Prakash Ambedkar : शरद पवार शेतकऱ्यांचे नाही तर कारखानदारांचे नेते; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात

Sharad Pawar, Narendra Modi : काँग्रेस भाजप राष्ट्रवादी शिवसेना या पक्षांनी केवळ घराणेशाहीतच लोकसभा विधानसभेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सतत सत्ताही डाव्या आणि उजव्या हातात एकाच कुटुंबात राहिली आहे.
Prakash Ambedkar, Sharad Pawar
Prakash Ambedkar, Sharad Pawarsarkarnama

Aurangabad Political News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात आल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवारांवर भटकती आत्मा असा उल्लेख करत सडकून टीका केली होती. त्यावर पवारांचा आत्मा शेतकऱ्यांचे हित आणि तरुणांच्या रोजगारासाठी भटकतो, असा पलटवार पवारांच्या शिलेदारांनी पंतप्रधान मोदींवर केला होता. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी मात्र शरद पवार शेतकऱ्यांचे नेते नाहीत, अशी टीका केली.

फुलंब्री येथील दरी फाटा परिसरात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रभाकर बकले यांच्या प्रचाराच्या आयोजित सभेत शुक्रवारी (ता.३) ते बोलत होते. यावेळी आंबेडकर म्हणाले, शरद पवार Sharad Pawar हे शेतकऱ्याचे नेते नसून कारखानदारांचे नेते आहेत. शेतकऱ्यांचे केवळ दोनच नेते होऊन गेले ते म्हणजे पाहिले महात्मा फुले व दुसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. काँग्रेस भाजप राष्ट्रवादी शिवसेना या पक्षांनी केवळ घराणेशाहीतच लोकसभा विधानसभेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सतत सत्ताही डाव्या आणि उजव्या हातात एकाच कुटुंबात राहिली आहे.

वंचित एकमेव पक्ष असून यांनी घराणेशाही मोडीत काढीत सर्व समाजाच्या घटकाला उमेदवारी देऊन निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहे. पक्षाला जिवंत ठेवण्यासाठी कुटुंबशाहीपेक्षा कार्यकर्ताशाही महत्त्वाची आहे. त्याच विचाराने वंचित बहुजन आघाडी काम करीत आहे. महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा आम्ही प्रयत्न केला. परंतु त्यांनी आमच्या विचारास बगल दिली. त्यामुळे आम्हाला नाईलाजाने महाविकास आघाडीतून बाहेर पडत स्वतंत्र निवडणुकीला सामोरे जावे लागत असल्याचे आंबेडकरांनी Prakash Ambedkar स्पष्ट केले.

Prakash Ambedkar, Sharad Pawar
Sharad Pawar : मोठी बातमी! शरद पवारांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात; जळगावात नेमके काय घडले?

देशाचे पंतप्रधान मोदी Narendra Modi हेकीखोर आहे. हिंदू धर्मातील सर्वात मोठे सात साधुसंतापैकी एकाही संताचे न ऐकता मुहूर्त नसताना राम मंदिराचे उद्घाटन केले. देशाला तोडण्याचे काम भाजपकडून सातत्याने केले जात आहे, अशी टीकाही प्रकाश आंबेडकरांनी केली.

मराठवाड्यामध्ये भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या सर्वच पक्षात घराणेशाही आहे. या घराणेशाहीच्या हातीच आतापर्यंत सत्तेच्या चाव्या आहेत. त्यामुळे मराठवाड्याचा विकास होऊ शकला नसल्याचा आरोप करत प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस, भाजपला धारेवर धरले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Prakash Ambedkar, Sharad Pawar
Thane Politics : ठाण्यात आज टोळीयुद्ध उद्या तुमच्या अंगावर येतील; जितेंद्र आव्हाडांचा रोख कुणाकडे?

दोन महिन्यात हमीभाव कायदा लागू करणार

शेतकऱ्यांना शेतीमालाला भाव मिळणे गरजेचे आहे. आज शेतीमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आपण निवडून दिल्यास दोन महिन्यात शेतकऱ्यांच्या मालासाठी हमीभाव कायदा लागू करणार असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

(Edited by Sunil Dhumal)

Prakash Ambedkar, Sharad Pawar
Dispute In Mahayuti : खासदार लोखंडे कोण? आमदार काळेंच्या कार्यकर्त्याच्या प्रश्नावरून गोंधळ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com