Prakas Ambedkar News : सगळे पक्ष आरक्षणविरोधी, तुम्हाला `वंचित`शिवाय पर्याय नाही

Prakash Ambedkar says, all parties are against reservation, deprivation is the only option : मात्र ओबीसींचे म्हणणे कायदेशीर आहे. त्यामुळे आम्ही या निवडणूकीत ओबीसींच्या बरोबर राहण्याचा निर्णय घेतल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. भाजप, कॉंग्रेस राष्ट्रवादी, उद्धव सेना या सगळ्यांचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या उपवर्गीकरण व क्रिमिलिअरला पाठींबा आहे.
Prakash Ambedkar News
Prakash Ambedkar News Sarkarnama
Published on
Updated on

Vanchit Bahujan Aghadi News : भाजप, काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे सगळेच आरक्षण विरोधी आहेत. त्यामुळे राज्यातील मराठा-ओबीसी आरक्षणवाद्यांना वंचित बहुजन आघाडी शिवाय दुसरा पर्याय नाही, असा दावा वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केला. छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना हरियाणा राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप यांच्यात साटलोट होतं, असा गंभीर आरोपही आंबेडकरांनी केला.

भाजपसह कॉंग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेनाही आरक्षण विरोधी असल्याने आता आरक्षणवाद्यांना वंचितशिवाय पर्याय राहिला नाही. (Prakash Ambedkar) विधानसभा निवडणूकीत ओबीसी समुह मराठ्यांना मतदान करणार नाही, तर मराठा समुह हा ओबीसीला मतदान करणार नाही. एका मॅनमध्ये दोन तलवारी राहणार नाहीत. मनोज जरांगेंची मागणी ही ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण मिळावे, अशी आहे तर ओबीसींचा त्याला विरोध आहे.

मात्र ओबीसींचे म्हणणे कायदेशीर आहे. त्यामुळे आम्ही या निवडणूकीत ओबीसींच्या बरोबर राहण्याचा निर्णय घेतल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. भाजप, कॉंग्रेस राष्ट्रवादी, उद्धव सेना या सगळ्यांचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या उपवर्गीकरण व क्रिमिलिअरला पाठींबा आहे. मात्र आम्हाला हा निर्णय मान्य नाही, मुळात सर्वोच्च न्यायालयाला निर्णय देण्याचाच अधिकार नाही. या निर्णयामुळे एकदा आरक्षणाचा फायदा घेतला की, तुम्ही क्रिमिलिअरमध्ये जाता. त्यानंतर आरक्षणाच्या बाहेर फेकला जाता, त्याला आमचा विरोध आहे.

Prakash Ambedkar News
Prakash Ambedkar : 'मनोज जरांगेंची सोबत करणाऱ्यांबरोबर आम्ही नसणार'; प्रकाश आंबेडकर चौथ्या आघाडीच्या तयारीत

सध्या वंचित आदीवासी, ओबीसी संघटनांची आम्ही मोट बांधत आहोत. नव्वद टक्के यशस्वी झालो असून, येत्या दोन-तीन दिवसात शंभर टक्के पुर्ण झाल्यानंतर ते किती सिट मागतात हे निश्चित झाल्यानंतर किती जागा लढवणार हे स्पष्ट होईल. (Maratha Reservation) सध्या संविधान टिकले पाहिजे असे मानणाऱ्या समुहाने मात्र इंडिया आघाडीच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे, असा दावा आंबेडकर यांनी केला.

मात्र भाजपसह कॉंग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेनाही आरक्षण विरोधी असल्याचे आंबेडकर म्हणाले. निवडणूकीत वंचितच आघाडी करत असल्याने इतरांच्या आघाडीशी आम्हाला देणे घेणे नाही, असे स्पष्ट करत आंबेडकरांनी तिसऱ्या आघाडीत जाणार का? हा प्रश्न टोलवला. नुकत्याच झालेल्या हरियाणा राज्यातील निकालावर प्रकाश आंबेडकर यांनी संशय व्यक्त केला. हरियाणात भाजपने कॉंग्रेसमधील नेते सोनिया गांधी, राहुल गांधी, कॉग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांच्यासह काही नेत्यांची कोंडी केली.

Prakash Ambedkar News
Maratha Reservation : अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तेंना हायकोर्टानं झापलं, 'मराठा आरक्षणावेळी...'

या सगळ्यांचे खटले पटीयाला कोर्टात सुरु होणार होते, हे खटले आहे तसेच प्रलंबीत ठेवण्यासाठी कॉंग्रेसने खेळी केली. कॉंग्रेसने त्यासाठी आपल्याच पक्षातल्या सर्व दलित कार्यकर्त्यांच्या अपमान करण्याचे कारस्थान सुरु केले. ज्यांच्या तीन-तीन पिढ्या कॉंग्रेसमध्ये गेल्या अशा दलित नेत्यांना हिन वागणूक दिली. त्यामुळे तिथला कॉंग्रेसकडे येवू पाहणारा दलित समुह पुन्हा भाजपकडे वळाला.

त्यामुळे हरियाणात पुन्हा भाजपचीच सत्ता आली, असा दावा आंबेडकर यांनी केला. हरियाणाच्या निवडणूकीतून भाजप आणि कॉंग्रेसचे साटेलोटे होते हे यावरून स्पष्ट झाले, असेही आंबेडकर म्हणाले. हरियाणातील दलितांनी सावधतेचा इशारा दिलेला आहे. आता आम्हीही दलितांना सावधानतेचा इशारा देत आहोत, वेळीच सावध व्हा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com