Prakash Ambedkar News : लातूरकरांना उजनीच्या पाण्याचे फक्त गाजर, प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

Latur Loksabha : लातूरला उजनीचे पाणी आणू अन् येथील पाण्याचा दुष्काळ कायमस्वरूपी हटवू, हे गेल्या अनेक वर्षापासून ऐकतोय. मात्र इथे ना पाणी आले ना दुष्काळ हटला, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSarkarnama

Latur News : लातूरमध्ये वंचित आघाडीने नरसिंग उदगीरकर यांना उमेदवारी दिली आहे. महायुती-महाविकास आघाडी आणि वंचित आघाडी, अशी तिरंगी लढत येथे होत आहे. महायुतीचे सुधाकर श्रृंगारे तर महाविकास आघाडी काँग्रेसचे Congress डाॅ. शिवाजी काळगे हे मैदानात आहेत. उदगीरकर यांच्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी सभा घेत लातूरकरांसाठी महत्त्वाच्या असलेल्या उजनीच्या पाण्यावर परखड भाष्य केले.

Prakash Ambedkar
Lok Sabha Election 2024 : अखेर भाजपने पालघरची जागा शिवसेनेकडून खेचली

लातूरकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या पाण्याचे राजकारण येथील सत्ताधारी आणि विरोधक वर्षानुवर्ष करत आले आहेत. उजनीचे पाणी देण्याचे गाजर दाखवून केवळ मत मिळवण्या पलीकडे यांनी काही केले नाही. इतकी वर्ष झाली पण ना पाणी आले, ना लातूर जिल्ह्यातील दुष्काळ दूर झाला, अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar यांनी महायुती आणि महाविकास आघाडीला सुनावले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लातूरला उजनीचे पाणी आणू अन् येथील पाण्याचा दुष्काळ कायमस्वरूपी हटवू, हे गेल्या अनेक वर्षापासून ऐकतोय. मात्र इथे ना पाणी आले ना दुष्काळ हटला. सध्या राज्यामध्ये राजकीय पक्ष आपल्याच ताब्यात ठेवण्याची जशी स्पर्धा सुरू आहे. त्यातलेच येथील देशमुख कुटुंब. महाराष्ट्रात 169 कुटूंबाने राजकीय पक्ष कैद केले आहेत. कोणत्याही पक्षातून निवडून आला तर आपल्याच घरी सत्ता अशी स्थिती आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

खासदार, आमदार आपल्या इशाऱ्यावर नाचला पाहिजे म्हणून ठराविक लोकांना उमेदवारी दिली जाते. पण एखाद्या गरिबाला उमेदवारी देऊन हे लोक निवडून आणू शकत नाहीत का? असा सवालही आंबेडकर यांनी केला. लातूर येथील एमआयडीसीच्या जमिनी ज्यांनी ज्यांनी ताब्यात घेतल्या त्या प्रकरणाची गंभीर चौकशी सुरू झाली असून लातूरमधील काही नेते लवकरच निवडणुका झाल्यावर भाजपाच्या दारात प्रवेश करण्यासाठी थांबतील, असा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला.

भाजप सरकार हे जुमलेबाच सरकार असून काँग्रेसने मुस्लिम समाजाचा वापर केवळ मतासाठी केला. त्यांनी एक तरी मुस्लिम समाजातील नेत्याला उमेदवारी दिली का? असा प्रश्न करत काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना विचारा आमच्या सोबत राहणार का? आमचे प्रश्न सोडवणार का? असे लिहून घ्या, केवळ डोळे बंद करून मतदान करून नका. तुमचा आजपर्यंत भरपूर वापर केला गेला आहे, आता त्यांना जाबा विचारा,असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले.

(Edited By Roshan More)

Prakash Ambedkar
Harishchandra Chavan : भारती पवारांना धक्का ; माजी खासदार चव्हाणांनी दाखल केली अपक्ष उमेदवारी!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com