेबाचे पोस्टर झळकवणारे मोकाट अन् वारकऱ्यांवर लाठीचार्ज वा रे हिंदुत्व`, अशा शब्दात सरकाला टोला लगावला आहे.

दानवे यांनी ट्विट करत वारकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्जबद्दल संताप व्यक्त केला आहे. (Bjp) वारकाऱ्यांवर हात उचलण्यापर्यंत या सरकारचा दम गेला आहे. (Devendra Fadanvis) सबंध जगाला शांती शिकवणाऱ्यांवर असा हल्ला होणे आणि हात उचलला गेला असेल तर हे दुर्दैवी, संतापजनक आहे.

औरंगजेबाचे पोस्टर झळकवणारे मोकाट, अन वारकाऱ्यांवर लाठ्या! वा रे हिंदुत्व! हेच का वंदनीय बाळासाहेबांचे स्वप्न. सरकारने या जळगावच्या वारकऱ्याच्या प्रश्नाचे उत्तर द्यावे. कारसेवकांवर गोळ्या झाडणाऱ्याला पद्मविभूषण आणि वारकऱ्यांना लाठीचा प्रसाद हे भाजपच करू जाणे.

कुठे कोरोनात वारकऱ्यांना सन्मानाने पंढरपूरला पोचवणारे महाविकास आघाडीचे सरकार आणि कुठे हे 'लाठी फेम' आजचे सरकार. फरक स्पष्ट दिसतो, आहे असे म्हणत दानवे यांनी सरकारवर हल्ला चढवला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com