Prakash Ambedkar : आंबेडकरांचं ठरलं,ओबीसींसाठी 'आरक्षण बचाव यात्रा' काढणार; तर मराठ्यांसाठीही देणार मोठा लढा! म्हणाले...

Prakash Ambedkar On OBC, SC, ST Reservation : राज्यात येत्या 25 जुलैपासून ओबीसी आणि SC, ST यांच्या हक्कांसाठी 'आरक्षण बचाव' जनयात्रा काढणार असल्याची घोषणा 'वंचित'चे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News, 16 July : महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा वाद शिगेला पोहोचला आहे. एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला ओबीसीमधूनच आरक्षण देण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे ओबीसी आंदोलकांनी ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देण्यास विरोध केला आहे.

त्यामुळे आरक्षणाचा वाद नेमका कसा मिटवायचा हा मोठा प्रश्न सरकारपुढे आहे. अशातच आता राज्यात येत्या 25 जुलैपासून ओबीसी आणि SC, ST यांच्या हक्कांसाठी 'आरक्षण बचाव' जनयात्रा काढणार असल्याची घोषणा 'वंचित'चे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथील आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी त्यांनी 'आरक्षण बचाव' जनयात्रेच्या माध्यमातून आपण कोणत्या मागण्या करणार आहेत. याबाबतची माहितीदेखील दिली. तसेच राज्यातील गरीब मराठ्यांना (Maratha) देखील न्याय मिळाला पाहिजे. शिवाय गरीब मराठ्यांना टिकाऊ आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले.

आंबेडकरांच्या नेमक्या मागण्या काय?

OBC आरक्षण वाचलं पाहिजे. SC,ST विद्यार्थ्यांची स्कॉलरशीप डबल करण्यात यावे. ओबीसी विद्यार्थ्यांनाही SC,ST स्कॉलरशीप लागू करावी. घाई गडबडीत फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट दिला आहे तो रद्द करावा, जे कुणबी आहेत त्यांना आरक्षण मिळावं आणि ते मिळणारच. आरक्षणात एससी एसटी आणि ओबीसींना देखील पदोन्नती मिळाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी ओबीसी आणि SC, ST समाजासाठी केली.

Prakash Ambedkar
Sharad Pawar On OBC : शरद पवारांच्या आरक्षणाच्या भूमिकेवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे लक्ष !

गरीब मराठ्यांचं आरक्षणाचं टिकाऊ ताट

तसंच यावेळी त्यांनी गरीब मराठ्यांच्या मागण्यांवरही भाष्य केलं. ते म्हणाले, "श्रीमंत मराठ्यांनी गरीब मराठ्यांना फसवलं आहे, त्यामुळे ओबीसींच्या हातामध्ये सत्ता द्या. गरीब मराठ्यांना टिकाऊ आरक्षणाचे वेगळे ताट मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत."

राजकीय पक्षाची नेमकी भूमिका काय?

पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने ओबीसी विरुद्ध मराठा हा श्रीमंत मराठ्यांनी लावलेला वाद आहे. एका बाजूला जरांगे पाटील यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे, आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक आरक्षणाबाबत बोलावली होती, त्या सर्वपक्षीय बैठकीला काँग्रेस एनसीपी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटातले कोणीच हजर राहिलं नव्हतं.

Prakash Ambedkar
Chhagan Bhujbal Sharad Pawar Meeting : भुजबळांचा पुढाकार योग्यच, आता शरद पवारांनी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी

त्यामुळे या बैठकीबाबत राजकीय पक्षाची नेमकी भूमिका काय? हा प्रश्न वंचितकडून विचारण्यात आला. सामंजस्याने तोडगा काढायचा असेल तर श्रीमंत मराठ्यांचे पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे पक्ष जोपर्यंत भूमिका मांडत नाहीत. तोपर्यंत तोडगा निघणार नाही, असंही आंबेडकर यावेळी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com