महायुतीतील भाजप ( Bjp ) आणि शिवसेनेत ( Shivsena ) पालघरच्या जागेवरून मोठी रस्सीखेच सुरू होती. एक महिन्यापूर्वी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे ( Shrikant Shinde ) यांनी राजेंद्र गावित यांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यादृष्टीनं गावित यांनी प्रचारही सुरू केला. पण, या निर्णयाला भाजप पालघर जिल्हाध्यक्ष भरत रजपूत यांनी उघड विरोध केला होता. त्याचप्रमाणे तालुकाध्यक्ष आणि भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी ही जागा पक्षाला मिळण्यासाठी निष्ठावान कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी, असा पवित्रा घेतला होता. अखेर भाजपच्या वरिष्ठांनी दखल घेतल्यानं शिवसेनेवर पालघरची जागा सोडण्याची नामुष्की ओढवली. भाजपकडे ही जागा गेल्यानं भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बंडाला यश मिळाल्याची चर्चा पालघरमध्ये रंगली आहे.
25 वर्षाच्या युतीत डहाणू आणि पालघरची जागा भाजपकडे राहिली आहे. पण, 2019 मध्ये भाजपनं उमेदवार राजेंद्र गावित ( Rajendra Gawit ) यांच्यासह ही जागा शिवसेनेला दिली. पण, यंदा ही जागा शिवसेनेकडे राहावी म्हणून नेते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठा हट्ट धरला होता. त्या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदे यांनी महिन्याभरापूर्वीच राजेंद्र गावित यांची उमेदवारी जाहीर केली होती. तशाप्रकारचे गावितांनी प्रचारही सुरू केला होता.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पण, राजेंद्र गावितांच्या उमेदवारीला भाजप पालघर जिल्हाध्यक्ष भरत रजपूत यांनी विरोध केला होता. नंतर जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी आणि तालुकाध्यक्षांनी बैठक घेत ही जागा भाजपला मिळत निष्ठावान कार्यकर्त्यांला उमेदवारी देण्याची मागणी केली. त्यासह गावितांच्या उमेदवारी विरोध करत राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. या घटनेनंतर महायुतीतील वरिष्ठ पातळीवर मोठ्या घडामोडी आणि तडजोडी झाल्या. मग, पालघरची जागा भाजपला मिळाल्याचं प्रदेशाध्यक्ष बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) यांनी जाहीर केलं. यामुळे पालघरमधील पदाधिकारी आणि तालुकाध्यक्षांनी केलेल्या बंडाला यश मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे.
पालघरमध्ये सहा सहा विधानसभा क्षेत्र आहेत. त्यात भाजपचा एकही आमदार नाही. आता लोकसभेची जागा मिळवली खरी, मात्र येथील ऊमेदवार निवडून आणण्याचे मोठे आव्हान भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांपुढे आहे. पालकमंत्री रविंद्र चव्हाण ( Ravindra Chavan ) यांनी जिल्ह्यात पक्षाची बांधणी केली आहे. आता महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना एक दिलाने काम करून पालघरमध्ये विजय संपादन करावा लागणार आहे. त्यासाठी महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनोमिलन करण्याची जबाबदारी वरिष्ठांना घ्यावी लागणार आहे.
( Edited By : Akshay Sabale )
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.